जाहिरात

Uttarakhand Bus Accident : बस नदीत कोसळून भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 10 बेपत्ता

एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत 18 पैकी 7 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर 11 जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

Uttarakhand Bus Accident : बस नदीत कोसळून भीषण अपघात;  एकाचा मृत्यू, 10 बेपत्ता

 Uttarakhand Bus Accident : उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये बस अलकनंदा नदीत कोसळल्याची घटना घडली आहे.  घटना घडली तेव्हा बसमध्ये 18 प्रवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी बचावकार्य सुरू केले आहे. आतापर्यंत या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

Latest and Breaking News on NDTV

एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे आतापर्यंत 18 पैकी 7 प्रवाशांना वाचवण्यात यश आले आहे. तर 10 जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

केदारनाथ आणि रुद्रप्रयागच्या वेगवेगळ्या भागात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे अलकनंदा नदी ओसंडून वाहत आहे.  पाण्याचा प्रवाहाचा वेगही खूप जास्त आहे.  अशा परिस्थितीत, बस नदीत कोसळल्याने जोरदार प्रवाहात अनेक प्रवासी वाहून गेल्याचे बोलले जात आहे. 

प्रशासन सध्या बचाव कार्यात गुंतले आहे. आतापर्यंत या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. बसचा काही काही नदीत सापडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com