वाल्मिक कराडची प्रकृती अचानक बिघडली आहे. कराडच्या तपासणीसाठी वैद्यकीय पथक कारागृहात दाखल झालं आहे. बीड जिल्हा रूग्णालयाच्या पथकाकडून कराडची तपासणी करण्यात आली आहे. दुसरीकडे काश्मीर पहलगाममधील भ्याड हल्ल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. या हल्ल्यातील पीडित कुटुंबाला आधार देण्यासाठी सरकारने पावलं उचलावीत अशी मागणी केली जात आहे.
उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. विद्याविहार- ठाणेदरम्यान पाचव्या-सहाव्या मार्गिकवर, तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी- चुनाभट्टी/वांद्रेच्या अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Pune News: पहलगाम हल्ल्याचा निषेध: पुण्यात ‘हिंदू रक्षा मोर्चा’चे आयोजन
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तसेच पश्चिम बंगालमध्ये हिंदूंच्या झालेल्या हत्याकांडाच्या विरोधात पुण्यात ‘हिंदू रक्षा मोर्चा’चे आयोजन करण्यात आले आहे.
‘सकल हिंदू समाज, पुणे शहर’ यांच्या वतीने हा मोर्चा येत्या सूरू आहे.
मोर्चाची सुरुवात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून होऊन फडके हौद चौक इथ पर्यंत होत आहे
आयोजकांनी सर्व हिंदू बांधव आणि भगिनींना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते
Pune News: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मेळाव्याचे आयोजन
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे मेळाव्याचे आयोजन
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस "सशक्त संघटन" मेळावा
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत मेळावा
महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केलं मेळाव्याचे आयोजन
LIVE Updates: कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये एकाची हत्या, मुलगा जखमी
कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये धक्कादायक प्रकार
वयोवृद्धाची हत्या आणि मुलाला केले जखमी
मयत वयोवृद्धाचे नाव चिमण लाल कालरा जखमी मुलाचे नाव कार्तिक कालरा
कैचीने भोसकून केली हत्या
केळीच्या पानावरून झाला होता वाद
बाजारपेठ पोलिसांनी आरोपी चिराग सोनी केली अटक
Live Update : काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबीयांसाठी सुप्रिया सुळेंच्या सरकारकडे मागण्या
जम्मू काश्मीर राज्यातील पहलगाम येथील भ्याड अतिरेकी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरीकांच्या कुटुंबीयांनी हिंमतीने संपूर्ण प्रसंगाचा सामना केला. म्हणूनच त्यांना येत्या एक मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने 'नागरी शौर्य' पुरस्कार देऊन गौरविण्यात यावे. यासोबतच त्यांच्या… pic.twitter.com/Wa9wtcF4l1
— Supriya Sule (@supriya_sule) April 27, 2025
Live Update : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी आरोपीच्या आईला अंतरिम जामीन मंजूर
अल्पवयीन आरोपीची आई शिवानी अग्रवालला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला असून अनेक अटी शर्तीवर हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिवानी अग्रावालला दर बुधवारी 11 ते 1 या वेळेत येरवडा पोलीस ठाण्यात हजर राहणे बंधनकारक असणार आहे. शिवानी अग्रवालला स्वतःच्या मोबाईलचं लोकेशन सतत सुरू ठेवणे देखील बंधनकारक असणार आहे.
Live Update : वाशिमच्या शेंदुरजना मोरे येथील सुपुत्राचा अपघाती मृत्यू, गावावर शोककळा
वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील शेंदुरजना मोरे गावचे सुपुत्र आणि भारतीय लष्करात (बीएसएफ) सेवेत असलेले जवान वासुदेव संभाजी शेळके (वय ३८) यांचे दुर्दैवी कार अपघातात निधन झालं.
Live Update : वाढत्या तापमानाचा द्राक्षाच्या बागेवर परिणाम
हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तापमानामध्ये मोठी वाढ झालेली आहे. सध्या तापमानाचा पारा 41 ते 42 अंशावर पोहोचला आहे. आणि या वाढत्या उन्हाचा परिणाम द्राक्षाच्या बागेवर होत असून द्राक्ष फळावर काळे डाग पडत आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे. सध्या अंगूरला बाजारपेठेमध्ये मागणी आहे. मात्र काळे डाग असलेले द्राक्ष व्यापारी घेत नसल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.
Live Update : क्रिकेट आयपीएलवर लाखोंचा सट्टा, स्थानिक गुन्हे शाखेकडून तिघांना अटक
वर्ध्याच्या भिडी परिसरात स्थानीक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असतांना भिडी येथे आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणे सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने त्याच्या आधारे केलेल्या कार्यवाहीत 3 जणांना अटक करण्यात आली.
Live Update : बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील तिसऱ्या आरोपीला बेड्या
बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील तिसरा आरोपी सुरज उर्फ बापू दशरथ गोसावी ला अखेर बेड्या ठोकण्यात पुणे ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. तब्बल सात महिन्यांपासून बापू गोसावी हा पोलिसांना गुंगारा देत होता, अखेर वालचंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे आणि त्यांच्या पथकाने बापू गोसावी ला अकलूज मधून शनिवारी दुपारी चारच्या सुमारास गजाआड केले. रात्री उशिरा बापू गोसावी ला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचकडे देण्यात आल आहे.
Live Update : पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ भारत सोडा अन्यथा कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
पाकिस्तानी नागरिकांनी तत्काळ भारत सोडा अन्यथा कठोर कारवाई करणार, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
हल्ल्यातील 6 कुटुंबीयांना सरकार निश्चित मदत करणार असल्याचीही ग्वाही आहे. पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याची नोटीस देण्यात आली असून देशाच्या सुरक्षेसाठी कठोर निर्णय घेण्यात येणार आहे.