जाहिरात

Interfaith Marriage: 'महिलांना सन्मान मिळतो' म्हणत मुस्लीम तरुणी प्रियकरासाठी झाली हिंदू; वाचा थरारक गोष्ट

Interfaith Marriage:  जात-धर्माची बंधनं तोडत प्रेमाचा विजय झाल्याची एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे.

Interfaith Marriage: 'महिलांना सन्मान मिळतो' म्हणत मुस्लीम तरुणी प्रियकरासाठी झाली हिंदू; वाचा थरारक गोष्ट
Interfaith Marriage: हा विवाह यशस्वी झाल्यावर या नववधूचे नवीन नाव 'सीता' ठेवण्यात आले आहे.
मुंबई:

Interfaith Love:  जात-धर्माची बंधनं तोडत प्रेमाचा विजय झाल्याची एक हृदयस्पर्शी घटना उत्तर प्रदेशातील कौशांबी जिल्ह्यातून समोर आली आहे. तब्बल 9 वर्षांच्या प्रेमसंबंधानंतर, एका मुस्लिम तरुणीने आपल्या हिंदू प्रियकराशी विवाह करण्यासाठी धर्म परिवर्तन केले आहे. हा विवाह यशस्वी झाल्यावर या नववधूचे नवीन नाव 'सीता' ठेवण्यात आले आहे.

9 वर्षांचा प्रवास आणि धर्मांतराचा निर्णय

ही हृदयस्पर्शी घटना कौशांबीच्या सिराथू परिसरातील गौसपूर नवावा आणि देवीगंज गावाशी संबंधित आहे. गौसपूर नवावा येथील समरीन आणि देवीगंज येथील अभिषेक सोनी यांची ओळख शालेय जीवनात झाली. हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांचे नाते 9 वर्षे टिकले. मात्र, सामाजिक बंधनं आणि धार्मिक अडथळ्यांमुळे त्यांना लग्न करणे शक्य होत नव्हते.

Latest and Breaking News on NDTV

अखेरीस, समाज आणि कुटुंबाच्या भीतीने दूर जात या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मंझनपुर येथील दुर्गा मंदिरात 'हिंदू रक्षा संघटना' नावाच्या संघटनेच्या मदतीने सप्तपदी पूर्ण केली.

( नक्की वाचा : Menstruation Cycle: मासिक पाळीचा 'हा' Viral Video पाहून डोळ्यात येईल पाणी, या कुटुंबानं जिंकली सर्वांची मनं )
 

'हिंदू धर्मात महिलांना सन्मान मिळतो'

या लग्नानंतर समरीनने अधिकृतपणे हिंदू धर्म स्वीकारला असून, तिचे नवीन नाव सीता ठेवण्यात आले आहे. या निर्णयाबद्दल बोलताना नवरी झालेली सीता (पूर्वाश्रमीची समरीन) म्हणाली, "आमचे प्रेम 9 वर्षे जुने आहे आणि मला हिंदू धर्म खूप आवडतो कारण यामध्ये महिलांना खूप सन्मान दिला जातो."

तर, तिचा पती अभिषेक सोनी याने सांगितले की, दोघांनाही नेहमी एकत्र राहायचे होते आणि अखेरीस त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.

Latest and Breaking News on NDTV

हिंदू रक्षा संघटनेची मोठी मदत


या आंतरधर्मीय विवाहाला यशस्वी करण्यात हिंदू रक्षा संघटनेने महत्त्वाची भूमिका बजावली. या संघटनेचे जिल्हा संयोजक वेद सत्यार्थी यांनी या जोडप्याला मदत केली आणि त्यांच्या विवाहास सहकार्य केले.

ही घटना केवळ दोन प्रेमी युगुलाची कहाणी नाही, तर प्रेम सर्व सीमांच्या पलीकडे असते आणि खऱ्या प्रेमासाठी कुठल्याही अडचणींचा सामना करण्याची तयारी असते, हे दर्शवणारे एक उदाहरण आहे. या निमित्ताने धर्म आणि समाजाच्या रूढीवादी नियमांना एकप्रकारे आव्हान दिले आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com