एकीकडे उन्हाचा पारा वाढत असताना दुसरीकडे राज्यात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. सोबतच धरणांमधील पाणीसाठा देखील झपाट्याने कमी होत आहे. राज्यातील मोठे, मध्यम व लघु अशा 2 हजार 997 सिंचन प्रकल्पात अवघा 33.37 टक्केच जलसाठा शिल्लक आहे. तापमानाचा पारा वाढत असून, एप्रिलपेक्षाही मे महिन्यात अधिक उष्णतेच्या झळा बसत आहेत. त्यामुळे प्रकल्पांतील पाणी पातळी आणखी खालावली जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे टँकरचा आकडा देखील वाढत आहे. राज्यातील 19 जिल्ह्यांतील 758 गावे व 2257 गावांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. 57 शासकीय आणि 879 खासगी टॅकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तर हा आकडा वाढण्याचा देखील शक्यता आहे.
भारतीय संरक्षण संस्थांवर सायबर हल्ला; पाकिस्तान सायबर फोर्सचा दावा
पाकिस्तान सायबर फोर्स या ट्विटर खात्यामार्फत दावा करण्यात आला आहे की, त्यांनी भारतीय लष्कर अभियांत्रिकी सेवा (Military Engineering Service) आणि मनोहर पर्रीकर संरक्षण अध्ययन आणि विश्लेषण संस्थेच्या (MP-IDSA) संवेदनशील माहितीमध्ये घुसखोरी केली आहे. या हल्ल्यात संरक्षण कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती आणि लॉगिन तपशील चोरण्यात आल्याचा संशय आहे.
पाकिस्तानचा आता कायमचा बंदोबस्त होणार- एकनाथ शिंदे
पाकिस्तानचा आता कायमचा बंदोबस्त होणार आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ज्या दिवशी पहलगाम या ठिकाणी बेकसुर निरपराध लोकांना गोळ्या घालण्याचं पाप केलं तेव्हापासून या देशातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. हा भारत पूर्वीचा भारत नाही. हा घुसके मारेंगे वाला भारत आहे. याची प्रक्रिया सुरू झाली आहे असं ही ते म्हणाले.
भारत- पाकिस्तानने संयम राखावा, संयुक्त राष्ट्राच्या सचिवांचे आवाहन
भारत- पाकिस्तानने संयम राखावा असे आवाहन संयुक्त राष्ट्राच्या सचिवांनी केले आहे. शिवाय त्यांना पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध ही केला आहे. दोन देशांनी सध्याच्या स्थितीत संयम ठेवावा असं ही ते म्हणाले.
पंतप्रधान कार्यालयात उच्चस्तरीय बैठकांचा धडाका, राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीला
पंतप्रधान कार्यालयात उच्चस्तरीय बैठकांचा धडाका लावला आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीला पंतप्रधान कार्यालयात गेले आहेत. या भेटीत नव्या सीबीआय प्रमुखाच्या निवडीबाबत चर्चा केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय पहलगाम हल्ल्याबाबतही या दोन नेत्यांत चर्चा होण्याची शक्यता आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची घेतली भेट
देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची घेतली भेट घेतली आहे. त्यांनी शहा यांच्या बरोबर राज्यातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली.
जपानचे संरक्षणमंत्री नाकातानी यांच्या भारत भेटीत द्विपक्षीय संरक्षण सहकार्य
जपानचे संरक्षणमंत्री नाकातानी यांच्या भारत भेटीत द्विपक्षीय संरक्षण सहकार्य, प्रादेशिक सुरक्षेवर चर्चा झाली. शिवाय त्यांनी पहलगाम हल्ल्यावर भारतास पाठिंबा दिला आहे. भारताच्या दौऱ्यावर आलेले जपानचे संरक्षणमंत्री जन नाकातानी यांची भारताचे संरक्षणमंत्री यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक पार पडली. या भेटीमध्ये भारत आणि जपान यांच्यातील विशेष, रणनीतिक आणि जागतिक भागीदारीला बळकटी देण्यावर भर देण्यात आला.
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्या चर्चा
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्या चर्चा झाली आहे. ही चर्चा दुरध्वनीवरून झाली. ही चर्चा नक्की काय झाली याचा तपशील अजून बाहेर आला नाही. त्यामुळे पुतीन आणि मोदी यांच्या चर्चेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Live Update : पुरंदर विमानतळाला बाधित गावातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, आंदोलक आणि पोलिसांमध्ये राडा
पुण्याच्या पुरंदरमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ होऊ पाहतेय. यासाठी तब्बल 2673 हेक्टर भूसंपादन केलं जाणार आहे. मात्र या भूसंपादनाला सात बाधित गावातील शेतकऱ्यांनी कडाडून विरोध दर्शवलाय. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून यासाठी ड्रोन सर्वेक्षणचं काम हाती घेण्यात आलं होतं. मात्र गेल्या दोन दिवसापूर्वी पुरंदरच्या कुंभारवळण परिसरात बाधित गावातील शेतकऱ्यांनी बैलगाड्यांसह रास्ता रोको करत हा ड्रोन सर्वे हाणून पाडला.
Live Update : 'नानाची टांग' नाना पाटेकरांकडून उपमुख्यमंत्र्यांचं कौतुक, मनसे नेत्याचं ट्वीट व्हायरल
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी विधान केलं आहे. त्याची स्तुती केली. यावर मनसे नेते राजू पाटील यांनी एक ट्वीट करीत नाना पाटेकर यांच्यावर टीका केली आहे. राजू पाटील यांनी 'नानाची टांग' असं ट्वीट केलं आहे. त्यांचे हे ट्वीट चर्चेचा विषय ठरला आहे.
Live Update : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा
Live Update : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिल्ली दौरा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला येणार असल्याची सूत्रांची माहिती
देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत महत्त्वाची बैठक
महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अनुषंगाने प्रशासकीय बैठका
Live Update : कल्याणमधील महिलेची 17 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या
17 व्या मजल्यावरून उडी मारून महिला आत्महत्या प्रकरण
महिलेची ओळख पटली असून मितू गबा असे मृत महिलेचं नाव आहे
ही महिला मुलुंडला राहत होती
मानसिक रुग्ण असल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती
Live Update : अजित पवार अन एकनाथ शिंदेंमध्ये दुरावा कायम? एकमेकांच्या कार्यक्रमाकडे फिरवली पाठ
अजितदादा अन शिंदेंमध्ये दुरावा कायम? एकमेकांच्या कार्यक्रमाकडे फिरवली दोघांनीही पाठ
पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी आयोजित केलल्या महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाला उपमुख्यमंत्री अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांची गैरहजेरी लावली होती. अजित पवारांनी मुख्ममंत्रीपदाची इच्छा व्यक्त करताच मविआकडून पुन्हा ऑफर देण्यात आली असून एकनाथ शिंदेंचा उल्लेख करत विनायक राऊतांनी अजित पवारांना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली.
Live Update : दहशतवाद पोसणाऱ्या पाकिस्तानला तुर्कीचा पाठिंबा, तुर्कीची युद्ध नौका कराची बंदरावर दाखल
तुर्की नौदलाचे जहाज TCG BÜYÜKADA पाकिस्तानमधील कराची बंदरात पोहोचले.
तुर्कीच्या परराष्ट्र धोरण तज्ञांनी ओमानला अशाच प्रकारच्या भेटीनंतर ही नेहमीची बंदर भेट असल्याचे सांगत याला कमी लेखले आहे.
पाकिस्तानने याला तुर्की नौदलाची सदिच्छा भेट म्हटले आहे. या वेळेमुळे लोक हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.
Live Update : सोलापूर महापालिकेच्या बीफ मार्केट आणि कत्तलखाना बांधण्याच्या जाहिरातीवर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
सोलापूर महापालिकेच्या बीफ मार्केट आणि कत्तलखाना बांधण्याच्या जाहिरातीवर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
- महापालिकेच्या बीफ मार्केटच्या जाहिरातीनंतर आमदार देवेंद्र कोठे यांची मध्यस्ती
Live Update : मुंबईतील पेडर रोड परिसरातील शोरूमला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल
मुंबईतील पेडर रोड परिसरातील शोरूमला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल
Live Update : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर, इंदापूरच्या श्री छत्रपती कारखानाच्या प्रचाराचा करणार शुभारंभ
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर असून इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचाराचा भवानीनगर येथे श्रीफळ वाढवून शुभारंभ करणार आहेत. तत्पूर्वी बारामतीच्या कन्हेरी येथे श्री मारुतीरायाचं दर्शन घेतील. सायंकाळी पाच वाजता भवानी नगर मध्ये अजित पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील.
Live Update : इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराजची पाकिस्तान आणि भारत दौऱ्यावर
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराजची हे सोमवार (5 मे) रोजी इस्लामाबादला भेट देतील आणि त्यानंतर आठवड्याच्या उत्तरार्धात दिल्लीचा दौरा करतील, अशी माहिती इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी तेहरानमध्ये दिली. भारत दौऱ्याची योजना काही आठवड्यांपूर्वीच आखण्यात आली होती. मात्र आता पाकिस्तान दौऱ्याच्या जोडीने, अराजची यांच्या या दौऱ्याला एक अतिरिक्त ‘मध्यस्थी मिशन’चे स्वरूप मिळाले आहे, कारण त्यांनी भारत आणि पाकिस्तान या “बंधुत्वाचे नाते असलेल्या शेजारी देशांमध्ये” मध्यस्थीची तयारी दर्शवली आहे.
Live Update : ओडिसातील 10 तृतीयपंथी झाल्या दहावी पास
#WATCH | Odisha: Nine transgender students in Odisha's Bhadrak district cleared the Odisha class 10 board exam.
— ANI (@ANI) May 5, 2025
Transgender student Sanjana says, "People in our surrounding villages are very happy that we have passed the matriculation exam. People in our community are also very… pic.twitter.com/dp0FwVCBdT
Live Update : नंदुरबार जिल्ह्यातील अनेक लघु प्रकल्पांनी गाठला तळ
नंदुरबार जिल्ह्यात वाढत्या उष्णतेबरोबर धरणातील पाणी साठ्यातील बाष्पीभवनाच्या प्रमाणातही वाढ झाली असून ग्रामीण भागासाठी संजीवनी असलेल्या लघु प्रकल्पांच्या पाणीसाठा मध्ये कमालीची घट झाली असून जिल्ह्यातील 13 लघु प्रकल्पांपैकी सहा लघु प्रकल्पांनी तळ गाठला असून लघु प्रकल्पांमध्ये 28.98% पाणीसाठा शिल्लक असून येणाऱ्या काळात ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाईची समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आहवान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे जिल्ह्यात तापमान 43ते44° c च्या वरती जात असल्याने पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला असून त्यातून धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे..
Live Update : तापमानाच्या पारा वाढल्याने फळांची मागणीत वाढ, मात्र आवक घसरल्यामुळे दरात वाढ
नंदुरबार जिल्ह्यात वाढलेल्या तापमानामुळे फळांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे तसेच फळांची आवक घसरल्यामुळे बाजारपेठेत फळांचे भाव गगनाला भिडले आहेत. सध्या टरबूज, खरबूज, अननस, द्राक्ष, आंबासह, पपई, चिकू, केळी, सफरचंद, नारंगी, मोसंबी, डाळिंब आदी फळांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. बाजारात सफरचंद 200 ते 240 रुपये प्रतिकिलो दराने नागरिकांना खरेदी करावे लागत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फळांचे दर 10 टक्क्यांनी वाढले आहेत. यंदा तापमानाच्या पारा वाढल्याने बाजारात फळांची आवक घसरली आहे. त्यामुळे बाजारात पाणीदार फळांना मागणी वाढली आहे. यात टरबूज आणि खरबूज मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाले आहेत.