Sunil Gavaskar on Rohit Sharma and Virat Kohli : दुलीप करंडक स्पर्धेसाठीच्या संघांची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेत विराट कोहली आणि रोहीत शर्मा (Rohit Sharma and Virat Kohli) हे दोघेही खेळणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र जेव्हा संघांची घोषणा झाली तेव्हा हे दोन्ही क्रिकेटपटू संघात सामील करण्यात आले नव्हते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या दोघांव्यतिरिक्त जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आमि हार्दीक पांड्याही या स्पर्धेत सहभागी झालेले नाहीत. याबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष जय शाह यांनी बोलताना म्हटले की आगामी काळातील मोठ्या मालिका पाहाता भारतीय संघातील प्रमुख क्रिकेटपटूंवर देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी दबाव टाकण्यात आला नव्हता. विराट-रोहीत यांचा दुलीप स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय आणि जय शाह यांची भूमिका यामुळे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर नाराज झाले आहेत.
हे ही वाचा: Vinod Kambli : 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर विनोद कांबळी पहिल्यांदा दिसला, तब्येतीबाबत म्हणाला...
गावस्कर यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये लिहिलेल्या स्तंभामध्ये विराट कोहली आणि रोहीत शर्मा यांच्या दुलीप स्पर्धा न खेळण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की या दोघांचे वय वाढत चालले आहे. फॉर्ममध्ये कायम राहण्यासाठी त्यांनी अधिकाधिक सामने खेळले पाहीजे. हे दोघेही आता T-20 सामने खेळत नाही त्यामुळे फिटनेस कायम राहावा यासाठी आणि फॉर्म टीकवण्यासाठी या दोघांनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेणे गरजेचे आहे. गावस्कर यांनी म्हटलंय की, जसप्रीत बुमराह (Sunil Gavaskar on Jasprit Bumrah) सारख्या गोलंदाजांना पाठीची दुखणी टाळणे गरजेचे असते. तिशीजवळच्या क्रिकेटपटूंना आपला फॉर्म कायम राखण्यासाठी नियमित सामने खेळत राहणे फायदेशीर असते. दीर्घकाळ सामने न खेळल्याने क्रिकेटपटूला पुन्हा आपला फॉर्म गाठण्यासाठी वेळ लागतो.
हे ही वाचा: कमबॅक करावं तर असं... Ishan Kishan चा जोरदार धमाका, टीम इंडियातील जागेवर ठोकला दावा
रोहीत शर्माने या वर्षी मार्च महिन्यात कसोटी सामना खेळला होता. विराटने जानेवारी महिन्यात कसोटी सामना खेळला होता. हे दोघेही त्यानंतर सातत्याने मर्यादीत षटकांचे सामने खेळत आले आहेत. पुढच्या महिन्यापासून बांगलादेशविरोधातील मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत हे दोघेही दिसणार आहेत. विराट आणि रोहीत श्रीलंकेत झालेल्या T20 मालिकेत खेळले होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world