जाहिरात

BMC Election: 'मुंबईची महापौर ही हिजाब घालणारी मुस्लिम महिला बनेल', 'या' नेत्याच्या वक्तव्याने वातावरण तापणार?

'राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम होते. गव्हर्नर मुस्लिम आहेत. या आधी झाले आहेत. मग मुस्लिम मेयर का बनू शकत नाही.'

BMC Election: 'मुंबईची महापौर ही हिजाब घालणारी मुस्लिम महिला बनेल', 'या' नेत्याच्या वक्तव्याने वातावरण तापणार?
  • एमआयएमचे माजी आमदार वारीस पठाण यांनी मुंबई महापालिकेत ताकदीने निवडणूक लढवण्याचा दावा केला आहे
  • मुंबई महापालिकेत मुस्लिम महिला महापौर होण्याची शक्यता वारीस पठाण यांनी व्यक्त केली आहे.
  • मुंबई महापालिकेत एमआयएम स्वबळावर लढणार असल्याचं त्यांनी जाहीर केले.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

महापालिका निवडणुकींचे पडघम वाजत आहे. सर्वच पक्षांची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. ज्या त्या पक्षाची रणनिती ठरली आहे. उमेदवारांची घोषणा होण्यास सुरूवात झाली आहे.  शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीसह आता एमआयएमची ही चर्चा होवू घातली आहे. एमआयएमचे माजी आमदार आणि नेते वारीस पठाण यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार मुंबईचा महापौर खान, पठाण, सय्यद का होवू शकत नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. शिवाय यावेळी मुंबईची महापौर ही इजाब घालणारी मुस्लिम महिला बनेल असा दावा ही केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत एक ट्वीस्ट निर्माण झाला आहे.     

मुंबई महापालिकेत एमआयएम मजबूत ताकतीने उतरत आहे असं वारीस पठाण म्हणाले.  राज्यातल्या 29 महापालिका निवडणूक लढत असल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईतही जोरदार तयारी असल्याचं त्यांनी सांगितलं. गोवंडीला सात उमेदवार उतरवले आहेत. महाराष्ट्राची जनता एमआयएमला स्वीकारेल. आम्हाला मोठं यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आमची कोणासोबत आघाडी नाही, मागच्या वेळी देखील आम्ही एकटेच लढलो होतो, कोणी आलं तर ठीक आहे नाहीतर आम्ही एकटेच लढणार असं ही ते म्हणाले. 

नक्की वाचा - BMC Election: काँग्रेस वंचितचं ठरलं! मुंबई महापालिकेसाठी जागावाटप निश्चित, कोणाच्या वाट्याला किती जागा?

 मुंबईत ज्या ज्या ठिकाणी एमआयएम लढणार आहे, त्याची लिस्ट दोन दिवसात येईल असं ही त्यांनी स्पष्ट केलं. मुंबईचा महापौर मराठी होणार असं बोललं जातं. पण मुंबईचा महापौर खान, पठाण, सय्यद  का नाही होई शकत? असा प्रश्न त्यांनी केला. तो बनू शकतो असं सांगत ते म्हणाले की आमची इच्छा आहे, मुंबईची महापौर ही इजाब घालणारी मुस्लिम महिला पण बनेल. राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम होते. गव्हर्नर मुस्लिम आहेत. या आधी झाले आहेत. मग मुस्लिम मेयर का बनू शकत नाही. मी तालिबानी पाकिस्तानी मुस्लिम मेयर नाही म्हणलो, मी भारतीय मुस्लिम महिला मेयर बनेल अस म्हणलो आहे असं ही त्यांनी सांगितलं. 

नक्की वाचा - Kalyan Dombivli: KDMC मध्ये शिवसेना भाजप युती तुटणार? मनसे नेत्याने तारीख अन् वेळ ही सांगितली

भाजपला ध्रुवीकरण करायचा आहे. शेतकरी आत्महत्,या विकास यावर त्यांना बोलायचं नाही. यावर त्यांनी नितेश राणे यांच्यावर सडकून टीका केली. वारीस पठाण यांना पाकिस्तामध्ये पाठवू असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यावर बोलताना ते म्हणाले. भारत देश कोणाच्या बापाची जहागीर नाही. आम्ही जिनाची टू नेशन थेरी फेकली आणि भारतात राहीलो.  पुढे त्यांनी राणेंनाच आव्हान देत म्हणाले की वारिस पठाणला पाकिस्तानात पाठवणाऱ्याने अजून जन्म घेतला नाही असं ते म्हणाले. आमचा जन्मा भारतात झाला आणि आम्ही भारतातच मरणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. पुन्हा एकदा त्यांनी मुंबईचा महापौर हा मुस्लिम होईल असं स्पष्ट केलं.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com