जाहिरात

Love Jihad: फेसबुकवर मैत्री, 11वीची विद्यार्थिनी जाळ्यात, बनावट ओळख उघड होताच भयंकर 'कांड'

'बेबी राजा'चे खरे नाव नियाज अहमद खान असल्याचे विद्यार्थिनीला समजले.

Love Jihad: फेसबुकवर मैत्री, 11वीची विद्यार्थिनी जाळ्यात, बनावट ओळख उघड होताच भयंकर 'कांड'

उत्तर प्रदेशातील कानपूर शहरात 'लव्ह जिहाद'चा (Love Jihad) एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील मुस्लिम समाजातील एका तरुणाने सोशल मीडियावर (Social Media) खोटी ओळख सांगून एका हिंदू विद्यार्थिनीला आपल्या जाळ्यात ओढले. या आरोपीने विद्यार्थिनीचे शारीरिक शोषण (Sexual Exploitation) करण्यासह, तिचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो वापरून तिला जबरदस्तीने धर्म परिवर्तन (Forced Conversion) करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपी नियाज अहमद खानला अटक केली असून, त्याच्यावर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

'बेबी राजा' नावाचे फेसबुक अकाउंट
कल्याणपूर पोलिस ठाण्याच्या (Kalyanpur Police Station) हद्दीतील ही घटना आहे. 11वी इयत्तेत शिकणाऱ्या पीडित विद्यार्थिनीची दोन वर्षांपूर्वी आरोपीसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली होती. आरोपीने फेसबुकवर आपले खाते 'बेबी राजा' या नावाने उघडले होते. या बनावट नावाने त्याने विद्यार्थिनीशी मैत्री केली. पुढे या दोघांच्या मैत्रिचे रूपांतर प्रेमात झाले. दोघे ही एकमेकांच्या जवळ आले. 

नक्की वाचा - किस्सा अंडरवर्ल्डचा , गँगस्टर ते शायर! दाऊदचा हस्तक रियाज सिद्दीकीची भन्नाट कहाणी

हॉटेलमध्ये बोलावून शोषण
'बेबी राजा'चे खरे नाव नियाज अहमद खान असल्याचे विद्यार्थिनीला समजले. त्यानंतर तिने त्याला टाळण्यास सुरूवात केली. शिवाय त्याला भेटण्यासही विरोध केला. यानंतर, नियाजने माफी मागण्याच्या बहाण्याने तिला द्विवेदी मेंशन हॉटेलमध्ये (Hotel) बोलावले. तिथे कोल्ड्रिंकमध्ये नशेता पदार्थ (Drug) मिसळून त्याने विद्यार्थिनीला पाजला. ज्यामुळे ती शुद्ध हरपून बसली. याच संधीचा फायदा घेऊन नियाजने तिचे शारीरिक शोषण केले. त्याचबरोबर तिचे आक्षेपार्ह व्हिडिओ व फोटो काढले, असा पीडित मुलाचा आरोप आहे.

ब्लॅकमेलिंगला सुरूवात 
घरी परतल्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून आरोपीने व्हिडिओ व्हायरल (Viral) करण्याची धमकी देण्यास सुरूवात केली. त्या माध्यमातून तो विद्यार्थिनीला ब्लॅकमेलिंग (Blackmailing) करू लागला. त्याने तिच्यावर जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्याचा दबाव टाकण्यास सुरुवात केली असं ही तिचे म्हणणे आहे. या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीने अखेरीस कुटुंबीयांना घडलेली हकीकत सांगितली. रावतपूर पोलिसांनी (Rawatpur Police) तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने, कुटुंबीयांनी थेट पोलिस आयुक्तांची (Police Commissioner) भेट घेतली. आयुक्तांनी तात्काळ दखल घेत नियाज अहमद खानला अटक करण्याचे आदेश दिले.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com