जाहिरात

Malegaon Blast Case: साध्वी प्रज्ञा ठाकूरसह 7 ओरापींना फाशीची शिक्षा मिळावी, NIA ची कोर्टात मागणी

Malegaon Blast Case: मालेगाव स्फोटात, साध्वी प्रज्ञा, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय राहिकर, समीर कुलकर्णी आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप आहे.

Malegaon Blast Case: साध्वी प्रज्ञा ठाकूरसह 7 ओरापींना फाशीची शिक्षा मिळावी, NIA ची कोर्टात मागणी

2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भोपाळच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि इतर सात आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा देण्याची मागणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी न्यायालयात केली. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना UAPA च्या कलम 16 अंतर्गत मृत्युदंडाची शिक्षा देण्याची विनंती NIA ने विशेष न्यायालयाला केली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मालेगाव बॉम्बस्फोटात 6 मुस्लीम नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर 100  हून अधिक लोक जखमी झाले. या प्रकरणात एनआयएने न्यायालयात 1500  हून अधिक पानांचे युक्तिवाद दाखल केले होते.आत या प्रकरणाचा निकाल 8 मे रोजी दिला जाणार आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Pahalgam attack: तो दहशतवाद्यांना नडला अन् भिडला, साधा घोडेवाला 'त्या' क्षणी भारतमातेचा सैनिक झाला

प्रज्ञा ठाकूर आणि इतरांवर गंभीर आरोप 

मालेगाव स्फोटात, साध्वी प्रज्ञा, कर्नल प्रसाद पुरोहित, मेजर रमेश उपाध्याय, स्वामी दयानंद पांडे, अजय राहिकर, समीर कुलकर्णी आणि सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप आहे. सप्टेंबर 2008  मध्ये, मालेगाव स्फोटात हिंदुत्ववादी संघटनांना संशयित म्हणून पाहिले गेले होते. मालेगावमध्ये एका मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्फोट झाला. 

ट्रेंडिंग बातमी - Seema Haider: पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरला ही सोडावा लागणार देश? कायदा काय सांगतो?

NIA चा यूटर्न

यापूर्वी, एनआयएने साध्वी प्रज्ञा यांना निर्दोष सोडण्याचा प्रयत्न केला होता. कारण त्यावेळी एनआयएकडे कोणतेही ठोस पुरावे नव्हते. आता एनआयएने आपली भूमिका बदलली आहे. साध्वी प्रज्ञा यांना कोणतीही दया दाखवू नये, असे एनआयएने स्पष्ट केले आहे. या प्रकरणातील 323 साक्षीदारांपैकी 32 साक्षीदारांनी दबावाखाली आपले जबाब बदलले होते, असंही एनआयएने कोर्टात सांगितलं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: