Nas Daily Video: इस्रायली पॅलेस्टिनी व्लॉगर नुसिर यासीन (नास डेली) यशस्वी कंन्टेन्ट क्रिएटर कसा झाला याबाबत सविस्तर सांगितलं. एनडीटीव्ही वर्ल्ड समिट 2024 मध्ये तो सहभागी झाला होता. व्लॉगच्या दुनियेतील आपल्या यशाचे रहस्यही त्याने सांगितले.
नुसीर यासीनने सांगितले की, व्लॉगच्या जगाविषयी बोलताना ते म्हणाले की हे एक कंपनी बनवण्यासारखे आहे. 8 वर्षापूर्वी मला कळालं की सोशल मीडिया आणि व्हिडीओ मोठा बदल घडवू शकतात. तेव्हा फक्त युट्युबवर व्हिडीओ पाहाता येत होते. मी तेव्हा ठरवलं की 2 वर्ष 7 महिने एकही दिवस न चुकवता व्हिडीओ करायचा. व्हिडीओ एक मिनिटांचाच असायला हवा हे मी ठरवलं होतं. 1 हजार दिवसांत आम्ही 1 हजार व्हिडीओ तयार केले. यानंतर 70 दशलक्ष फॉलोअर्स आले आणि 30 दशलक्ष व्ह्यूज मिळाले. नास डेलीचे व्हिडीओ 14 भाषांमध्ये व्हायला लागले. नास डेलीमध्ये आज 100 लोकं काम करतात. दुबई, सिंगापूर, न्यूयॉर्कमध्ये ते काम करतात. हे यश का मिळालं? याबाबत जाणून घेऊया.
#NDTVWorldSummit | इंटरनेट स्टार नैस डेली क्यों बोलने लगे सीता-राम, देखिए वीडियो#NasDaily pic.twitter.com/Ym4h37I6Bm
— NDTV India (@ndtvindia) October 22, 2024
- लोकांना समजवून सांगणारी माणसं आवडतात : एखादी गोष्ट माणूस समजावून सांगतो तेव्हा त्याला जास्त प्रतिसाद मिळतो. व्हॉईस ओव्हर आणि नुसती अक्षरे असलेले व्हिडीओ दाखवले असते तर आम्हाला हे यश मिळाले नसते. 'नास'चा अर्थ लोक असा होतो.
- मांडणी महत्त्वाची : विषय सोप्या पद्धतीने घटनास्थळावर जाऊन समजावला तर तो प्रभावी ठरतो. व्हिडीओ हे महत्त्वाचे आहेत. व्हिडीओद्वारे तुम्ही मांडणी करा आणि लोकांना समजावून सांगा.
- सोशल मीडियाचे महत्त्व : आणखी एक नास डेली उभी करायची असेल तर सोशल मीडिया महत्त्वाचा आहे. एका व्हिडीओमुळे चळवळ, क्रांती निर्माण होऊ शकते. मी पंतप्रधान मोदींना भेटलो तेव्हा त्यांनी मला पहिली गोष्ट सांगितली की सोशल मीडिया हा खूप ताकदवान आहे आणि तो फायदेशीर आहे त्याचवेळी धोकादायकही आहे. भारतामध्ये इन्स्टाग्रामवरील एका व्हिडीओमुळे अवयवदानाचे प्रमाण 5-7 पटीने वाढले. एका माणसाने, एक व्हिडीओ नीटपणे मांडणीकरून लोकांसमोर योग्य पद्धतीने सोशल मीडियावर मांडला आणि त्याचा परिणाम झाला.
- सातत्य : नास डेलीच्या पहिल्या 200 व्हिडीओंना फार प्रतिसाद मिळाला नाही. 270 व्या व्हिडीओनंतर प्रतिसाद मिळायला लागला. जर व्हिडीओंमध्ये सातत्य राखलं नसतं तर हा प्रतिसाद मिळाला नसता. त्यामुळे नुसता दर्जावर भर न देता संख्येवरही भर देणे गरजेचे आहे.
- कंटेटचा खेळ : हा आकड्यांचा खेळ आहे. कोणत्याही कंटेट क्रिएटरला विचारा की कोणत्या देशातून जास्त प्रतिसाद मिळतो, सगळे सांगतील की भारतामधून. फेसबुकचे अल्गोरिदम व्हिडीओला फायदेशीर ठरणारे असतात. अल्गोरिदम बदल हे मारकच असतात असे नाही. व्हिडीओ सादरीकरणाची पद्धत दर सहा महिन्यांनी बदलणे गरजेची असते. माझ्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर आहेत. प्रेयसीसोबत ब्रेकअप झाल्यानंतर आम्ही त्याची कारणेही सांगणारा व्हिडीओ बनवला. त्या व्हिडीओनंतर अनेकांची ब्रेकअप झाली.
- अँकर्सची संख्या वाढवा : सर्वोत्तम लोकांना शोधून तयार करून त्यांना व्हिडीओमध्ये समोर आणा. काही लोकांना ऐकावसं वाटतं काही लोकांना ऐकून लोकांना कंटाळा येतो. त्यामुळे लोकां ना ऐकायला आवडतील अशी लोकं आणून लोकांसमोर सादर करा
पाहा VIDEO
मी मुस्लिम देशातील लोकांना आवडतात म्हणून फ्री पॅलेस्टाईनवाले व्हिडीओ केले तर मी यशस्वी होईन, मला खूप फॉलोअर्स मिळतील. मला सुरक्षेची गरज नाही भासणार , पण मी असा विचार करत नाही. सत्य हे थोडं वेगळं असतं. त्यामुळे पाकिस्तानात किंवा इंडोनेशियात बसलेल्या व्यक्तीने या वादाबद्दल मला सांगितलं तर मी ते ऐकणार नाही. कारण मी 30 वर्ष इस्रायलमध्ये घालवली आहे.
माझे मत आहे की दोन देश असायला हवेत मात्र त्याचवेळी पॅलेस्टाईन हा हमासमुक्त, दहशतवादमुक्त आणि कट्टरपंथीयांपासून मुक्त असायला हवा. इस्रायल देश असलाच पाहिजे. मी इस्रायलचा उल्लेख केला की फॉलोअर्स कमी होतात. स्पॉन्सर्स तोंड फिरवतात. असं असतानाही मी यशस्वी झालो, कारण माझे व्हिडीओ हे इतके सुंदर होते की इस्रायलविरोधी असलात तरी तुम्हाला ते बघावेसे वाटतात.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world