जाहिरात

धक्कादायक! 'आय लव्ह यू मम्मी, पप्पा...' लिहून 12 वी तील टॉपर मुलीनं संपवले आयुष्य, कारण काय?

NEET aspirant suicide news:रिया ही अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिला 12 वी च्या परीक्षेत तब्बल 97 टक्के मार्क्स मिळाले होते.

धक्कादायक! 'आय लव्ह यू मम्मी, पप्पा...' लिहून 12 वी तील टॉपर मुलीनं संपवले आयुष्य, कारण काय?
NEET Exam 2026 : घटनास्थळावरून पोलिसांना रियाने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे.
मुंबई:

NEET aspirant suicide news: परीक्षांमधील अपयश आणि अभ्यासाचा प्रचंड ताण एका तरुणीचा जीव घेण्यास कारणीभूत ठरला आहे. कारगिल युद्धात देशासाठी लढलेल्या  सैनिकाच्या 23 वर्षांच्या मुलीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. विशेष म्हणजे ही मुलगी अभ्यासात अत्यंत हुशार होती, पण वैद्यकीय प्रवेश परीक्षेत अपयश आल्याच्या नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येपूर्वी तिने आई-वडिलांसाठी एक चिठ्ठी सोडली असून, त्यात तिने 'आय लव्ह यू मम्मी, पप्पा, यात कोणाचीही चूक नाही' असे लिहिले आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तराखंडमधील डेहराडून येथे ही धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना घडली आहे. रिया कुमारी थापा असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव असून, ती 1999 साली झालेल्या कारगिल युद्धातील एका माजी सैनिकाची मुलगी होती. नेहमीप्रमाणे रात्री उशिरापर्यंत अभ्यास करून झोपलेली रिया मंगळवारी दुपारपर्यंत खोलीबाहेर आली नाही. रियाची आई जेव्हा तिला जेवण्यासाठी बोलवायला गेली, तेव्हा आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. संशय आल्याने आईने वडिलांना बोलावले आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, रियाने गळफास लावून आपले आयुष्य संपवल्याचे समोर आले.

( नक्की वाचा : Kalyan News: एका खरेदीनंतर संपले सुखी कुटुंब... कल्याणमधील धक्कादायक हत्येचं कारण उघड )
 

मला माफ करा, कोणाचीही चूक नाही

घटनास्थळावरून पोलिसांना रियाने लिहिलेली एक चिठ्ठी सापडली आहे. तिने हिंदीमध्ये लिहिलेल्या या चिठ्ठीत म्हटले आहे की, आय लव्ह यू मम्मी, पप्पा. या सर्व गोष्टींमध्ये कोणाचीही चूक नाही. वरिष्ठ पोलीस अधिकारी अंकित कंदारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाने चिठ्ठीत आपल्या पालकांबद्दलचे प्रेम व्यक्त केले आहे. आपण स्वतःला सिद्ध करू शकलो नाही, या भावनेतून तिने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे. अभ्यासात यश न मिळाल्याने आलेल्या नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.


( नक्की वाचा : Palghar News : MPSC एकत्र पास झाले, पण एका कारणामुळे बिघडले संबंध, पालघरमध्ये तरुणाचे तरुणीवर सपासप वार )

12 वी मध्ये 97 टक्के मिळवून ठरली होती टॉपर

रिया ही अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिने 12 वी च्या परीक्षेत तब्बल 97 टक्के मार्क्स मिळवून शाळेत अव्वल येण्याचा बहुमान मिळवला होता. तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न होते आणि त्यासाठी ती वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजेच नीट-युजी ची तयारी करत होती. पहिल्या प्रयत्नात तिला यश मिळाले नव्हते, त्यामुळे ती येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट च्या पुनर्रिक्षेची जोरदार तयारी करत होती. ती दररोज रात्री उशिरापर्यंत अभ्यास करायची आणि सकाळी उशिरा उठायची, अशी माहितीही पोलिसांनी दिली आहे. एका हुशार आणि गुणवंत विद्यार्थिनीने अशा प्रकारे जीवन संपवल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
 

Helplines
Vandrevala Foundation for Mental Health9999666555 or help@vandrevalafoundation.com
TISS iCall022-25521111 (Monday-Saturday: 8 am to 10 pm)
(If you need support or know someone who does, please reach out to your nearest mental health specialist.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com