जाहिरात

प्रेम होतं सार्थकवर, पण लग्न झालं करणसोबत; 7 दिवसांनी घरी परतलेल्या श्रद्धाची कहाणी एका क्षणात बदलली

Indore Shraddha Missing case: शाहिद कपूर आणि करीना कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'जब वी मेट' हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे.

प्रेम होतं सार्थकवर, पण लग्न झालं करणसोबत; 7 दिवसांनी घरी परतलेल्या श्रद्धाची कहाणी एका क्षणात बदलली
Indore Shraddha Missing case: इंदूरच्या श्रद्धाची गोष्ट सर्वांनाच चक्रावून सोडणारी आहे.
मुंबई:


Indore Shraddha Missing case: शाहिद कपूर आणि करीना कपूर यांची मुख्य भूमिका असलेला 'जब वी मेट' हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील गोष्ट प्रत्यक्षात घडली आहे. मध्य प्रदेशातल्या इंदूरमधली श्रद्धा ही तरुणी एक आठवड्यापासून बेपत्ता होती. ती आता घरी परतीय. ती बेपत्ता झाली त्यावेळी अविवाहित होती. पण, आता ती लग्न करुन परतीलय. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे ती घरातून तिचा प्रियकर सार्थकसोबत लग्न करण्यासाठी पळून गेली होती, पण प्रत्यक्षात करणदीपची वधू बनून परली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया....

ज्याच्याशी लग्न करायचं होतं त्यानेच दिला धोका

 23 ऑगस्ट रोजी इंदूरच्या MIG पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या श्रद्धा तिवारीने तिचा प्रियकर सार्थकसोबत पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण सार्थकने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तरीही ती त्याला भेटायला इंदूर स्टेशनवर पोहोचली. तिथे ती सार्थकची वाट पाहत होती, पण तो आलाच नाही. यानंतर श्रद्धा रागात एका ट्रेनमध्ये बसली. तिच्या भविष्याच्या चिंतेत ती काही तासांच्या प्रवासानंतर रतलामला पोहोचली. तिथे तिने ती ट्रेन सोडली आणि रतलाम स्टेशनवरच बसून राहिली.

( नक्की वाचा : Love Story : पहिल्या मेहुणीशी लग्न, दुसरीसाठीही तोच हट्ट , 33 हजार व्होल्टच्या टॉवरवर तरुणाचा जीवघेणा स्टंट )
 

करणदीपशी केलं लग्न

श्रद्धा रतलाम स्टेशनवर एकटीच बसून होती.  ज्याच्यावर प्रेम केलं, ज्याच्यासाठी घर सोडलं त्या सार्थकनं तिला धोका दिला होता.  आता पुढे काय करायचं. ती याच विचारात असताना तिथे तिला एक तरुण भेटला. त्या तरुणाचं नाव करणदीप होतं. करणदीप इंदूरमध्येच श्रद्धाच्या कॉलेजमध्ये इलेक्ट्रीशियनचं काम करतो. करणदीपने श्रद्धाला एकटी बसलेली पाहिलं तेव्हा तिची चौकशी केली. त्याला संपूर्ण गोष्ट कळल्यावर त्याने श्रद्धाला समजावलं. 'तू घरी परत जायला पाहिजे आणि तुझ्या आई-वडिलांना माहिती द्यायला पाहिजे', असं त्यानं श्रद्धाला सांगितलं. 

पण, श्रद्धानं त्याचं ऐकलं नाही. करणदीपनं बराच काळ समाजवण्याचा प्रयत्न केला, पण श्रद्धा त्याचं ऐकत नव्हती. त्यानंतर करणने तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. परिस्थिती अशी होती की श्रद्धानेही तो प्रस्ताव स्वीकारला.

श्रद्धाच्या वडिलांनी 500 रु. पाठवले

यानंतर दोघांनी महेश्वर-मंडलेश्वरमध्ये लग्न केले आणि त्यानंतर मंदसौरला गेले. गुरुवारी श्रद्धाने तिच्या वडिलांना फोन करून ती मंदसौरमध्ये असल्याची माहिती दिली. यानंतर तिच्या आई-वडिलांनी सुटकेचा श्वास घेतला. कारण ते गेल्या एका आठवड्यापासून त्यांच्या मुलीला शोधण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत होते. त्यांनी माहिती देणाऱ्याला 51 हजार रुपयांचं बक्षीसही जाहीर केलं होतं. तसेच, त्यांनी घराबाहेर तोडगा म्हणून तिचा फोटो उलटा टांगला होता. 

आता मुलगी सुखरुप असल्याचं समजल्यावर श्रद्धाच्या वडिलांनी त्यांना 'हॉटेलमध्ये राहायला खोली घ्या आणि सकाळी परत या' असा सल्ला दिला. हॉटेलवाल्यांनी श्रद्धाला खोली देण्यास नकार दिला. त्यानंतर श्रद्धाच्या वडिलांनी तिला रेल्वे स्टेशनवर जायला सांगितलं. यानंतर तिच्या वडिलांनी करणला 500 रुपयेही ट्रान्सफर केले. त्याच पैशानं श्रद्धा आणि करण इंदूरला आले.

10 दिवस वेगळे राहणार श्रद्धा-करण

सध्या श्रद्धा तिचा नवरा करणदीपसोबत इंदूरला परत आली आहे. घरी परतल्यानंतर तिने MIG पोलीस ठाण्यात तिचा जबाबही नोंदवला आहे, कारण तिच्या घरच्यांनी ती हरवल्याची तक्रार दाखल केली होती. इंदूरचे अतिरिक्त डीसीपी राजेश दंडोतिया यांनी सांगितलं की, सध्या करण आणि श्रद्धा या दोघांचीही चौकशी केली जात आहे.

दुसरीकडे, श्रद्धाचे वडील अनिल तिवारी यांनी सांगितले की, आता श्रद्धा आणि करण यांना 10 दिवस वेगवेगळं ठेवलं जाईल. 10 दिवसांनंतरही श्रद्धा म्हणाली की तिला करणसोबतच राहायचं आहे, तेव्हाच ते या लग्नाला स्वीकारतील आणि दोघांचं पुन्हा थाटामाटात लग्न लावतील. करणकडे कोणतीही कायमस्वरूपी नोकरी नाही, त्यामुळे तो श्रद्धाला पुढे कसं सांभाळणार याचीही त्यांना चिंता आहे. भविष्याची काळजी असली तरी सध्या, श्रद्धाचे आई-वडील मुलगी परत मिळाल्याने खूप आनंदी आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com