जाहिरात

गोव्याचे महाबळेश्वर कनेक्शन, फिरायला जाता मग महाबळेश्वर प्रमाणेच...

आम्हाला आमचे गाव स्वच्छ पाहीजे. जेणेकरून आम्ही पर्यटकांना आकर्षीत करू शकतो.

गोव्याचे महाबळेश्वर कनेक्शन, फिरायला जाता मग महाबळेश्वर प्रमाणेच...
पणजी:

रुपेश सामंत

उत्तर गोव्यातील प्रसिद्ध कळंगुट गावाच्या पंचायत मंडळाने पर्यटकांना त्यांच्या अधिकार क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कळंगुट परिसरात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांना अधिकचा कर द्याला लागणार आहे. कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वरा यांनी गुरुवारी याबाबतची माहिती दिली आहे. शुक्रवारी होणाऱ्या पंचायतीच्या बैठकीत त्यांच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या पर्यटकांना हॉटेल आरक्षणाची पावती असणे किंवा प्रवेशद्वारावर कर भरणे अनिवार्य करणारा ठराव मंजूर केला जाणार आहे. 

हेही वाचा -  हिशेब चुकता! 5 वर्षानंतर डोक्यावरची टोपी काढणार, सत्तार-दानवे वाद पेटणार?

पंचायत हा ठराव घेऊन पुढील कार्यवाहीसाठी पणजी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवेल असेही जोसेफ सिक्केरा यांनी स्पष्ट केले आहे. येत्या पर्यटन हंगामापासून या नियमाची अंमलबजावणी होईल, असे ते म्हणाले. पर्यटक कळंगुट परिसरात मोठ्या प्रमाणात येत असतात. समुद्र किनारी फरतात. पण त्यावेळी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो. तो उचलला जात नाही. या गोष्टी लक्षात घेता पंचायतीने कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा - भाजपने गुजरात जिंकले पण चर्चा मात्र काँग्रेसच्या 'त्या' एकाच उमेदवाराची

कळंगुटची शालीनता जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्हाला आमचे गाव स्वच्छ पाहीजे. जेणेकरून आम्ही पर्यटकांना आकर्षीत करू शकतो. हा कर केवळ पर्यटकांसाठी असणार आहे. स्थानिकांना हा कर द्यावा लागणार नाही असेही  सिक्वेरा यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात महाबळेश्वरमध्येही कर आकारला जातो. त्यात पद्धतीने कर आकरण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. महाबळेश्वर मध्ये येणाऱ्या पर्यटकांनाही शहराच्या हद्दीत आल्यानंतर कर द्यावा लागतो. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com