Walking Benefits : चालणे हा सगळ्यात सोपा आणि प्रभावी व्यायाम मानला जातो. निरोगी आरोग्यासाठी रोज चालणे हे अत्यंत फायदेशीर आहे. हृदयविकार, मधुमेह या आजारांना दूर ठेवायचे असेल तर निरोगी माणसाने रोज किमान 6 हजार पावले चालावीत असे डॉक्टर सांगत असतात. चालण्यासाठी कोणत्याही विशेष साधनांची गरज पडत नाही. आपल्याला आपल्या सोयीनुसार कुठेही, कधीही चालता येते. कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना हा सोपा व्यायाम सांगितला जाऊ शकतो.
नक्की वाचा : यावर्षी तरुणांमध्ये खूप गाजले हे डेटिंग ट्रेंड्स, बदलली नात्यांची भाषा
हृदयाचे आरोग्य निरोगी राहण्यासाठी, लठ्ठपणासह तणावाची समस्या दूर करायची असेल, स्नायू बळकट करायचे असतील, फ्रेश राहायचे असेल, एकाग्रता वाढवायची असेल तर रोज चालणे फायदेशीर ठरू शकते. मात्र अनेकांना हा प्रश्न पडतो की सकाळी चालणे हे फायदेशीर असते का संध्याकाळी चालणे. सकाळी चालणे आणि संध्याकाळी चालणे या दोन्हीचे वेगवेगळे फायदे आहेत. प्रत्येकजण आपल्या शरीरासाठी काय गरजेचे आहे ते जाणून घेऊन यातला पर्याय निवडू शकतो.
नक्की वाचा :1 जानेवारीपासून Whatsapp 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही, लिस्टच आली समोर
सकाळी चालण्याचे फायदे
सकाळी उपाशीपोटी चालल्याने कॅलरी वेगाने जळण्यास मदत होते. सकाळी चालणे हे एखाद्या उत्तेजकासारखे काम करते. सकाळी चालल्याने मन आणि शरीर ताजेतवाने होते. सकाळचे कोवळे ऊन आणि शुद्ध हवा ही संपूर्ण शरीराच्या स्वास्थ्यासाठी फार गरजेची असते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कोवळ्या ऊनामध्ये डी जीवनसत्व असते जे त्वचा, केस आणि हाडांसाठी अत्यंत गरजेचे असते. यासोबतच डी जीवनसत्वामुळे चयापचय क्रिया सुधारण्यासही मदत होते. सकाळी उठल्यानंतर ज्या माणसांना निरूत्साही वाटते अशांनी सकाळी चालणे गरजेचे आहे.
उपाशी पोटी चालल्याने फॅट वेगाने कमी होण्यास मगत होते. त्यामुळे ज्या व्यक्तींना मधुमेह जडलेला आहे, लठ्ठपणा आलेला आहे अशा व्यक्तींनी सकाळी चालणे फायदेशीर ठरते. ज्या व्यक्तींना लक्ष्य केंद्रीत करणे शक्य होत नाही, अशा व्यक्तींसाठीही सकाळी चालणे फायदेशीर ठरते. विद्यार्थी, डॉक्टर, वकील अशांनी आपला अभ्यास किंवा काम अधिक लक्ष्य देऊन करणे सोपे जावे यासाठी सकाळी चालणे फायदेशीर आहे. ज्यांना व्यायामाला सुरुवात करायची आहे अशांसाठी सकाळी चालणे ही पहिली पायरी असते. रोज सकाळी चालण्याची सवय लावून घेतल्याने व्यायामाची शिस्त लागते आणि स्नायू बळकट झाल्याने व्यायामानंतर अंग दुखत नाही.
नक्की वाचा :'ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:' मंत्राचा रोज सकाळी 24 मिनिटे करा जप, जीवनात होतील 5 मोठे बदल
संध्याकाळी चालण्याचे फायदे
संध्याकाळी चालल्याने दिवसभराचा थकवा बाजूला सारण्यास मदत होते. संध्याकाळी चालल्याने तणाव दूर होतो आणि आपले मन शांत होण्यास मदत होते. अत्यंत धकाधकीचे, तणावाचे काम करणाऱ्या मंडळींसाठी संध्याकाळी चालणे फायदेशीर असते. रात्री जेवणानंतरही अनेकजण चालतात. असे केल्याने चेवण पटकच पचते आणि पोट फुगण्याची, अपचनाची, गॅसची समस्या होत नाही. काहींना रात्री भरपेट जेवायची सवय असते. अशांना जेवणानंतर पोट दुखणे, अपचन होणे असा त्रास होतो. संध्याकाळी चालल्याने यापासून सुटका होण्यास मदत होते. संध्याकाळी चालल्याने रात्री सांत झोप लागण्यासही मदत होते. रात्री वेळेवर शांत झोप लागल्याने झोपेचे चक्र संतुलित राहाते.
मग सकाळी चालावे की संध्याकाळी ?
निरोगी हृदय, वजन नियंत्रणात ठेवणे, शक्ती वाढवणे हा आपला उद्देश्य असेल तर सकाळी चालणे हे फायदेशीर ठरते. सकाळी खाऊन चालण्यापेक्षा उपाशीपोटी चालणे हे अधिक फायदेशीर असते. संध्याकाळी चालल्याने मनाची शांतता राखण्यास मदत होते शिवाय पचन सुधारण्यासाठी, शांत झोप लागण्यासाठीही संध्याकाळी चालणे फायदेशीर असते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world