गेल्या तीन दिवसांपासून राज्याला पावसाने झोडपलं आहे. मराठवाड्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. बीडला मुसळधार पावसानं झोडपलं असून 36 गावांचा संपर्क तुटला आहे. आज बीडमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पूरजन्य परिस्थितीतून 51 जणांना वाचवण्यात यश आलं असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक, आजच्या बैठकीत राज्यातील पूरस्थिती, आरक्षणाच्या मुद्द्यावरुन झालेल्या आत्महत्या आणि बंजारा आणि धनगर समाजाच्या मागण्यांवर चर्चेची शक्यता आहे.
Live Update : आयुष कोमकर हत्या प्रकरणी सर्व एकूण 13 आरोपी अटकेत
आयुष कोमकर हत्या प्रकरणी सर्व एकूण 13 आरोपी अटकेत.
1.बंडू आंदेकर
2.कृष्णा आंदेकर
3.शिवम आंदेकर
4.अभिषेक आंदेकर
5.शिवराज आंदेकर
6.लक्ष्मी आंदेकर
7.तुषार वाडेकर
8.स्वराज वाडेकर
9.वृंदावनी वाडेकर
10.अमन पठाण
11.यश पाटील
12 अमित पाठोळे
13 सुजल मेरगू
Live Update : तुळजापूर आणि धारशिवमधील भाजप, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा मातोश्रीवर पक्ष प्रवेश
तुळजापूर आणि धारशिवमधील भाजप, काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा मातोश्रीवर पक्ष प्रवेश
सुरुवातीला तुळजापूर मधील पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार
यामध्ये २० सरपंच आणि काही उपसरपंच, माजी पंचायत समिती, सोसायटी सदस्य यांचा प्रवेश होणार आहे
आणि त्यानंतर धाराशिवमधील पादिकाऱ्यांचा समावेश होईल.
Live Update : अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा रास्ता रोको आंदोलन..
अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा रास्ता रोको आंदोलन..
छत्रपती संभाजीनगर नांदेड महामार्गावरील औंढा टी पॉइंटवर रास्ता रोकोला सुरुवात..
एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी शेकडो बंजारा समाज बांधव रास्ता रोकोमध्ये सहभागी..
रास्ता रोको दरम्यान बंजारा समाज बांधवांकडून जोरदार घोषणाबाजी..
Live Update : एलफिन्स्टन ब्रिजच्या आजूबाजूला राहणारे रहिवासी राज ठाकरेंच्या भेटीला
एलफिस्टन ब्रिजच्या आजूबाजूला राहणारे रहिवासी राज ठाकरेंच्या भेटीला
एलफिस्टन पूल पाडण्यासाठी केला होता विरोध
याआधी रहिवासी राज ठाकरेंच्या भेटीला आले होते त्यावेळी प्रश्न मार्गी लावा आणि मग पूल तोडा अशी भूमिक राज ठाकरेंनी घेतली होती
त्यामुळे नेमकं या भेटीच्या दरम्यान राज ठाकरे रहिवाशांना काय सांगतात याकडे लक्ष
Live Update : नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन 30 सप्टेंबरला
नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन 30 सप्टेंबरला
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन 30 सप्टेंबरला होणार
सिडकोचे एम डी विजय सिंघल यांचे प्रतिपादन
देशातले हे सर्वात मोठे विमानतळ असून यावरील ऑपरेशन नोव्हेंबर महिन्यात नियमित सुरू होणार
Live Update : दक्षिण सोलापुरात पुन्हा एकदा पावसाची जोरदार बॅटिंग, सीना नदी परिसरात पूरसदृश्य परिस्थिती
दक्षिण सोलापुरात पुन्हा एकदा पावसाची जोरदार बॅटिंग,सीना नदी परिसरात निर्माण झाली पूरसदृश्य परिस्थिती
औराद - संजवाड पूल पूर्णतः गेला पाण्याखाली ; औराद परिसरातील गावांचा संपर्क तुटला
दरम्यान,औराद - संजवाड हा पूल पाण्याखाली गेलेला असता एका तरुणाने जीव धोक्यात घालून पूल ओलांडण्याचा केला प्रयत्न
मात्र पाण्याचा अतितीव्र वेग पाहून हा तरुण नदीच्या मधोमध सुरक्षारक्षक कठड्याला धरून थांबला
गावकरी आणि ग्राम सुरक्षा दलाच्या सदस्यांनी प्रसंगवधान दाखवत रस्सीच्या साहाय्याने या तरुणाला सुखरूप काढले बाहेर
शरीफ जमादार असं या पाण्यात अडकलेल्या तरुणाचे नाव आहे.
Live Update : अवघ्या तीन महिन्यात उखडला ‘पीएमजीएसवाय’चा रस्ता 'आझाद'ने उपस्थित केले प्रश्नचिन्ह
तालुक्यातील पेंढरीच्या पुढे दुर्गापूर ते सोमलपूरदरम्यान मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 4.400 किलोमीटर रस्त्याचे काम तीन महिन्यापूर्वी गुप्ता कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मार्फत करण्यात आले. परंतु या रस्त्याचे काम इतके बोगस व निकृष्ट दर्जाचे आहे की अवघ्या तीन महिन्यात रस्ता उखडला आहे. डांबर व इतर साहित्याचा वापर अत्यंत कमी केल्याने रस्त्याची दुर्दशा झाली, असा आरोप दुर्गापूर ग्रामवासियांसह आझाद समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे
Live Update : घोडबंदरवासियांचा वाहतूक कोंडीला कंटाळून घोडबंदर रस्त्यावर रस्ता रोको..
घोडबंदरवासियांचा वाहतूक कोंडीला कंटाळून घोडबंदर रस्त्यावर रस्ता रोको..
घोडबंदर मार्गावरील नागला बंदर येथे स्थानिकांनी केला रास्ता रोको..
घोडबंदर मार्गावर पहिलेच वाहतूक कोंडी होत असल्याने रास्ता रोको स्थानिक नागरिकांनी केल्यामुळे वाहतूक कोंडी मध्ये मोठा अडथळा..
Live Update : रणा नदीला आलेल्या पाण्याने 500 एकर शेती पाण्याखाली; उजनी गावात सर्वाधिक फटका
लातूर जिल्ह्यात तेरणा नदीला आलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तेरणा काट परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी घुसून पिकांचे मोठे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनाम्याचे काम सुरू केले असले तरी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पाचशेहून अधिक एकर शेती पाण्याखाली गेली असून यात सर्वाधिक फटका उजनी गावातील शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे शेतकरी नुकसानभरपाईची मागणी करत आहेत.
Live Update : औसा तालुक्यातील भेटासह 10 गावचा संपर्क तुटला.
लातूर जिल्ह्यात रात्रभर झालेल्या पावसामुळे औसा तालुक्यातील भेटा गावचा संपर्क तुटला आहे... रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे औसा–तेर रस्त्यावर बोरगाव गावाजवळील पुलावरून पाणी वाहतंय... पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे... औसा, भेटा, कोंड, मुरुड, तेर मार्गे धाराशिवकडे जाणारा हा महत्त्वाचा रस्ता बंद झाल्याने वाहनधारकांसोबत शेतकरी आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय झाली आहे... प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून... पाण्याचा प्रवाह ओसरल्यानंतरच वाहतूक सुरळीत होईल, अशी माहिती देण्यात आली आहे... दरम्यान, या पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करत आहेत... मात्र प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
Live Update : अजित पवार आज छत्रपती संभाजी नगर, बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर
अजित पवार आज छत्रपती संभाजी नगर, बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर
बीड जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा अजित पवार घेणार आढावा
संध्याकाळी साडेसहा वाजता बीड जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
शासकीय अधिकाऱ्यांकडून अजित पवार पूरपरिस्थितीची माहिती जाणून घेणार
Live Update : लक्ष्मण हाके यांच्या अडचणीत वाढ; परळी, नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाषणातून मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरले होते. आता त्याचाच निषेध म्हणून मराठा समाज आक्रमक झाला आहे.. हाके यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे समाजाची बदनामी झाल्याचा आरोप मराठा समन्वयकांनी केला आहे. रविवारी हाके यांच्या विरोधात दोन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता परळी आणि नेकनुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे लक्ष्मण हाके यांच्या अडचणीत वाढ होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे.
Live Update : गुहागरमध्ये शनिवारी पारंपरिक जाखडी महोत्सवाचं आयोजन
गुहागर तालुका भाजपतर्फे शनिवारी २० सप्टेंबर रोजी पारंपरिक जाखडी नाच महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव तालुक्यातील जानवळे येथील भवानी सभागृहात सायंकाळी ५ वाजता होणार आहे. त्यानिमित्त गुहागरवासियांना कोकणची परंपरा जपणाऱ्या जाखडीमधील वैविध्यपूर्ण सादरीकरण पाहण्याची संधी मिळणार आहे. जुनी लोककला, परंपरा टिकली पाहिजे या उद्देशाने पारंपरिक जाखडीला व्यासपीठ मिळावे, वेगवेगळ्या पद्धतीने नाचाचे प्रकार, जुनी महाभारत, रामायण कथेवरील गाणे आधुनिक तंत्रज्ञान युगात नवीन पिढीला समजली पाहिजे यासाठी या पारंपरिक जाखडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पारंपरिक जाखडी महोत्सवात तालुक्यातील १० नाच मंडळांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रत्येक मंडळाने २० मिनिटांमध्ये आपली लोककला सादरीकरण करायची आहे.
Live Update : वाशिममध्ये धुक्याचे संकट; पिकांना फटका बसण्याची शक्यता
वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसानंतर आज सकाळी जिल्ह्यातील काही भागात दाट धुके पडले. या धुक्याचा परिणाम खरिपातील सोयाबीन, भाजीपाला आणि पालेभाज्यांवर होण्याची शक्यता आहे. आधीच पावसाच्या अनियमिततेमुळे शेतकरी अडचणीत असताना आता धुक्याचे नवे संकट उभे राहिल्याने शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Live Update : जालन्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत साचले पाणी...
जालन्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. शहरातील भाग्यनगर परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी घुसले आहे. काल रात्री जालना शहरासह परिसरात मुसळधार पाऊस झाला. यामुळे शहरातून वाहणाऱ्या नद्या दुथडी भरून वाहत ओव्हरफ्लो झाल्या आहेत. तसेच या पावसाचे पाणी शहरातील सखल भागांत साचून अनेक नागरिकांच्या घरात घुसले आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नागरिक चिंतेत पडले आहेत.
Live Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाची विश्रांती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाने विश्रांती घेतली असली तरी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला. मात्र, संध्याकाळपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. जिल्ह्यात आज पावसाचा ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.