जाहिरात

Kerla Accident : बस आणि कारची जोरदार धडक, 5 मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू

Kerla Accident : केएसआरटीसी बसमध्ये प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधिकारी अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत.

Kerla Accident : बस आणि कारची जोरदार धडक, 5 मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू

केरळमधील अलप्पुझा येथील कालारकोड येथे कार आणि बसमध्ये भीषण टक्कर झाली. अलप्पुझा येथील कालारकोड येथे झालेल्या या भीषण अपघातात पाच वैद्यकीय विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भरधाव बसने कारला धडक दिल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. मुहसीन मुहम्मद, इब्राहिम आणि देवन अशी मृतांची नावे आहेत. सर्वजण एमबीबीएस प्रथम वर्षाचे विद्यार्थी होते.  अलाप्पुझा येथील कालारकोडू येथे 2 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता घडली. हा अपघात झाला तेव्हा मुसळधार पाऊस पडत होता.  मुसळधार पाऊस आणि कमी दृश्यमानता यामुळे हा अपघात झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

( नक्की वाचा : एक सस्पेन्स संपला : राज्याच्या मुख्यमंत्र्याआधी उपमुख्यमंत्री ठरला ! तटकरेंचे स्पष्ट संकेत )

बस आणि कारची धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर तरुणांना कार कापून लोकांनी बाहेर काढण्यात आले. दोन गंभीर जखमी विद्यार्थ्यांना वंदनम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत कोझिकोड, कन्नूर, चेरथला आणि लक्षद्वीप येथील रहिवासी आहेत. 

( नक्की वाचा : महायुतीच्या नेत्यांना मंत्री होण्यासाठी द्यावी लागेल अमित शाहांची टेस्ट, वाचा काय असतील प्रश्न )

केएसआरटीसी बसमध्ये प्रवास करणाऱ्या चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस अधिकारी अपघाताच्या कारणाचा तपास करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com