जाहिरात

Uber Shikara ride : दल सरोवरामध्ये ऑनलाइन शिकारा करा बुक, काय आहे उबेरची नवी सर्विस?

दल सरोवरात शिकाऱ्यात बसून थंडीचा आनंद लुटणे ही कल्पनाच स्वर्गसुखाप्रमाणे वाटते.

Uber Shikara ride : दल सरोवरामध्ये ऑनलाइन शिकारा करा बुक, काय आहे उबेरची नवी सर्विस?
मुंबई:

मुंबईसारख्या मोठ्या शहरात टॅक्सी, रिक्षा सेवा देणाऱ्या उबरने आता बोट सेवाही सुरू केली आहे. कश्मीरमधील दल सरोवरात पर्यटक आत उबर अॅपद्वारे बोट बुक करू शकतील. विशेष म्हणजे उबेर अॅपच्या माध्यमातून तुम्ही शिकारा बुक करू शकता. 

भारतीय रेल्वेचं सुपर ॲप लाँच, तिकीट काढण्यापासून जेवणाच्या ऑर्डरपर्यंत सर्व एका क्लिकवर!

नक्की वाचा- भारतीय रेल्वेचं सुपर ॲप लाँच, तिकीट काढण्यापासून जेवणाच्या ऑर्डरपर्यंत सर्व एका क्लिकवर!

दल सरोवरात शिकाऱ्यात बसून थंडीचा आनंद लुटणे ही कल्पनाच स्वर्गसुखाप्रमाणे वाटते. कश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून पर्यटकांसाठी उबरने आता कश्मीरमध्येही आपली सेवा सुरू केली आहे. उबर अॅपद्वारे दल लेकमध्ये फेरफटक्यासाठी शिकारा बुक करणे आता शक्य आहे. 2 डिसेंबरपासून ही सेवा सुरू झाली.

तुर्तास तरी उबेर कंपनी शिकारा सर्विसअंतर्गत कोणतेही शुल्क आकारणार नसल्याची माहिती असून सर्व कमाई शिकारा बोट मालकांना दिली जाईल. यामुळे जम्मू-काश्मीरच्या स्थानिकांसाठी रोजगाराची नवी संधी निर्माण होईल. शिकाऱ्यात एका वेळी चार पर्यटक बसू शकतात. याअंतर्गत एका राईडमध्ये साधारण एक तासभर दल सरोवराचा आनंद घेता येईल. दल सरोवरात जवळपास 4 हजार शिकारे आहेत. उबरच्या या सेवेमुळे ग्राहकांची कोणतीही लूट होणार नाही आणि आम्हालाही आमचे हक्काचे पैसे मिळतील असे शिकारा मालक संघटनेने म्हटलंय.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कसं कराल बुक?  
उबेर अॅपच्या माध्यमातून पर्यटकांना कमाल 15 दिवस आधी आणि किमान 12 तासांपूर्वी शिकारा बुक करावा लागेल. उबेरच्या अॅपमध्येच बुकिंग करता येणार आहे. 

Uber अॅपचा लेटेस्ट वर्जन सुरू करा

व्हेयर टू बारवरुन सुरुवात आणि शेवटपर्यंत शिकारा घाट नंबर १६ निवडा.

Uber Shikara निवडा.

वेळ आणि तारीख निवडा (सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध)

Uber Shikara निवडा. 

पिक-अप लोकेशन घाट १६ असल्याचं मेन्शन करा

बुकवर क्लिक करा आणि दल सरोवरात उबेर शिकाराचा आनंद घेण्यासाठी तयार आहात. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com