जाहिरात

ITR Filing Last Date: रिटर्न भरले की नाही ? कधीपर्यंत आहे डेडलाइन ? जाणून घ्या सगळ्या डिटेल्स

Income Tax Return E Verification: आयकर विवरणपत्र सादर केल्यानंतर, 30 दिवसांच्या आत त्याचे ई-व्हेरिफिकेशन करणे अत्यंत आवश्यक आहे.

ITR Filing Last Date: रिटर्न भरले की नाही ? कधीपर्यंत आहे डेडलाइन ? जाणून घ्या सगळ्या डिटेल्स
मुंबई:

Income tax return due date: आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 वरून 15 सप्टेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली होती. नवीन आयकर रिटर्न (ITR) फॉर्म्समध्ये केलेल्या मोठ्या बदलांमुळे आणि त्यासंबंधित प्रणाली सज्जतेसाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) ही मुदतवाढ जाहीर केली होती. 15 सप्टेंबर रोजी सोमवार असून, रिटर्न फाईल करण्यासाठी आता अवघे काही तासच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे ज्या करदात्यांनी अजून रिटर्न फाईल केलेले नाही, त्यांच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.  

नक्की वाचा: AI मुळे सरकारचे 1045 कोटी वाचले; करदात्यांकडून रिटर्नचा झोल, असा झाला उघड

आयकर भरण्यासाठी कोणती कागदपत्रे गरजेची असतात?

  1. आयकर विवरणपत्र भरण्यापूर्वी, खालील कागदपत्रे तयार ठेवावीत, जेणेकरून प्रक्रिया सुलभ होईल
  2. फॉर्म 16: चालू आर्थिक वर्षातील आणि मागील नोकरी बदलली असल्यास त्या वर्षातील नियोक्त्याकडून प्राप्त झालेला.
  3. फॉर्म 26AS: तुमच्या पॅन कार्डवर जमा झालेल्या कराचा तपशील.
  4. AIS (Annual Information Statement): तुमच्या सर्व आर्थिक व्यवहारांची माहिती.
  5. पॅन कार्ड (PAN Card): अनिवार्य.
  6. आधार कार्ड (Aadhaar Card): पॅन कार्डशी लिंक केलेले असणे आवश्यक.
  7. गुंतवणूक पुरावे: जसे की बँक मुदत ठेवी, पीपीएफ (PPF) जमा, भांडवली नफा-तोटा विवरण (Capital Gain P&L statement).
  8. गृहकर्ज व्याज प्रमाणपत्र: जर गृहकर्ज घेतले असेल तर.
  9. विमा हप्ता पावती: भरलेल्या विम्याचा पुरावा.

याशिवाय सर्व स्रोतांकडून मिळालेल्या उत्पन्नाचा समावेश करणंही गरजेचं असतं. आयकर विवरणपत्र भरताना, कर-मुक्त नसलेल्या सर्व उत्पन्नांचा उल्लेख करणे अनिवार्य आहे. पगार, घर मालमत्तेतून मिळणारे उत्पन्न, व्यवसाय किंवा पेशातील नफा या व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने मिळणारे उत्पन्न 'इतर स्रोतांकडून उत्पन्न' या शीर्षकाखाली दाखवावे लागते.

कर प्रणालीनुसार कपाती;e म्हणजेच डिडक्शनचा लाभ कसा मिळेल? 

तुम्ही निवडलेल्या कर प्रणालीनुसार (जुनी किंवा नवीन) लागू असलेल्या कपातींचा दावा करा. नवीन कर प्रणालीमध्ये, गृहकर्जावरील व्याजावर, कलम 80CCD(2) आणि 80CCH अंतर्गत काही कपाती उपलब्ध आहेत. जुन्या कर प्रणालीमध्ये, धर्मादाय संस्थांना दिलेल्या देणग्या, घरभाडे भत्ता (HRA) न मिळणाऱ्यांसाठी घरभाड्यावर सूट, वैज्ञानिक संशोधन किंवा ग्रामीण विकासासाठी दिलेली देणगी, राजकीय पक्ष किंवा निवडणूक ट्रस्टला दिलेली देणगी, ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींवरील व्याज आणि दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या कपातींचा समावेश आहे.

नक्की वाचा: New Tax Regime का जुनी करप्रणाली निवडायची ? सगळा गोंधळ दूर होईल, वाचा सविस्तर बातमी

बँक खात्याचा तपशील तपासा

कर विवरणपत्र भरताना, तुमच्या बँक खात्याचे तपशील, जसे की खाते क्रमांक आणि IFSC कोड, अचूक असल्याची खात्री करा. विशेषतः, जर तुम्हाला कर परतावा (refund) मिळवायचा असेल, तर ही माहिती अचूक असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Income Tax Return कसे भरायचे ?

  1. सर्व आवश्यक कागदपत्रे, जसे की उत्पन्नाचे पुरावे, बँक स्टेटमेंट इत्यादी जमा करा.
  2. आयकर ई-फाईलिंग पोर्टलवरून फॉर्म 26AS आणि AIS डाउनलोड करा. तुमच्या उत्पन्नाशी आणि TDS (Tax Deducted at Source) शी संबंधित तपशील तपासा.
  3. तुमच्या उत्पन्नाच्या रचनेनुसार योग्य ITR फॉर्म निवडा.
  4. उत्पन्न आणि कपातीचा तपशील भरा, ज्यामध्ये बचत, गुंतवणूक आणि गृहकर्जाचा समावेश असेल.
  5. ई-फाईलिंग पोर्टलद्वारे तुमचे विवरणपत्र सादर करा.
  6. ई-व्हेरिफिकेशन (e-verification) पूर्ण करून प्रक्रिया अंतिम करा.

ई-व्हेरिफिकेशन का गरजेचे आहे ?

आयकर विवरणपत्र सादर केल्यानंतर, 30 दिवसांच्या आत त्याचे ई-व्हेरिफिकेशन करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही हे केले नाही, तर तुमचे विवरणपत्र भरलेले मानले जाणार नाही. ई-व्हेरिफिकेशन आधार OTP, EVC, नेट बँकिंगद्वारे किंवा स्वाक्षरी केलेल्या ITR-V ची प्रत पोस्टाने पाठवून करता येते.

मुदतीनंतर इन्कम टॅक्स रिटर्न भरल्यास दंड होतो ?

15 सप्टेंबरची अंतिम मुदत चुकवल्यास, करदात्यांना विलंबित विवरणपत्र (belated returns) भरावे लागेल. यासाठी आयकर कायद्याच्या कलम 234F अंतर्गत दंड आकारला जातो. हा दंड उत्पन्नाच्या पातळीवर अवलंबून असतो. ₹5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या व्यक्तींना ₹5,000 पर्यंतचा दंड लागू शकतो, तर ₹5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांसाठी हा दंड ₹1,000 पर्यंत असू शकतो.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com