Iran War: इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध आता निर्णायक आणि अत्यंत विनाशकारी वळणावर पोहोचले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' प्लॅटफॉर्मवरून इराणला थेट शब्दात धमकी दिली आहे. जर इराणने मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार पहाटे 5.30 वाजता) होर्मुजची सामुद्रधुनी जागतिक वाहतुकीसाठी खुली केली नाही, तर बुधवारी इराणमध्ये 'पावर प्लांट डे' आणि 'ब्रिज डे' साजरा होईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.
काय आहे 'पावर प्लांट' आणि 'ब्रिज डे'?
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे की, जर इराणने दिलेली मुदत पाळली नाही, तर अमेरिकन हवाई दल इराणच्या नागरी पायाभूत सुविधांना लक्ष्य करेल. इराणमधील सर्व प्रमुख वीज निर्मिती केंद्रे एकाच वेळी उद्ध्वस्त केली जातील, ज्यामुळे संपूर्ण देश अंधारात बुडेल. दळणवळणाचे महत्त्वाचे दुवे असलेले मोठे पूल नष्ट करून इराणची रसद तोडण्यात येईल. ट्रम्प यांच्या मते, ही लष्करी कारवाई नसून इराणला अद्दल घडवण्यासाठी केलेली 'शिक्षा' असेल.
(नक्की वाचा- Baramati Byelection 2026: बारामतीत एका बॅनरची राज्यभर चर्चा; तटकरे-पटेल यांचा 'घातकी' असा उल्लेख)
ट्रम्प यांची आक्रमक भाषा
ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये इराणच्या नेत्यांचा उल्लेख अत्यंत कडक आणि आक्षेपार्ह शब्दात केला आहे. त्यांनी लिहिले, "होर्मुज उघडा, नाहीतर तुम्ही नरकात जाल, फक्त पाहत राहा! अल्लाहू अकबर!" . युद्धनीतीच्या इतिहासात हल्ल्याची नेमकी वेळ आणि तारीख अशा प्रकारे जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
शांततेची एक शेवटची संधी?
धमकी दिली असली तरी ट्रम्प यांनी सकारात्मक संकेतही दिले आहेत. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले की, सध्या पडद्यामागे बोलणी सुरू असून सोमवारी एखादा करार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इस्रायलने देखील इराणच्या ऊर्जा केंद्रांवर हल्ल्याची पूर्ण तयारी केली असून ते केवळ व्हाईट हाऊसच्या होकाराची वाट पाहत आहेत.
(नक्की वाचा- Vasai News: 15 दिवसांत 6 मृतदेह; विरारमध्ये आणखी एक मृतदेह आढळल्याने खळबळ)
इराणची प्रतिक्रिया आणि जागतिक चिंता
इराणचे संसदीय अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी ट्रम्प यांच्यावर टीका करत म्हटले की, अमेरिका आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करत असून संपूर्ण प्रदेशाला महायुद्धाकडे ढकलत आहे. दुसरीकडे, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास आराघची यांनी इशारा दिला आहे की, जर बुशहर अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाला, तर होणारा किरणोत्सर्ग केवळ इराणच नाही तर आखाती देशांच्या राजधानींनाही संपवून टाकेल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world