जाहिरात

15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, कॅप्टन शहीद; 4 महिन्यात 17 जणांना वीरमरण

15 ऑगस्टच्या आदल्या दिवशी काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, कॅप्टन शहीद; 4 महिन्यात 17 जणांना वीरमरण
श्रीनगर:

जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात बुधवारी (14 ऑगस्ट) दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचा एक कॅप्टन शहीद झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. डोडामध्ये ऑपरेशन असर सुरू आहे, ज्यामध्ये 48 राष्ट्रीय रायफल्सचा कॅप्टन दहशतवाद्यांशी लढत होता. जोरदार गोळीबार होत असताना दहशतवाद्यांचा शोध सुरू असल्याचे व्हाईट नाइट कॉर्प्सने म्हटले आहे. ऑपरेशन दरम्यान मोठ्या प्रमाणात युद्धासाठी लागणारी शस्त्रं जप्त करण्यात आली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, काही दहशतवादी जम्मूच्या उधमपूर जिल्ह्याच्या पटनीटॉप आणि डोडा जिल्ह्याच्या असरच्या बॉर्डरवरील जंगलात लपले आहेत. यानंतर असर ऑपरेशन राबवण्यात आलं. मंगळवारी सायंकाळी 7-8 दरम्यान सुरक्षा दल दहशतवादी आराम करीत असलेल्या त्या खोलीत पोहोचले. तेथे दहशतवाद्यां:नी शस्त्र, दारूगोळी ठेवला होता. ते स्वत:च्या जवळ शस्त्र घेऊन झोपले होते. लष्कराच्या कारवाईनंतर दहशतवादी तेथून पळून गेले. मात्र लष्कराने त्यांच्याकडील शस्त्र जप्त केली आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून लष्करावर वारंवार हल्ले होत आहेत. मे महिन्यापासून 17 जणं शहीद झाले आहेत. आजच्या चकमकीत लष्कराच्या एका कॅप्टनला वीरमरण आलं आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com