जाहिरात
Story ProgressBack

300 हून अधिक वेळा पराभव; पंडित नेहरूंनी दिलेली उमेदवारीही नाकारली, अद्याप कोणीच तोडला नाही असा रेकॉर्ड

काकांना निवडणूक लढवून रेकॉर्ड करायचा होता. याच कारणामुळे ते आमदारकीपासून राष्ट्रपतीची निवडणूक लढले होते.

Read Time: 2 min
300 हून अधिक वेळा पराभव; पंडित नेहरूंनी दिलेली उमेदवारीही नाकारली, अद्याप कोणीच तोडला नाही असा रेकॉर्ड
नवी दिल्ली:

काका जोगिंदर सिंग यांचा जन्म 1918 मध्ये लाहोर येथे झाला होता. पण फाळणीनंतर काका त्यांच्या कुटुंबासह उत्तर प्रदेशातील बरेली येथे स्थायिक झाले. त्यानंतर काका जोगिंदर सिंग यांनी 1962 पासून प्रत्येक निवडणुकीत उभे राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी विविध राज्यांतील अनेक जागांवरून जवळपास 300 हून अधिक वेळा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली होती.

काका कपड्याचा व्यवसाय करीत होते. ते चर्चेत येण्यामागील कारणं त्यांनी निवडणूक लढवण्याचा आणि हरण्याचा केलेला रेकॉर्ड आहे. तेव्हापासून काकांना धरती पकड नावाने ओळखले जाते. आता ते या जगात नाहीत. मात्र त्यांच्या कहाण्या आजही आवडीने वाचल्या जातात. त्यांच्या मुलाचं म्हणणं आहे की, त्यांना निवडणूक लढवून रेकॉर्ड करायचा होता. याच कारणामुळे ते आमदारकीपासून राष्ट्रपतीची निवडणूक लढले होते. एकदा तर त्यांना तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बरेलीहून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी नकार दिला आणि अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. ते कोणत्याही राज्यातील निवडणूक लढवण्यास तयार होत असे. काही वृत्त माध्यमांनुसार काकांनी 280 हून अधिक वेळा निवडणूक लढवली आहे. त्यांना येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीची प्रतीक्षा असे.

निवडणूक येताच ते सर्वात आधी जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करीत. लोकशाही आणि सामान्य माणसाला महत्त्व पटवून देण्यासाठी आपण निवडणूक लढवत असल्याचं ते म्हणायचे. भागलपूरच्या नागरिकांना पाण्याच्या समस्येपासून दिलासा देण्यासाठी त्यांनी कूपनलिका बसवल्या, त्यामुळेच त्यांना धरती पकड असे नाव देण्यात आले.

काकांनी कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवली नाही. काकांनी राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्याविरोधातही फॉर्म दाखल केला होता. त्यावेळी या पदांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या, पण काकांमुळे होऊ शकल्या नाहीत. त्यांच्या निवडणूक लढवण्याच्या सवयीनंतर आयोगाने कोणत्याही उमेदवाराला दोनपेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढविण्यापासून रोखल्याची माहिती आहे.

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

काकांनी 1962 मध्ये त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर 1998 मध्ये मृत्यूपर्यंत 300 हून अधिक निवडणुका लढवल्या. परंतु सर्व निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला. वारंवार पराभूत होऊनही त्यांचे मनोबल कधीच खचले नाही आणि ते नेहमीच निवडणुकीत भाग घेत राहिले आणि एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. यामुळे थेट गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्यांचं नाव नोंदवण्यात आलं आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination