
Odisha News: ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातील एका सरकारी विभागात नवनियुक्त कनिष्ठ अभियंत्याला पिण्याच्या पाण्याऐवजी लघवी मिसळलेले पाणी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ते पिल्याने अभियंत्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर अभियंता सचिन गौडा यांनी तक्रार दाखल केली आणि लघवीची बाटली दिल्याच्या आरोपाखाली शिपायाला अटक करण्यात आली आहे. परलाखेमुंडी येथील ग्रामीण पाणीपुरवठा आणि स्वच्छता (RWSS) विभागाच्या कार्यालयात घडलेल्या घटनेच्या सुमारे एक आठवड्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Sadhvi Ritambhara: 'हिंदू मुली नग्न होऊन पैसे कमवतात', साध्वी ऋतंभरांचा video viral
समोर आलेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी आरडब्ल्यूएसएस कार्यालयात पदभार स्वीकारणाऱ्या कनिष्ठ अभियंत्याने याबाबत तक्रार दिली आहे. उदयगिरी पोलिस ठाण्यात २३ जुलै रोजी शिपायाने त्यांना मानवी मूत्र मिसळलेली पाण्याची बाटली दिली, अशी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी शिपायाला नोटीस बजावली आणि या घटनेत त्यांची भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले.
गजपतीचे पोलिस अधीक्षक जतिंद्र कुमार पांडा यांनी फोनवरून सांगितले की, "सहायक शिपायाविरुद्ध प्रथमदर्शनी कोणताही पुरावा नसताना त्याला अटक करण्यात काही अर्थ नाही. आम्ही मानवी मूत्र मिसळलेले पाणी जप्त केले आहे आणि ते चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहे. पोलिसांनी शिपायाचे आणि अभियंत्याचे नमुनेही घेतले आहेत."
अभियंत्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, शिपायाने त्यांना पिण्यासाठी पाण्याची बाटली दिली. त्यांनी सांगितले की, पाण्याचा एक घोट पिल्यानंतर त्यांना पाण्याचा वास आणि चव वेगळी आढळली आणि त्यात काहीतरी वेगळे असल्याचा संशय आला. त्यावेळी उपस्थित असलेल्या इतर दोन कर्मचाऱ्यांनीही द्रव चाखला आणि त्यांचा संशय खरा ठरला. त्यानंतर, त्यांनी नमुना RWSS प्रयोगशाळेत पाठवला. सुरुवातीच्या प्रयोगशाळेतील चाचणीत नमुन्यात २.० पीपीएम अमोनिया आढळून आला, ज्यामुळे मूत्र दूषित झाल्याचा संशय निर्माण झाला.
दाऊद ते श्रीप्रकाश शुक्ला! गुन्हेगारी जगात प्रेमात पडलेले डॉन अन् त्यांच्या गर्लफ्रेंड्सचे 5 किस्से
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world