जाहिरात

Kalyan Crime: अरबाजकडून ब्लॅकमेलिंग, घरातलं सोनं घेऊन दोघी बहिणी गायब, कल्याणमध्ये लव जिहाद?

व्हायरल करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन्ही मुली त्याच्याच ताब्यात असल्याचा दावाही मुलींच्या आई वडिलांनी केला आहे. 

Kalyan Crime: अरबाजकडून ब्लॅकमेलिंग,  घरातलं सोनं घेऊन दोघी बहिणी गायब, कल्याणमध्ये लव जिहाद?

Kalyan Love Jihad Crime:  भिगवणमधील कथित अपहरण प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली होती. हा लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा आरोप करत हिंदुत्त्ववादी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली होती. हे प्रकरण चर्चेत असतानाच कल्याणमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कल्याणमध्ये दोन सख्या बहिणी गायब झाल्या असून आई वडिलांनी हा लव्ह जिहाद असल्याचा आरोप केला आहे. 

अरबाजचे ब्लॅकमेलिंग, दोन सख्ख्या बहिणी गायब

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कल्याण पूर्वेत दोन सख्या बहिणी घरामधून दागिने घेऊन बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दोन बहिणींपैकी एकीचे एका मुस्लिम तरुण अरबाज खान याच्याशी प्रेमसंबंध होते. अरबाजने या दोन बहिणींना गायब गेल्याचा संशय तरुणींचा नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. परंतू अरबाज हा घरीच आहे. पोलिसांनी त्याची चौकशी देखील केली आहे.

या तपासादरम्यान दरम्यान एका तरुणीच्या कपड्यात एका राठोड नावाच्या तरुणाचा नंबर आढळून आला आहे. त्या नंबरच्या आधारे या दोन बेपत्ता बहिणींचा शोध विठ्ठलवाडी पाेलिस घेत आहेत. बेपत्ता तरुणी मागे लव जिहाद अँगल आहे का ? आणखीन दुसरी काही कहानी आहे याचा खुलासा पोलिस तपासात होणार आहे.

Accident News: लाखोंची स्पोर्ट्स बाईक, वाऱ्याचा वेग.. 3 तरुणांचा जीव गेला; गाडीचे तुकडे उडाले

कल्याण पूर्वेतील एका चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या दोन सख्या बहिणी अचानक बेपत्ता झाल्या. घरच्या लोकांनी शोधाशोध सुरु केली. यातील एकतरुणीचा संबंध कल्याणमध्ये राहणारा तरुण अरबाज खान याच्याशी होता. अरबाजने त्या तरुणी सोबत काही गैरप्रकार केल्याचा आराेप केलं गेलं होतं. या तरुणींच्या बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर त्यांच्या घरच्या लोकांना संशय आहे की, अरबाजनेच त्या दोघींना गायब केले आहे.

हे प्रकरण लव जिहादचे प्रकरण आहे. पोलिसांनी त्या अँगलने तपास सुरु केला . मात्र पोलीस तपासा दरम्यान अरबाज खान हा त्याच्या घरीच आहे ही माहिती समोर आली. विठ्ठलवाडी पाेलिसांनी त्याची चौकशी केली आहे. त्या दोघींपैकी एकीसोबत माझे प्रेमसंबंद होते. आमचा ब्रेकअप झाला आहे. आत्ता आम्ही संपर्कात नाही. या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही. असा जवाब अरबाज खान याने पोलिसांना दिला आहे

लव्ह जिहादचा आरोप

दुसरीकडे पोलीस तपासात अशी माहिती समोर आली आहे की, दुसऱ्या बहिणीकडे एका राठोड नावाच्या तरुणाचा नंबर होता. राठोड याचा नंबर बंद आढळून येत आहे. राठोड हा बेपत्ता आहे. पाेलिस त्याचा शोध घेत आहेत.  अरबाज घरी असल्याने नक्की या दोन सख्या बहिणी कुठे आहेत ? या मध्ये लव जिहादचा काही अँगल आहे  का ? राठाेड नावाचा तरुण कोण  आहे ? तो कुठे आहे ? या दोन सख्या बहिणीं च्या राठोड सोबत काय संबंध आहे? या दोन सखी बहिणी सोबत काय घडले आहे याचा तपास सध्या विठ्ठलवाडी पोलिस करीत आहे. या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास व्हावा. त्या बहिणींचा पोलिसांना शोध घ्यावा. यातील सत्य बाहेर यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे.

Nagpur Factory Blast: नागपुरात भयंकर दुर्घटना! भीषण स्फोटात 15 जणांचा मृत्यू; 18 कामगार जखमी

दरम्यान, हा लव्ह जिहाद असून हिंदू मुलींचे शोषण केले जात असल्याचा आरोप दुर्गेश बागुल यांनी केला आहे. दुसरीकडे, गायब झालेल्या तक्रारी संबंधी पोलिसांकडे चौकशी केली असता पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली नसून त्या मुली पळून गेल्या आहेत असे उत्तर देत मिसिंग दाखल केली असल्याचे सांगितले आहे.  संशयित तरुणाची चौकशी सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कोळी यांनी दिली आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com