जम्मू काश्मीर विधानसभेत (Jammu and Kashmir Legislative Assembly) गुरुवारी मोठी गदारोळ झाला. विधानसभेत 370 वरुन (Article 370) पक्ष आणि विरोधी पक्षांचे आमदार एकमेकांसोबत भिडताना दिसले. कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरुन जम्मू काश्मीर विधानसभेत हा राडा झाल्याचं पाहायला मिळत आहे.
बारामुल्लाचे खासदार इंजिनियर राशिद यांचे बंधू खुर्शीद अहमद शेख यांनी विधानसभेत कलम 370 चा बॅनर दाखवला. खुर्शीद अहमद शेख हे लंगेट विधानसभा मतदारसंघातून अवामी इत्तेहाद पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी बॅनर दाखवल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये धक्काबुक्की आणि मारहाण सुरू झाली. विधानसभेत अशा प्रकारचं बॅनर दाखविल्याबद्दल विरोधी पक्षाचे नेते सुनील शर्मा यांनी विरोध व्यक्त केला. यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेली आणि हा वाद सोडविण्यासाठी मार्शलला हस्तक्षेप करावा लागला. यानंतर विधानसभेचं कामकाज थोड्या वेळासाठी स्थगित करण्यात आलं.
#WATCH | A ruckus breaks out at J&K Assembly in Srinagar after Engineer Rashid's brother & MLA Khurshid Ahmad Sheikh displayed a banner on Article 370. LoP Sunil Sharma objected to this. House adjourned briefly. pic.twitter.com/iKw8dQnRX1
— ANI (@ANI) November 7, 2024
नक्की वाचा - सर्वोच्च न्यायालयाचा मदरशांसंदर्भात महत्त्वाचा आदेश, आदेशामुळे मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा
भाजप नेता रवींद्र रैना या प्रकरणावर म्हणाले, 370 आता इतिहासात जमा झालं आहे. ओमर अब्दुल्ला सरकार पाकिस्तानचं मनोबल वाढवत आहे. 370 कलमाने काश्मिरात दहशतवाद, अलिप्ततावाद आणि पाकिस्तानी मानसिकतेला जन्म दिला. अशात 370 कलम गैरसंविधानिक पद्धतीने विधानसभेत आणून लपून-छपून सादर केला जात आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस पुन्हा जम्मू काश्मिरमधील परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहे. हा भारतमातेच्या पाठीत काँग्रेसने सुरा खुपसला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world