Crime News: फेसबूकवर मैत्री, 100 किमीचा प्रवास; तरुणीला भेटायला गेलेल्या तरूणासोबत भयंकर घडलं

रीवा जिल्ह्यातील एका तरुणाची फेसबुकवर माऊगंज येथील एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री झाली होती. तिला भेटण्याच्या उद्देशाने हा तरुण तब्बल 100 किलोमीटरचा प्रवास करून शनिवारी तिच्या गावात पोहोचला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Madhya Pradesh Crime News : फेसबुकवर मैत्री झालेल्या एका मुलीला भेटायला जाणे एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तरुणाला तरुणीच्या कुटुंबीयांनी तब्बल 13 तास बांधून ठेवत अमानुष मारहाण केली. संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली असून, याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मध्य प्रदेशातील मऊगंज जिल्ह्यातील पिप्राही गावात ही घटना घडली. रीवा जिल्ह्यातील एका तरुणाची फेसबुकवर माऊगंज येथील एका अल्पवयीन मुलीसोबत मैत्री झाली होती. तिला भेटण्याच्या उद्देशाने हा तरुण तब्बल 100 किलोमीटरचा प्रवास करून शनिवारी तिच्या गावात पोहोचला. मात्र, मुलीला भेटायला आल्याचे समजताच तिच्या कुटुंबीयांनी त्याला पकडले. त्यांनी त्याचे हात-पाय दोरीने बांधले आणि त्याला एका ठिकाणी बसवून अमानुष मारहाण केली. शनिवारी रात्री 9 वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजेपर्यंत, म्हणजेच तब्बल 13 तास ही मारहाण सुरू होती, असे पोलिसांनी सांगितले.

(नक्की वाचा-  गळफास घेण्याचा प्रयत्न फसला; सिलिंडरमध्ये कात्री खुपसून CA च्या विद्यार्थ्याचं धक्कादायक पाऊल)

तरुणाला मारहाणीची ही संपूर्ण घटना तरुणीच्या कुटुंबीयांनी मोबाईलवर शूट केली. यानंतर व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. पोलिसांना याबाबत सांगितले की, "व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुलगा बैकुंठपूरचा असून, फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर तो अल्पवयीन मुलीला भेटण्यासाठी आला होता. आतापर्यंत हनमाना पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. तरीही, आम्ही पोलीस ठाण्याच्या प्रभारींना या घटनेची संपूर्ण माहिती गोळा करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत."

(नक्की वाचा - Delhi Triple Murder: चाकूने भोसकले, विटांनी ठेचले... दिल्लीत मुलानेच आई-वडील आणि भावाची केली हत्या)

डिजिटल युगात मैत्री करणे सोपे झाले असले, तरी अनोळखी व्यक्तींना भेटायला जाताना विशेष काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, लवकरच या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोषींवर कारवाई केली जाईल अशी अपेक्षा आहे.

Advertisement

Topics mentioned in this article