मुंबई भाजपने मुंबई महानगरपालिकेसाठी तयारी सुरू केली आहे. भाजपाकडून विजय संकल्प मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. मुंबईत परिवर्तन मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार असून मुंबई सुरक्षा, विकास मिशन या अजेंडावर मेळावा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत 16 तारखेला वरळी डोम येथे मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून मुंबई भाजपा अध्यक्ष अमित साटम यांनी मेळाव्याचं आयोजन केलं आहे.
Live News: माढा तालुक्यातील बेळगावमध्ये गोळीबाराची घटना
माढा तालुक्यातील बेळगाव मध्ये गोळीबाराची घटना
जय मल्हार कलाकेंद्राच्या बाहेर घडली गोळीबाराची घटना
पायाला गोळी लागून एक जण गंभीर जखमी
टेंभुर्णी पोलिसांनी पिस्टल ताब्यात घेऊन सुरज पवार यांच्यासह तिघांवर केला दाखल गुन्हा : मात्र गोळीबार कोणी केला याचा तपास सुरू
गोळीबारात देवा बाळू कोठावळे असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव
कला केंद्रात लावण्याची बैठक लावण्यावरून झाला वाद : याच वादातून गोळीबार
Live Update : आशिया कपमध्ये टीम इंडियाची विजयी सलामी, UAE वर 9 विकेटने विजय
आशिया कपमध्ये टीम इंडियाने विजयी सलामी दिली आहे. UAE वर 9 विकेटने विजय मिळवला आहे. पहिल्यांदा बॅटींग करताना युएईच्या टीमला अवघ्या 57 धावा करता आल्या. कुलदीप यादवने चार तर शिवम दुबेने तीन विकेट्स घेत युएईचा डाव तेरा ओव्हर्समध्ये 57 धावांत गुडाळला. भारताने हे लक्ष 4.3 ओव्हर्समध्ये पार केले. अभिषेक शर्मा 30 धावा करून बाद झाला. भारताने नऊ विकेट्सने विजय मिळवला.
Live update: नागपुरात गोळीबार, रात्री आठ वाजता घडली घटना
नागपुरात गोळीबार झाला आहे. रात्री आठ वाजता ही घटना घडली
उत्तर नागपूर भागातील कडबी चौकातील घटना
दुचाकी स्कूटरवरून जाणाऱ्या व्यक्तीवर अज्ञात हल्लेखोरांकडून तीन वेळा गोळीबार
दुचाकी वरील राजेश दीपानी नामक व्यक्ती जखमी झाल्याची माहिती.
गोळी पोटात गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, याला पोलिस किंवा डॉक्टरांनी पुष्टी केलेली नाही.
त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टर त्याच्यावर उपचार करत असल्याचे कळते.
अज्ञात हल्लेखोरांची माहिती मिळवण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फूटेज तपासत आहेत.
आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत करवाई
आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर टोळीवर मकोका अंतर्गत करवाई
पुणे पोलिसांचा आंदेकर टोळीला दणका
आंदेकर टोळीच्या ११ जणांवर करवाईसाठी पुणे पोलीस आयुक्तांकडून मंजुरी
या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यावर सहजासहजी जामीन मिळत नाही
तरी अजून १३ पैकी ५ आरोपी फरार
विजेचा धक्का लागून एक सीआरपीएफ जवान जखमी
विजेचा धक्का लागून एक सीआरपीएफ जवान जखमी
जवान सीआरपीएफ २२६ व्या बटालियन नरसापुरममधील आरओपी टीममध्ये होता
जंगलात कर्तव्य बजावत असताना ही घटना घडली
प्रथमोपचारासाठी त्याला चिंतलनार आरोग्य केंद्रात आणण्यात आले.
त्याला चांगल्या उपचारांसाठी रेफर करण्यात आले.
एल्फिन्स्टन ब्रिज लवकरच वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचे बोर्ड स्थानिकांनी फाडले
MMRDA च्या वतीने एल्फिन्स्टन ब्रिज लवकरच वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याचे बोर्ड स्थानिकांनी फाडले
एल्फिन्स्टन ब्रिज लवकरच बंद होणार असल्याचे बोर्ड MMRDA च्या वतीने लावण्यात आलं होत...
अटल सेतूला जोडणारा शिवडी वरळीसाठी नवीन मार्गीका बनवली जाणार असल्याने 125 वर्ष जुना पूल MMRDA च्या वतीने तोडून नवीन पूल बनवण्यात येणार आहे...
यासाठी अनेकवेळा एल्फिन्स्टन पूल पाडण्याचा प्रयत्न MMRDA कडून झाला मात्र स्थानिकांनी याला विरोध केला आहे
आज हा पूल बंद होईल असं सांगण्यात येत होत मात्र आज हा पूल बंद करण्यात आला नाही मात्र लवकर बंद करण्यात येईल अशा लावलेल्या सूचना नागरिकांना फाडून टाकल्या
पुलाच्या बाजूच्या 19 इमारतींचा प्रश्न MMRDA कडून सोडवला जात नाही तोपर्यंत पूल बंद करू देणार नाही अशी स्थानिकांची भूमिका आहे
Live Update: खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नीचे निधन
हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची पत्नी सुषमा आष्टीकर यांचे मुंबई इथं निधन झालं आहे. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झालं. सुषमा मागील अनेक महिन्यांपासून रुग्णालयात होत्या. उद्या सकाळी 11 वाजता मुळगाव आष्टी तालुका हदगाव जिल्हा नांदेड इथं अंत्यविधी होणार आहे. नागेश पाटील हे उद्धव गटाचे खासदार आहेत.
Live Update: नक्षली पोलीस चकमक, एक नक्षली ठार, मृत नक्षल्यांचा आकडा वाढण्याची शक्यता
कांकेर जिल्ह्यातील परतापूर भागात सैनिक आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत सैनिकांनी एका नक्षलवाद्याला ठार मारले आहे. एसपी आयके एलिसेला यांनी चकमकीची पुष्टी केली आहे, परंतु शोध पथकाशी संपर्क नसल्याने चकमकीची सविस्तर माहिती उघड होऊ शकली नाही.
असे सांगितले जात आहे की अलनारच्या जंगलात नक्षलवाद्यांचे अस्तित्व असल्याची माहिती मिळाल्यावरून ही कारवाई सुरू करण्यात आली होती, दरम्यान सैनिकांची नक्षलवाद्यांशी चकमक झाली आहे, ज्यामध्ये एक नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला आहे, घटनास्थळावरून ३०३ बंदूक देखील जप्त करण्यात आली आहे.
Live Update: उदगीरच्या चौबारा परिसरात व्यापाऱ्यांवर कुत्र्याने चढवला हल्ला, व्यापारी गंभीर जखमी
उदगीर शहरातील मोकाट कुत्रे अनेकांना चावा घेत असून या मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाकडे करण्यात आली. परंतु नगरपालिका प्रशासनाने या गोष्टींकडे गांभीर्याने घेत नाही,९ सप्टेंबर रोजी सांयकाळी एका व्यापाऱ्यांने चौबारा परिसरात दुकानाच्या शटरला कुलूप लावत असताना मोकाट कुत्र्याने हल्ला चढवला या हल्ल्यात व्यापाऱ्यांचे ओठ फाटले असून व्यापाऱ्यांवर उदगीर येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे,
Live Update: नागपूरात पोलिसांची मोठी कारवाई
हव्यापार करून घेणाऱ्या एम.आर ओयो हॉटेलवर सामाजिक सुरक्षा विभागाकडून कारवाई करण्यात आली.. यामध्ये हॉटेल मालकासह चार जणांना ताब्यात घेतले असून एका पीडीतेची सुटका करण्यात आली आहे... नागपूरच्या कामठी रोड येथील एम.आर. ओयो हॉटेल मध्ये काही दिवसापासून देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ...पोलिसांनी त्या ठिकाणी फॅन्टरला पाठवले आणि त्याने इशारा दिल्यावर त्या हॉटेलवर धाड टाकली... या कारवाईत चार आरोपींना ताब्यात घेऊन एक लाख ५० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Live Update: भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला
- भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला
- नाशिक पोलिसांच्या तपासावरही हायकोर्टाने ओढले ताशेरे
- राहुल धोत्रे या तरुणाच्या हत्याकांड प्रकरणी उद्धव निमसेवर झाला आहे गुन्हा दाखल
- निमसेच्या मागावर पोलीसांची चार पथके तैनात असून पोलीसांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह
Live Update : शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर
Live Update : शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आझाद मैदानावर होणार आहे. तशी परवानगी त्यांना मिळाली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवर होईल.
Live Update : गणपतीपुळेत संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रींच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास
आज संकष्टी चतुर्थीनिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे भाविकांची रेलचेल आहे. संकष्टी चतुर्थीनिमित्त येथील स्वयंभू गणपती मंदिरातील श्रींच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी सजवलेला गाभारा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. ही सजावट पाहताना बाप्पाचे रूप अधिकच मनोहारी दिसत असून, भाविकांना एक वेगळाच आनंद आणि समाधान मिळत आहे.
Live Update : उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला, दसरा मेळाव्याला दोन्ही बंधू एकत्र दिसणार? चर्चेला उधाण
उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या भेटीला, दसरा मेळाव्याला दोन्ही बंधू एकत्र दिसणार? चर्चेला उधाण
Live Update : JNPA कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, गेटवे ऑफ इंडिया ते JNPA ई-वॉटर टॅक्सी सेवा
JNPA कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, गेटवे ऑफ इंडिया ते JNPA साठी ई-वॉटर टॅक्सी सेवा
- 22 सप्टेंबर पासून भारतीय बनावटीच्या 2 इ-वॉटर टॅक्सी सेवा सुरू होणार
- गेटवे ते JNPA आधी 1 तास लागणारा प्रवास आता केवळ 40 मिनिटात होणार पूर्ण
- भारत फ्रेट ग्रुप हे टॅक्सी ची देखभाल करणार तर 100 रुपये भाडे या मार्गावर असण्याची शक्यता
Live Update : जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने निदर्शने
जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने निदर्शने
काँग्रेस, शिवसेना ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार गट, कम्युनिस्ट पक्ष आणि इतरही घटक पक्षाचे कार्यकर्ते सहभागी
जनसुरक्षा कायदा रद्द करा अशी घोषणाबाजी
कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने
Live Update : वसईत स्कायवॉकचा भाग कोसळला, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
वसई पश्चिमेला आलेल्या स्कायवॉकच्या खालील बाजूस बसविलेल्या फायबर शिट कोसळून खाली पडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. आज सकाळी सातच्या सुमारास वर्तक विद्यालयाच्या समोरील भागात ही घटना घडली आहे. सुदैवाने स्कायवॉक खाली कोणीही नव्हते त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
वसई विरार शहरात वसई रेल्वे स्थानक आणि विरार रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांसाठी स्कायवॉक तयार करण्यात आले आहेत.स्कायवॉकच्या खालील बाजूस फायबरच्या शिट बसविण्यात आल्या होत्या. आज अचानकपणे वसईच्या वर्तक महाविद्यालयाच्या गेट समोरच असलेल्या स्कायवॉकच्या खालील बाजूच्या फायबर शिट कोसळून खाली पडल्या. या घटनेची माहिती महापालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच घटनास्थळी पोहचून लोंबकळत असलेल्या आणि धोकादायक स्थितीत असलेल्या फायबर शिट काढून टाकण्यात आल्या.
रेल्वे स्थानकाला लागूनच हा परिसर असल्याने येथून प्रवासी, महाविद्यालयीन विद्यार्थी यांची ये जा सुरू असते.
मात्र घटना घडली तेव्हा कोणीही स्कायवॉक खाली नसल्याने अनर्थ टळला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी तयार करण्यात आलेल्या स्कायवॉकचे लेखापरीक्षण करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
Live Update : नाशिकमध्ये थोड्याच वेळात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची संयुक्त पत्रकार परिषद
नाशिकमध्ये थोड्याच वेळात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची संयुक्त पत्रकार परिषद
- 12 सप्टेंबर रोजी नाशिक मध्ये मनसे आणि ठाकरे गटाचा निघणार जन आक्रोश मोर्चा
- नागरी समस्यांसह , शेतकरी कर्जमाफी , हानी ट्रॅप, अवैध धंदे गुन्हेगारी या संदर्भात काढला जाणार मोर्चा
- मोर्चाच्या तयारी संदर्भात मनसे कार्यालयात ठाकरे गट आणि मनसेचे संयुक्तरीत्या पत्रकार परिषद
Live Update : मालेगाव शिक्षक घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई, प्रमुख अधिकाऱ्यांना अटक
मालेगाव शिक्षक घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई
जिल्हा परिषद शिक्षण विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना अटक
जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी व कार्यालयीन अधीक्षकांवर कारवाई
आर्थिक गुन्हे शाखेकडून मध्यरात्री अटक
यापूर्वी शिक्षण संस्था चालकासह तिघे आधीच अटकेत
दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल
बोगस शिक्षक भरती घोटाळ्यात धडाकेबाज कारवाई
संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ
Live Update : मावळ तालुक्यातील पवन मावळ भागात भात शेतीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव
कृषि विभागाच्या पथकांकडून या भात पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना तात्काळ उपाययोजना सुचविण्यात येत आहेत. औषध फवारणीसह; लागवडीनंतरचा दुसरा खत डोस देण्याचे मार्गदर्शन दिले जात आहे. सहाय्यक कृषि अधिकारी गावोगावी फिरून शेतकऱ्यांना करपा रोगाबाबत सविस्तर माहिती देत आहेत. कृषि विभागाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, भात पिकावर रोगाची लक्षणे दिसताच कृषि अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली औषध फवारणी करावी असं आवाहन कृषी विभागाने केलं आहे.
Live Update : अकोल्यात कसाबपुरा येथे गोमांस तस्करीवर पोलिसांचा छापा
अकोला जिल्ह्यातील कसाबपुरा येथे बोरगाव मंजू पोलिसांनी छापा टाकून १५० किलो गोमांस जप्त केलं असून, कत्तलीसाठी ठेवलेली दोन जनावरे सोडवण्यात आली आहेत. ही कारवाई ९ सप्टेंबर रोजी ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. घटनास्थळावरून सुरा, कुऱ्हाड असा एकूण ९५,३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अब्दुल रहीम शेख आणि मोहम्मद शोएब या दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, ही कारवाई एसपी अर्चित चांडक आणि एसडीपीओ वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
Live Update : आता 12 आसन क्षमता असणाऱ्या वाहनाला स्कूल व्हॅनचा दर्जा मिळणार..
आता 12 आसन क्षमता असणाऱ्या वाहनाला स्कूल व्हॅनचा दर्जा मिळणार..
* शालेय विद्यार्थ्याची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस आणि स्कूल व्हॅनची स्वतंत्र व्याख्या परिवहन विभागाने तयार केली आहे..
* त्यामुळे 12 पर्यंत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना स्कूल व्हॅन म्हणून अधिकृत दमान्यता मिळणार..
* या निर्णयामुळे विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेसाठी कठोर नियम लागू होणार आहे..
* 12 विद्यार्थी क्षमतेसोबत स्कूल व्हॅन मध्ये आपातकालीन दरवाजा, विद्यार्थ्यांना चढण्या उतरण्यासाठी सोयीचे प्रवेश द्वार, दफ्तर आणि ईतर साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र जागा, संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी फायर अलार्म सिस्टम, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जीपीएससारखी वाहन ट्रॅकिंग प्रणाली असणे बंधनकारक आहे
Live Update : शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी 12 शिक्षकांची निवड...
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शिक्षक गुणवत्तावंत पुरस्कार २०२५ साठी एकूण १२ शिक्षकांची निवड करण्यात आली असून या शिक्षकांचा गौरव सोहळा ११ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे होणार असून जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील १२ शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हे सर्व शिक्षक अतिदुर्गम भागात सेवा देत आहेत.
Live Update : 'व्हायरल'ने वाढवली चिंता, दिवसातून १० पैकी ६ बालकांना सर्दी खोकला
छत्रपती संभाजीनगर शहरासह ग्रामीण भागात गेल्या चार दिवसापासून सातत्याने होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढताना बघायला मिळत आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात एका दिवसात जवळपास १० पैकी ६ बालक हे या व्हायरल आजाराने त्रस्त आहेत. गेल्या आठवड्याभरापासून दुपारच्या सत्रात कडक ऊन, सायंकाळी ढगाळ वातावरण आणि रात्रीच्या सुमारास रिमझिम पाऊस पडत आहे या वातावरणामुळे नागरिक आजारी पडण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे सरकारी रुग्णालयाप्रमाणेच खाजगी रुग्णालयात देखील रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. तसेच सतत दोन ते तीन दिवस होऊन देखील हे व्हायरल फीवर जात नसेल तर निमोनियाची देखील लक्षण असू शकतात अशी माहिती बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत चव्हाण यांनी NDTV मराठीशी बोलताना दिली आहे.
Live Update : ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणूक उत्साहात आणि शांततेत पार पडली..
कोल्यात मंगळवारी ईद-ए-मिलादनिमित्त पारंपरिक जुलूस-ए-मोहम्मदी उत्साहात काढण्यात आला. सकाळी ११ वाजता कच्छी मस्जिदसमोरून सुरू झालेली मिरवणूक रात्री ८ वाजता दुवेसह समाप्त झाली. हजरत मोहम्मद पैगंबरांची १५०० वी जयंती भाविकांनी जल्लोषात साजरी केली. सय्यद जाकिमिया नक्शबंदी, आ. साजिद पठाण, हाजी महमूद खान, आणि जावेद जकरिया यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मिरवणुकीची सुरुवात झाली. शहरातील अनेक उलेमा, सामाजिक आणि राजकीय मान्यवरांसह हजारो भाविक सहभागी झाले होते. पोलिस अधीक्षक अर्चित चांडक आणि डीवायएसपी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूक शांततेत पार पडली. श्री. सुदर्शन पाटील यांनी अकोल्यातील मुस्लिम बांधवांचे विशेष आभार मानले.