Rahul Gandhi Marriage: राहुल गांधी (Rahul Gandhi) कधी लग्न करणार? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. आता त्यांना हा प्रश्न श्रीनगरमधील विद्यार्थिनींनी विचारला. राहुल गांधी श्रीनगरमध्ये पोहोचले होते. काश्मीरमधील विद्यार्थिनींनी त्यांच्यासोबत राजकारण, शिक्षण, रोजगारासह त्यांच्या लग्नाशी संबंधित प्रश्न विचारले. या चर्चादरम्यान एका विद्यार्थिनीने राहुल गांधींना विचारलं की, तुम्ही लग्न करण्याचा विचार करताय का?
राहुल गांधींनी याचे हसत उत्तर दिले की, मी 20-30 वर्षांपर्यंत याचा दबाव सहन केला आहे. चांगली गोष्ट आहे. पण सध्या तरी लग्नाचा विचार नाही. यावर पुढे विद्यार्थिनींनी म्हटले की, प्लीज तुम्ही लग्न करा आणि लग्नासाठी आम्हालाही आमंत्रित करा.
(नक्की वाचा: 'मिस इंडियाच्या यादीत एकही दलित, आदिवासी, OBC नाही'; राहुल गांधींचा दावा - भाजपचा जोरदार हल्ला)
The women of Kashmir have strength, resilience, wisdom and a whole lot to say.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) August 26, 2024
But are we giving them a chance for their voices to be heard? pic.twitter.com/11Te8MM5fH
राहुल गांधी कधी करणार लग्न?
लग्न कधी करणार हा प्रश्न राहुल गांधींची पाठ काही सोडत नाहीय. यापूर्वीही त्यांना अनेकदा हा प्रश्न विचारण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान रायबरेली लोकसभा मतदारसंघातील महाराजगंज येथील मेला मैदानामध्ये आयोजित सभेला संबोधित केल्यानंतर उपस्थितांनी त्यांना विचारले की, 'तुम्ही लग्न करणार आहात?'. यावर राहुल गांधींनी उत्तर दिले होते की, 'आता लवकरच करावे लागेल...' त्यांचे उत्तर ऐकल्यानंतर उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.
(नक्की वाचा: 4 वर्षांनंतर राम माधव पुन्हा मैदानात; 2014 ची जादू पुन्हा दाखवता येणार? पक्षाकडून मोठी जबाबदारी!)
भारत जोडो यात्रेदरम्यानही बिहारमध्ये एका सहा वर्षांच्या मुलाने राहुल गांधींना लग्नाबाबत प्रश्न विचारला. यावर राहुल गांधींनी मुलाला म्हटले होते की, आता तर मी काम करत आहे, जेव्हा काम संपेल तेव्हा लग्न करेन. लहान मुलाचा हा प्रश्न ऐकल्यानंतर राहुल गांधींना आश्चर्याचा धक्का बसला होता. अर्श नवाज असे मुलाचे नाव होते आणि तो यू-ट्युबर होता. राहुल गांधींनी या मुलाचाही व्हिडीओ शेअर केला होता.
(नक्की वाचा: 'मुंबईतले स्मारक होत नाही, त्या आधी महाराजांचा सर्वात उंच पुतळा सिंधुदुर्गात उभारणार')
मुंबईतलं शिवरायांचं प्रस्तावित स्मारक मालवणमध्ये? केसरकरांचा प्रस्ताव...राऊतांची मोदींवर जहरी टीका
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world