Pragya Singh Thakur Controversial Statement: भाजपच्या (BJP) भोपाळमधील (Bhopal) माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आल्या आहेत. एका कार्यक्रमादरम्यान बोलताना साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी पालकांना उद्देशून धक्कादायक विधान केले, ज्यावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (Former MP Pragya Singh Thakur Controversial Statement)
'तर तिचे पाय तोडा...'
'जर तुमची मुलगी तुमचे ऐकत नसेल, एखाद्या विधर्मीसोबत जाण्याचा प्रयत्न करत असेल, तर तिचे पाय तोडा', असे धक्कादायक विधान प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केले आहे. एका कार्यक्रमात साध्वी प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, "जर आमची मुलगी आमची आज्ञा मोडत असेल, जर तिने बिगर हिंदू घरी जाण्याचा प्रयत्न केला तर आपण कोणतेही प्रयत्न सोडू नयेत, अगदी तिचे पायही तोडू नयेत. कारण जे आपल्या परंपरा आणि शिकवणींचे उल्लंघन करतात त्यांना फटकारले पाहिजे. तुमच्या मुलाच्या कल्याणासाठी, तुम्हाला त्यांना मारहाण करावी लागली तरी मागे हटू नका. जेव्हा पालक छळ करतात तेव्हा ते चांगल्या भविष्यासाठी असे करतात."
Pune News: 'रात्री 12 वाजता...' पुण्यातील 8 वीतील मुलाचा VIDEO, अवस्था पाहून पित्याला रडू कोसळलं
'अगर आपकी लड़की विधर्मी के घर जाना चाहती है तो उसकी टांगे तोड़ दो'-प्रज्ञा ठाकुर का विवादित बयान#PragyaSinghThakur pic.twitter.com/rB2BcIsG0l
— NDTV India (@ndtvindia) October 19, 2025
तसेच जेव्हा मुलगी जन्माला येते, तेव्हा आई-वडील तिला लक्ष्मी आणि सरस्वतीचे रूप मानतात. पण, तीच मुलगी मोठी झाल्यावर 'विधर्मी बनण्याचा' विचार करू लागते. अशा मुलींवर लक्ष ठेवा. जर त्या संस्कार मानत नसतील, घरातून पळून जाण्याचा विचार करत असतील तर सतर्क रहा. अशा मुलींना मारुन, झोडून प्रेमाने समजावून थांबवा त्यांना घराबाहेर पडू देऊ नका, असंही त्या म्हणाल्या.
दरम्यान, वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्या पहिल्यांदाच चर्चेत आलेल्या नाहीत. यापूर्वीही त्यांनी अनेकदा त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे माध्यमांचे लक्ष वेधले आहे. याआधी एका दुर्गा वाहिनीच्या एका कार्यक्रमात, साध्वी प्रज्ञा यांनी मंचावरून म्हटले होते की जर बिगर हिंदू मंदिराबाहेर प्रसाद विकताना दिसले तर त्यांना मारहाण करावी आणि पोलिसांच्या स्वाधीन करण्यापूर्वी त्यांना धडा शिकवावा. प्रत्येक घरात धारदार शस्त्रे उपलब्ध असली पाहिजेत जेणेकरून गरज पडल्यास त्यांचा वापर करता येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world