जाहिरात
Story ProgressBack
11 days ago
मुंबई:

मन शरीर निरोगी राहण्यासाठी योगा करणे महत्त्वाचे असून भारतीय शास्त्रानुसारही योगाचे अनन्य साधारण महत्त्व मानले जाते आणि त्यामुळेच गेल्या दहा वर्षापासून 21 जून हा जागतिक योगा दिवस म्हणून साजरा केला जातो. या योगा दिवसाच्या पार्श्वभूमीवर देशभरात योगा दिनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई महानगरपालिकेकडून योगा बाय द बे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरवर्षी जगभरात 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्राच्या 177 सदस्य देशांमध्ये योग दिवस साजरा केला जातो. 

Jun 21, 2024 13:32 (IST)
Link Copied

अभिनेता सलमान खान अजूनही महाबळेश्वर येथील वाधवान बंगल्यातच मुक्कामी

अभिनेता सलमान खान अजूनही महाबळेश्वर येथील वाधवान बंगल्यातच मुक्कामी

सलमान खान अजूनही महाबळेश्वरमधील वाधवान यांच्या बंगल्यात मुक्कामी असल्याचे पाहायला मिळत आहे. तापोळा परिसरात एका चित्रीकरणाच्या निमित्ताने तो येथे आल्याची माहिती आहे. कोरोना काळात या बंगल्यात वाधवान कुटुंबीय वास्तव्यास होतं. याच ठिकाणी त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. त्यामुळे हा बंगला चांगलाच चर्चेत आला होता. कडक लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारचे आदेश धुडकावून महाबळेश्वर येथील बंगल्यावर पिकनिकला गेल्याप्रकरणी प्रसिद्ध उद्योगपती कपिल आणि धीरज वाधवान यांच्यासह 23 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. सध्या सलमान खानमुळे हा बंगला चांगलाच चर्चेत आला आहे. 

Jun 21, 2024 12:46 (IST)
Link Copied

अहमदाबादच्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये सांबारमध्ये उंदीर, Video व्हायरल

अहमदाबादच्या प्रसिद्ध रेस्टॉरंटमध्ये आढळलं उंदीर, Video व्हायरल 

Jun 21, 2024 11:17 (IST)
Link Copied

एकनाथ खडसेंनी घेतली अमित शाहांची भेट, लवकरच भाजपमध्ये प्रवेश घेण्याची शक्यता

एकनाथ खडसेंनी घेतली अमित शाहांची भेट, लवकरच भाजपमध्ये प्रवेश घेण्याची शक्यता

एकनाथ खडसे यांनी आज दिल्लीत अमित शाहांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची सून रक्षा खडसेही होत्या. लवकर एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

Jun 21, 2024 10:38 (IST)
Link Copied

सोमवारी MIG क्लबमध्ये मनसेची बैठक,  विधानसभा निहाय आढावा घेणार

विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलावली आहे. राज ठाकरे विधानसभा निहाय आढावा घेणार आहेत. विधानसभेसाठी मनसेकडून निरीक्षक नेमली जाण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी रंगशारदा सभागृह येथे झालेल्या बैठकीत मनसेने स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला होता. त्यानंतर आता पुढील दोन दिवसात मनसेने बैठक बोलावली आहे. 

Jun 21, 2024 10:34 (IST)
Link Copied

मराठवाड्यात 1 जूनपासून वीज पडून 21 जणांचा बळी

मराठवाड्यात 1 जूनपासून आजवर वीज पडून 21 जणांचा बळी गेला आहे. तर 14 जण जखमी झाले असून 308 जनावरे दगावली आहे. तसेच 336 मालमत्तांची पडझड झाली आहे. तर नुकसानग्रस्त कुटुंबातील सदस्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात आहे. मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यात किती मृत्यू झाले?

छत्रपती संभाजीनगर : 01

जालना : 06

परभणी : 01

नांदेड : 04

बीड : 01

लातूर : 05

धाराशिव : 02

Jun 21, 2024 10:31 (IST)
Link Copied

पहाटेच्या सुमारास भीषण अग्नीतांडव; शेतकऱ्यासमोर मोठं संकट

पहाटेच्या सुमारास भीषण अग्नीतांडव, आगीत 2 ट्रॅक्टर, ट्रॉली, चारचाकी वाहन, मोटरसायकल, गहु, बाजरी सर्व जळून खाक

पहाटे झोपेतून उठल्यानंतर शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर घरामागे झालेला अग्नीतांडव बघायला मिळाला. शिरपूर तालुक्यातील जैतापुर येथील एका शेतकऱ्याच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या पत्राच्या शेडला अचानक भीषण आग लागल्याने दोन ट्रॅक्टर, ट्रॉली, मोटरसायकल, चारचाकी वाहन, गहु, मका यांच्यासह शेती उपयोगी साहित्यांची राखरांगोळी झाली.

शिरपूर तालुक्यातील जैतपूर गावात शेतकरी योगेंद्रसिंग पदमसिंग राजपुत हे आपल्या कुटुंबासोबत घरात झोपलेले होते. पहाटे 5 वाजेच्या सुमारास योगेंद्रसिंग राजपुत झोपेतून उठून घराच्या मागील बाजूस आले तेव्हा घराजवळ असलेल संपूर्ण पत्राचे शेड जळून खाक झाल्याचे दृश्य त्यांना बघायला मिळाले. हे बघितल्यानंतर योगेंद्रसिंग राजपुत यांनी आरडाओरड केली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत सर्व काही जळून खाक झाले होते. दोन अग्निशमन बंबाच्या मदतीने आग विझवण्यात आली. पत्राच्या शेडमध्ये असलेले दोन ट्रॅक्टर, ट्रॉली, मोटरसायकल, इंडिका चारचाकी वाहन, गहु, मका यासह शेती उपयोगी साहित्यांची राखरांगोळी झाली आहे. पहाटे 2 ते 3 वाजेच्या दरम्यान आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून आग कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

Jun 21, 2024 08:54 (IST)
Link Copied

नाशिक शहरातील बस सेवा पुन्हा विस्कळीत, कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं प्रवाशांचे हाल

नाशिक शहरातील बस सेवा काही प्रमाणात पुन्हा विस्कळीत झाली आहे. वेतन रखडल्याने तपोवन डेपोतील वाहक कर्मचारी संपावर गेले आहेत. पीएफ, ईएसआयसी आणि पगारी सुट्ट्यांचे पैसे न दिल्यानं वाहक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अचानक वाहक कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. गेल्या वर्षभरातील हा दहावा संप आहे. सिटीलिंकला पूर्ण वेळ मुख्य कार्यकारी अधिकारी नसल्याने अडचणी वाढल्याचं दिसून येत आहे. 

Jun 21, 2024 08:45 (IST)
Link Copied

10 दिवसानंतर मान्सून पुढे सरकला, मुंबई, कोकण, विदर्भात अतिवृष्टीची शक्यता

10 दिवसानंतर मान्सून पुढे सरकला, मुंबई, कोकण, विदर्भात अतिवृष्टीची शक्यता

Jun 21, 2024 08:02 (IST)
Link Copied

लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 9 वा दिवस

लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 9 वा दिवस, सरकारचं शिष्टमंडळ हाकेंची भेट घेण्याची शक्यता, ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणावर उपोषणकर्ते ठाम 

Jun 21, 2024 08:00 (IST)
Link Copied

पालघर जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर, गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

पालघर जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्याना चांगलाच पूर आला आहे. येथील सूर्या नदी देखील दुथडी भरून वाहू लागली आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या नदीवरील बंधारा ओसंडून वाहू लागला आहे. मागील वर्षी या बंधाऱ्याच्या पाणी अडवण्यासाठी लावलेले लोखंडी गेट न काढल्याने या परिसरात मोठी पूर स्थिती निर्माण झाली होती आणि त्याचा फटका सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना बसला होता. यंदा मात्र प्रशासनाने खबरदारी घेऊन लोखंडी गेट काढल्याने पूरस्थिती टळली आहे.

Jun 21, 2024 07:57 (IST)
Link Copied

नितीन गडकरींनी नागपुरात योगा करून साजरा केला योगा दिन

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर
Live Update : अभिनेता सलमान खान अजूनही महाबळेश्वर येथील वाधवान बंगल्यातच मुक्कामी
big bews Delhi High Court suspends delhi cm Arvind Kejriwal bail
Next Article
आजही तिहारमधून सुटका नाहीच, दिल्ली उच्च न्यायालयाकडून केजरीवालांच्या जामीनावर स्थगिती
;