जाहिरात
Story ProgressBack

एप्रिल-जून सर्वात कठीण, Heat Wave पासून बचावासाठी 23 राज्यांचा कृती आराखडा तयार!

देशात हिट वेवचा धोका पाहता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाकडून निवडणूक आयोगाला काही काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारादरम्यान जनसभा आणि रोड शोच्या वेळा विचार करून ठरवाव्यात असं सांगण्यात आलं आहे.   

Read Time: 2 min
एप्रिल-जून सर्वात कठीण, Heat Wave पासून बचावासाठी 23 राज्यांचा कृती आराखडा तयार!
नवी दिल्ली:

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उन्हाचा प्रकोप अधिक कडक असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. या हिट वेवशी दोन करण्यासाठी प्लान तयार करण्यात आला आहे. याबाबत एनडीटीव्हीने जोखीम कमी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र महासचिवांचे विशेष प्रतिनिधी आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख कमल किशोर यांच्याशी खास बातचीत केली. यावेळी त्यांना एप्रिल-जून दरम्यान 23 अतिसंवेदनशील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा सामना करण्याची शक्यता असलेल्या भागांबद्दल विचारण्यात आले. 

याबाबत कमल किशोर म्हणाले, 23 अत्यंत संवेदनशील राज्यांसाठी हिट वेवसाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. उन्हाळा तडाख्याचा फटका बसणाऱ्या सर्व राज्यात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय या राज्यांमधील रुग्णालयातही उन्हाळामुळे होणाऱ्या आजारांवरुन औषधांचा साठा करून ठेवण्यास सांगण्यात आले आहेत. याशिवाय शाळेच्या वेळेतही बदल करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राज्यांमध्ये ज्या भागात बांधकाम सुरू आहे, अशा ठिकाणी कामगारांच्या कामाच्या वेळेत बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

2023 जगाच्या इतिहासात सर्वात उष्ण वर्ष राहिलं होतं. यंदाच्या वर्षात भारतात हिट वेवचा धोका वाढला आहे. यामागे दोन कारणं सांगितली जात आहेत. पहिलं जलवायू परिवर्तन आणि दुसरं अल निनोची स्थितीस जी आता सक्रीय आहे. याच कारणामुळे यंदा एप्रिल आणि जून महिन्यात हिट वेवचा प्रकोप अधिक पाहायला मिळेल. 

निवडणूक आयोगालाही दिला सल्ला
देशात हिट वेवचा धोका पाहता राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापक प्राधिकरणाकडून निवडणूक आयोगाला काही काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. राजकीय पक्षांनी निवडणूक प्रचारादरम्यान जनसभा आणि रोड शोच्या वेळा विचार करून ठरवाव्यात असं सांगण्यात आलं आहे.   

एप्रिल महिन्यात या राज्यांना धोका 
भारतीय हवामान विभागाने यंदा अनेक राज्यात 4 ते 8 दिवसांपासून 10 ते 20 दिवसांपर्यंत हिट वेवची शक्यता व्यक्त केली आहे. एप्रिल महिन्यात गुजरात, मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, राजस्थान, उत्तर छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश या राज्यात हिट वेवची शक्यता आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination