FASTag Annual Pass: तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून वारंवार प्रवास करत असाल आणि वार्षिक टोल पास सुविधेचा वापर करत असाल तर 1 एप्रिलपासून तुम्हाला या पाससाठी अधिकची रक्कम मोजावी लागणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास आता महागणार आहे, कारण नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) वार्षिक टोल पासच्या किमतीत वाढ केली आहे.
टोल पासची नवी किंमत | FASTag Annual Pass News
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (NHAI) दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2026 पासून वाहनधारकांना या पाससाठी 3,000 रुपयांऐवजी आता 3,075 रुपये द्यावे लागतील. हे नवीन दर आर्थिक वर्ष 2026-27 साठी लागू असतील. हा पास केवळ अशा खासगी (नॉन-कमर्शियल) वाहनांसाठी उपलब्ध असतो ज्यांना वैध आणि सक्रिय FASTag लावलेला आहे.
(नक्की वाचा: LPG Cylinder Supply: राज्यात LPGचा तुटवडा झालाय का? सिलिंडर मिळणार नाही का? प्रशासनाने दिली मोठी माहिती)
200 वेळा टोल क्रॉसिंग किंवा 1 वर्षाची वैधता
नवीन नियमानुसार, 3075 रुपयांचा हा पास एक वर्ष किंवा 200 वेळा टोल क्रॉसिंगसाठी (Crossings) वैध असेल. यापैकी जे आधी पूर्ण होईल, त्यानुसार पासची वैधता संपेल. म्हणजेच जर तुम्ही एका वर्षाच्या आतच 200 वेळा टोल नाका ओलांडला, तर तुमच्या पासची मुदत संपली असे मानले जाईल.
(नक्की वाचा: LPG Cylinder Booking Tips: गॅस सिलिंडर फोनवरून बुक होत नाहीय? या 7 पर्यायाद्वांरे काही मिनिटांमध्ये करा बुकिंग)
NHAI चे टोल प्लाझा आणि संबंधिक अधिकाऱ्यांना दिले निर्देशनॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने (NHAI) सर्व टोल प्लाझा आणि संबंधित अधिकाऱ्यांना 1 एप्रिल 2026 पासून नवीन दर लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच याची माहिती प्रवासी आणि इतर संबंधितांना देण्यास सांगितले आहे. सरकारी माहितीनुसार, टोल शुल्काशी संबंधित दरांचे दरवर्षी पुनरावलोकन आणि सुधारणा केली जाते, त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून यावर्षी वार्षिक पासच्या किमतीत ही अल्प वाढ करण्यात आली आहे.

Photo Credit: NDTV Marathi
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world