जाहिरात

India vs Pakistan : "भारत येत्या 36 तासांत सैन्य कारवाई करणार", पाकिस्तानची तंतरली

Pahalgam Terrorist Attack: पाकिस्तानी मंत्री तरार यांनी म्हटलं की, "पाकिस्तानकडे गुप्तचर यंत्रणांद्वारे माहिती आहे की भारत पहलगाम घटनेत खोट्या आरोपांच्या बहाण्याने पुढील 24-36 तासांत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करण्याचा विचार करत आहे." 

India vs Pakistan : "भारत येत्या 36 तासांत सैन्य कारवाई करणार", पाकिस्तानची तंतरली
Pakistani Minister Ataullah Tarar claims

Pakistani Minister Ataullah Tarar claims : काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचं धाबं दणाणलं आहे. पाकिस्तानने आता स्वतःच दावा केला आहे की, भारत पुढील 36 तासांच्या आत त्यांच्याविरुद्ध लष्करी कारवाई करू शकतोस अशी ठोस गुप्तचर माहिती मिळाली आहे. पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी मंगळवारी 29 एप्रिल रोजी उशीरा सांगितले की, विश्वसनीय गुप्तचर अहवालांवरून असे दिसून आले आहे की भारत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुढील 24 ते 36 तासांत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करण्याची योजना आखत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवाळी काश्मीरमधील प्राणघातक हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी लष्कराला मोकळीक दिल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पाकिस्तानने हा दावा केला आहे. मंगळवारी झालेल्या महत्वाच्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं की, "दहशतवादाचे पूर्णपणे उच्चाटन करणे ही आमची राष्ट्रीय वचनबद्धता आहे. त्यांनी भारतीय सशस्त्र दलांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास  व्यक्त केला. प्रत्युत्तर देण्याची पद्धत, कोणत्या ठिकाणी हल्ला करायचा आणि कोणत्या वेळी करायचा हे ठरवण्याचे पूर्ण अधिकार सशस्त्र दलांना देण्यात आले आहेत."

(ट्रेंडिंग बातमी - काहीतरी मोठे घडणार ? CDS आणि NSA ची पंतप्रधानांसोबत बैठक)

पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यानंतर काही तासांतच माध्यमांशी बोलताना पाकिस्तानी मंत्री तरार यांनी म्हटलं की, "पाकिस्तानकडे गुप्तचर यंत्रणांद्वारे माहिती आहे की भारत पहलगाम घटनेत खोट्या आरोपांच्या बहाण्याने पुढील 24-36 तासांत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करण्याचा विचार करत आहे." 

तरार पुढे म्हणाले, "पाकिस्तान स्वतः दहशतवादाचा बळी राहिला आहे आणि याचे दुःख त्यांना खरोखरच समजते. जगात कुठेही अशा घटना घडल्या तर पाकिस्तानने नेहमीच त्याचा निषेध केला आहे. पाकिस्तान एक जबाबदार देश असल्याने, सत्य उलगडण्यासाठी विश्वासार्ह, पारदर्शक आणि स्वतंत्र चौकशीची मनापासून ऑफर दिली आहे."

(ट्रेंडिंग बातमी - Pahalgam attack: पाकिस्तानचा मोठा डाव फसला, करायला गेले एक अन् झालं भलतचं)

"दुर्दैवाने तर्कशुद्धतेच्या मार्गावर जाण्याऐवजी, भारताने अविवेकीपणा आणि संघर्षाच्या धोकादायक मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचे संपूर्ण प्रदेश आणि त्यापलीकडे विनाशकारी परिणाम होतील. विश्वासार्ह तपासणी टाळणे हे भारताचे खरे हेतू उघड करण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत", असंही तरार यांनी म्हटलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: