जाहिरात
Story ProgressBack

पाटणा रेल्वे स्टेशनजवळ भीषण अग्नितांडव, 6 जणांचा मृत्यू

Patna Junction Fire: अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षा नियमांचे पालन न केल्याने आग लागल्याची माहिती प्राथमिक तपासाद्वारे समोर आली.

Read Time: 2 min
पाटणा रेल्वे स्टेशनजवळ भीषण अग्नितांडव, 6 जणांचा मृत्यू
पाटणामधील एका हॉटेलमध्ये भीषण अग्नितांडव

बिहारमधील पाटणा रेल्वे स्टेशनजवळील  ( Patna Junction) एका हॉटेलमध्ये भीषण अग्नितांडव घडले आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून 18 लोक जखमी झाले आहेत. यापैकी 12 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सिलिंडर स्फोटामुळे आग लागली, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षा नियमांचे पालन न केल्याने आग लागल्याची माहिती प्राथमिक तपासामध्ये समोर आली आहे. 
 

वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) राजीव मिश्रा यांनी सांगितले की, गर्दीच्या ठिकाणी असलेल्या या बहुमजली इमारतीतून 20हून अधिक लोकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढले. जखमींना हॉस्पिटलमध्ये तातडीने दाखल केले असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन दलाचे उपमहानिरीक्षक मृत्युंजय कुमार यांनी दिली.

#WATCH | Patna, Bihar: Krishna Murari, DSP (law & order) says, "5-6 people have died. More than 30 people have been rescued. 7 are seriously injured and have been sent to hospital..." https://t.co/yT6pLszXO2 pic.twitter.com/8P1aq4JNiH

— ANI (@ANI) April 25, 2024

#WATCH | Patna, Bihar: Shobha Ohatker, DG, Fire Department says, "We are conducting regular fire audits and our special focus is on such crowded areas. We are constantly raising public awareness to prevent such incidents. Prima facie it happened due to a cylinder blast. The fire… https://t.co/yT6pLszXO2 pic.twitter.com/L57hAAAEBA

— ANI (@ANI) April 25, 2024

आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ

उन्हाळ्याचे दिवस सुरू होताच ठिकठिकाणी आग लागल्याच्या घटनांचे वृत्त ऐकायला मिळते. गुरुवारी (25 एप्रिल) दिल्लीतील जामिया नगर परिसरामध्ये एका इमारतीतही आग लागली होती. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारे जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 1.25 वाजण्याच्या सुमारास प्लास्टिकच्या काही पाइपमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना करण्यात आल्या होत्या. दरम्यान ही घटना नेमके कोणत्या कारणामुळे घडली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. 

#UPDATE | Bihar: So far 3 people have died and 7 have been seriously injured in the fire that broke out in a hotel near Golambar in Kotwali police station area, in Patna, said Patna SSP Rajiv Mishra https://t.co/yT6pLszXO2

— ANI (@ANI) April 25, 2024

VIDEO: पाणीटंचाईच्या झळा शहरी पट्ट्यातही, रोजच्या पाण्यासाठी मीरा-भाईंदरवासीयांची वणवण 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination