जाहिरात

VIDEO : कंडक्टरची निवृत्त IAS अधिकाऱ्याला मारहाण, त्यानंतर आयुष्यभराची अद्दल घडली

रविवारी जयपूर सिटी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने कारवाई करत कंडक्टर घनश्याम शर्मा याला बसमधील ज्येष्ठ नागरिकाला मारहाण आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित केले.

VIDEO : कंडक्टरची निवृत्त IAS अधिकाऱ्याला मारहाण, त्यानंतर आयुष्यभराची अद्दल घडली

Rajasthan News: राजस्थानच्या जयपूरमध्ये सिटी बसमध्ये निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. बसच्या भाड्यावरून वाद झाल्यानंतर कंडक्टरनेच ही मारहाण केली आहे. याप्रकरणी कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये भाड्यावरून बस कंडक्टर आणि एका वृद्ध व्यक्तीमध्ये भांडण झाले. वृद्ध व्यक्ती झोपी गेल्याने त्यांना त्यांच्या  स्टॉपवर उतरता आले नाही. त्यानंतर पुढील प्रवासासाठी कंडक्टरने अतिरिक्त 10 रुपये मागितले. मात्र मला झोपेतून उठवले का नाही, असं म्हणत वृद्ध व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा दोघांमध्ये वाद सुरू झाला.  

(नक्की वाचा- ताप्ती-गंगा एक्सप्रेसवर दगडफेक; कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण)

दोघांमधील शाब्दिक वाद एवढा वाढला की त्याचं भांडणात रुपांतर झालं. यानंतर कंडक्टरने वृद्धाला मारहाण केली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बसमध्ये कंडक्टरने ज्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली ते निवृत्त आयएएस आरएल मीणा असल्याचं नंतर समोर आलं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राजस्थान पोलिसांनी त्याची दखल घेत कनोटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. 

(नक्की वाचा-  Accident News : मित्रांसोबत महाबळेश्वरला फिरायली निघाले, मात्र वाटेतच मृत्यूने गाठलं)

Latest and Breaking News on NDTV

आरोपी कंडक्टर निलंबित

निवृत्त आयएएस अधिकाऱ्याला मारहाणीची जयपूर सिटी ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिडेटनेही (JSTSL) दखल घेतली. रविवारी जयपूर सिटी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडने कारवाई करत कंडक्टर घनश्याम शर्मा याला बसमधील ज्येष्ठ नागरिकाला मारहाण आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी निलंबित केले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com