अमोल सराफ, प्रतिनिधी
Buldhana School News : शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पोष्टिक आहार मिळत नसल्याच्या तक्रारी पालकांकडून केल्या जातात. विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा यासाठी सरकारकडून मोठ्या योजना राबवल्या जातात. यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही उपलब्ध केला जातो.परंतु, सरकारने राबवलेल्या या योजनांचा थेट लाभ विद्यार्थ्यांना मिळत नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यातील आदिवासीबहुल बावनबीर येथील शाळेत एक विचित्र प्रकार उघडकीस आलाय.
या शाळेत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना रद्दीच्या कागदावर जेवण दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या गंभीर प्रकरणाची दखल एनडीटीव्ही मराठीने घेतली आणि बातमी प्रसारित केली. त्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आणि जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर आले. याप्रकरणी बावनबीर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आली आहे. जिल्हा शिक्षण अधिकारी विकास पाटील यांनी तीन दिवसात लेखी अहवाल जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
नक्की वाचा >> Viral Video : स्मृती मंधाना-पलाश मुच्छलच्या हळदीचा व्हिडीओ समोर, 'वर्ल्डकप विनर' नवरी मांडवात तुफान नाचली!
बुलढाण्याच्या त्या शाळेत काय घडलं होतं?
संग्रामपूर तालुक्यातील आदिवासीबहुल बावनबीर येथे जिल्हा परिषदेची शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना चक्क रद्दीच्या कागदावर जेवण दिले जात असल्याचा संतापजनक प्रकार घडला. जिल्हा परिषदेच्या या शाळेत 'प्रधानमंत्री निर्मल पोषण आहार'योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना खिचडी जेवण दिले जाते.परंतु, या शाळेत रद्दीच्या कागदावर विद्यार्थ्यांना जेवण दिलं जात होतं. त्यामुळे शाळेतील मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ केल्याचं उघडकीस आलंय.या घटनेचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली.
नक्की वाचा >> मुलींना कोणत्या टाईपचा मुलगा आवडतो? दाढीवाला, रोमॅन्टिक की बॉडी बिल्डर? हॉस्टेलच्या पोरींचा 'तो' Video व्हायरल
पोषण आहार सेवन करताना विद्यार्थ्यांच्या बाजूला भटके कुत्रे फिरतात
विद्यार्थ्यांच्या जेवणासाठी स्टील प्लेट्स उपलब्ध करून देण्याचे सक्त निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहेत. तसेच, ज्या ठिकाणी विद्यार्थी जेवण करतात, त्या ठिकाणी स्वच्छता राखणे आवश्यक आहे. तसच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतून विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. पण या शाळेत हा आहार रद्दी पेपरवर दिला जात असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. पोषण आहार सेवन करताना विद्यार्थ्यांच्या अवतीभोवती असतात भटके श्वान फिरत असल्याचंही समोर आलंय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world