
क्रिकेटपटू ऋषभ पंत याचा 2022 मध्ये भीषण कार अपघात झाला होता. या अपघात रजत कुमार नावाच्या व्यक्तीने ऋषभ पंतला वाचवले होते. मात्र आता रजतने स्वत: आत्महत्येचा प्रयत्ना केला आहे. लग्न होऊ न शकल्याने रजतने त्याच्या प्रेयसी सुश्री कश्यपसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बुच्चा बस्ती गावात ही घटना घडली. यात प्रेयसीचा मृत्यू झाला, तर रजत रुग्णालयात जीवन आणि मृत्यूशी झुंज देत आहे. दोघांचेही कुटुंब त्यांच्या लग्नासाठी तयार नव्हते. म्हणूनच प्रेमी युगुलाने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.
रजत आणि सुश्री एकाच जातीचे नव्हते आणि म्हणूनच त्यांच्या कुटुंबियांचा त्यांच्या लग्नाला विरोध होता. दोघांच्याही कुटुंबियांनी त्यांचे लग्न दुसरीकडेच ठरवले होते. रजत आणि सुश्री कश्यपने याच रागातून टोकाचं पाऊल उचललं.
दरम्यान, सुश्रीच्या अंत्यसंस्कारानंतर तिच्या आईने रजतविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. रजतने त्यांच्या मुलीचे अपहरण केले आणि नंतर तिला विष देऊन मारले, असा आरोप त्यांनी केला आहे.
(नक्की वाचा- Delhi Railway Station Stampede : महाकुंभला जाण्याची इच्छा अपूर्णच, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत 18 मृत्यू!)
मुझफ्फरनगरचे पोलीस अधीक्षक सत्यनारायण प्रजापत यांनी म्हटलं की, आम्हाला महिलेच्या कुटुंबाकडून लेखी तक्रार मिळाली आहे. यामध्ये रजतवर विषप्रयोग केल्याचा आरोप आहे. रजतच्या प्रकृतीबद्दल डॉ. दिनेश त्रिपाठी म्हणाले की, दोघांनीही कीटकनाशके प्राशन केली होती. सुश्रीचा यात मृत्यू झाला आहे. तर रजतवर उपचार सुरू आहेत.
(नक्की वाचा- Panvel News: मधमाशांनी घात केला; कर्नाळा किल्ला फिरायला गेलेल्या पर्यटकाचा मृत्यू)
डिसेंबर 2022 मध्ये क्रिकेटपटू ऋषभ पंत दिल्लीहून उत्तराखंडला जात असताना रुरकीजवळ दुभाजकाला धडकल्याने त्याच्या कारला भीषण अपघात झाला. यावेळी रजत घटनास्थळी उपस्थित होता, ज्याने त्याचा मित्र निशूसोबत मिळून पंतला कारबाहेर काढलं. पंतचा अपघात झाला तेव्हा दोघेही जवळच्या कारखान्यात काम करत होते. पंतने दोघांचेही आभार मानत त्यांना स्कूटर भेट दिली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world