जाहिरात
2 months ago

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढ विरोधात आज 20 गावे बंद ठेवण्यात येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हद्दवाढी विरोधात कृती समिती आहे. येत्या महापालिका निवडणुकीपूर्वी ही हद्दवाढ होणार असल्याच्या हालचाली वाढल्यानंतर आता विरोधी कृती समिती आक्रमक आहे

Live Update : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा पदाधिकारी संवाद मेळावा

पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचा पदाधिकारी संवाद मेळावा आयोजित करण्यात आलाय, थोड्याच वेळात पक्ष प्रमुख शरद पवार उपस्थिताना संबोधित करतील....

आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पदाधिकाऱ्यांना पवार साहेब काय सूचना देतात या कडे सर्वांच लक्ष.....

Live Update : कोल्हापुरातील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात वाढत्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आज सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी 26 फूट इतकी आहे. जर पुढचे काही दिवस पावसाचं प्रमाण असंच राहिलं तर पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. नदीची इशारा पातळी 39 फुट इतकी आहे. प्रशासन सध्या सतर्क आहे. जिल्ह्यातील अठरा बंधारे सध्या पाण्याखाली आहेत. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जाणून घेऊया कोल्हापुरातील या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी

Live Update : नाशिकचे चार माजी नगरसेवक आज शिंदे गटात करणार प्रवेश

नाशिकचे एकूण चार माजी नगरसेवक आज शिंदे गटात करणार प्रवेश 

किरण दराडे, सीमा निगळ, पुंडलिक अरिंगळे, पुंजाराम गामने आज करणार प्रवेश 

आतापर्यंत नाशिक महानगरपालिकेतील 20 माजी नगरसेवक यांचा शिंदे गटात प्रवेश पूर्ण 

तर पुढील आठवड्यात आणखी काही नागसेवक करणार प्रवेश 

नाशिक मध्ये ठाकरे गटाला शिंदे गटाकडून जोरदार धक्का 

थोड्याच वेळात एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सुरू होणार प्रवेश

Live Update : मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यात गळती

मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगद्यात गळती

सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळं बोगद्यात गळती 

पावासामुळे बोगद्यातील गळती वाढल्याची शक्यता

गळती थांबवण्यासाठी प्रशासनाने वेळीच उपाययोजना करणे आवश्यक

Live Update : पिंपरी चिंचवडमध्ये आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्टीचे मेळावे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या  पिंपरी चिंचवड शहरात आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मेळावे होत आहेत. यानिमित्ताने दोघेही पवार- काका पुतणे आज शहरात येणार आहेत. आगामी महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष बांधणीसाठी हे मेळावे होत असल्याची चर्चा सध्या पिंपरी चिंचवड शहराच्या राजकारणात रंगू लागली आहे.....

Live Update : कोयना धरण परिसरातला पावसाचा जोर सकाळपासून ओसरला

कोयना धरण परिसरातला पावसाचा जोर सकाळपासून ओसरला

कालच्या पावसामुळे कोयना धरणात प्रतिसेकंद 30 हजार क्युसेक्स पाण्याची आवक सुरू 

गेल्या चोविस तासात धरणात 3 टीएमसी पाण्याची आवक

105 टीएमसीच्या कोयना धरणात 25.12 टीएमसी पाणीसाठा

Live Update : तळोदा शहरात आरोग्य विभागातील कर्मचाऱ्याच्या घरी चोरी, ५८ हजाराचे सोन्याचे दागिने चोरी....

नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात राहणारे योगेश बागुल हे आरोग्य विभागात नोकरी करत असून आपल्या मावशीच्या उत्तर कार्याचा कार्यक्रम साठी गुजरात राज्यातील सोनगढ येथे गेले असताना यांच्या बंद घरावर चोरट्यानि डल्ला मारला आहे, योगेश बागुल यांच्या घराचे कडीकोंडा तोडून चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटात ठेवलेले ५८ हजार रुपये किंमतिचे सोन्याचे दागिने लंपास केले आहे. योगेश बागुल यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Live Update : यंदा उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात 63 टक्क्यांनी वाढ

कृषी विभागाच्या अहवालानुसार यंदाच्या हंगामात उन्हाळी कांद्याच्या उत्पादनात  गेल्या वर्षाच्या तुलनेत 63 टक्के अतिरिक्त वाढ झाल्याची बाब समोर आल्याने यंदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा वांदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.गेल्या वर्षी 36 लाख मॅट्रिक उन्हाळी कांद्याचे उत्पादन झाले होते. यंदा मात्र ते  59 लाख मॅट्रिक टन उत्पादन झाले आहे. यामुळे कांद्याच्या बाजारभावात दररोज चढ-उतार होत आहेत. वाढले कांदा उत्पादन लक्षात घेता.केंद्र सरकारने कांद्याला परदेशात बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी तसेच नाफेड व एनसीसीएफमार्फत तीन ते साडेतीन हजार रुपये प्रतिक्विंटलने  कांदा खरेदी करावा तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय देता येईल असे मत मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तसेच कांदा तज्ञ जयदत्त होळकर यांनी व्यक्त केलंय..

Live Update : ई.व्ही.एम.विरोधात बहुजन समाज पार्टी आक्रमक...

देशातील सर्व निवडणूका ई.व्ही.एम.च्या ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या या मागणीसाठी नाशिकच्या मनमाडमध्ये बहुजन समाज पार्टीच्यावतीने  डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी  धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी "ई. व्ही.एम हटाव, देश बचाव" अशा जोरदार घोषणाबाजी करण्यात आले.

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com