जाहिरात

IOB LBO च्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र मिळण्यास सुरूवात, कसे कराल डाऊनलोड, कधी आहे परीक्षा? वाचा एका क्लिकवर

IOB LBO Admit Card: इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) लोकल बँक ऑफिसर (LBO) 2025 सालासाठीच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र (Admit Card) अधिकृतपणे जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे, ते बँकेच्या iob.in या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही परीक्षा 12 जुलै 2025 रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाईल.

IOB LBO च्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र मिळण्यास सुरूवात, कसे कराल डाऊनलोड, कधी आहे परीक्षा? वाचा एका क्लिकवर
मुंबई:

इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या लोकल बँक ऑफिसर (LBO) या पदासाठी परीक्षा घेणार आहे. या परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी ही एक महत्त्वाची माहिती आहे. परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रवेशपत्र मिळण्यास सुरूवात झाली आहे. ही परीक्षा देण्यासाठी हे प्रवेशपत्र अत्यंत गरजेचे आहे. उमेदवाराच्या पडताळणीसाठी हे प्रवेशपत्र गरजेचे असून या प्रवेशपत्राशिवाय उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.  

( नक्की वाचा: अकरावीमध्ये नापास झाला, पण हिंमत नाही हरला, पाणीपुरीवाल्याचा मुलगा IIT मध्ये पोहोचला )

IOB LBO Admit Card डाउनलोड कसे करावे ?

  1. इंडियन ओव्हरसीज बँकेच्या अधिकृत वेबसाइट iob.in ला भेट द्या.
  2. होमपेजवर 'भरती' (Recruitment) किंवा 'करिअर' (Careers) विभाग शोधा.
  3. 'आयओबी एलबीओ अ‍ॅडमिट कार्ड 2025' या लिंकवर क्लिक करा.
  4. दिलेल्या जागेत तुमचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
  5. माहिती द्या आणि प्रवेशपत्र डाउनलोड करा. 
  6.  प्रवेशपत्र मिळताच त्याची प्रिंट काढून स्वत:जवळ ठेवा. 

( नक्की वाचा: सीबीएसई बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा कशी होणार? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं )

आयओबी एलबीओ परीक्षेबद्दल महत्त्वाची माहिती

आयओबी एलबीओ भरतीमध्ये लोकल बँक ऑफिसर पदाच्या 400 जागा आहेत. उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेली समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा 20 ते 30 वर्षांदरम्यान निश्चित केली आहे, काही सरकारी नियमांनुसार सूट उपलब्ध आहे.  निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन लेखी परीक्षा, स्थानिक भाषेची चाचणी, वैयक्तिक मुलाखत, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे. सर्वसामान्य, ई.डब्ल्यू.एस. आणि ओ.बी.सी. उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क जी.एस.टी.सह 850 रुपये आहे, तर एस.सी., एस.टी. आणि पी.डब्ल्यू.बी.डी. उमेदवारांना 175 रुपये शुल्क भरावे लागेल.

परीक्षा आणि मुलाखत उत्तीर्ण झालेल्या  उमेदवारांना 48,480 रुपये मूळ वेतन मिळेल, ज्यामध्ये वेतनश्रेणीनुसार वाढ होईल. बँकेतर्फे जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचना आणि प्रवेशपत्रामध्ये परीक्षेच्या दिवसासाठीची मार्गदर्शक तत्त्वे आणि सूचना दिलेल्या असतात, जेणेकरून उमेदवारांना परीक्षेच्या दिवशी कोणताही त्रास सहन करावा लागू नये. यामुळे उमेदवारांसाठी प्रवेशपत्र महत्त्वाचे असते. ते वेळीच डाऊनलोड करून प्रिंट काढून ठेवल्यास उमेदवारांना भेडसावणाऱ्या संभाव्य अडचणी टाळता येतात. अधिक माहितीसाठी आणि वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांसाठी iob.in या अधिकृत वेबसाइटला नियमितपणे भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com