जाहिरात
This Article is From Jun 25, 2024

अध्यक्षपदाचा सस्पेंन्स संपला, ओम बिरला लोकसभा अध्यक्ष; राहुल गांधींकडून उपाध्यक्षपदाची मागणी

18th Lok Sabha oath ceremony : 18 व्या लोकसभेचं अध्यक्षपद कोणाला मिळणार, यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

अध्यक्षपदाचा सस्पेंन्स संपला, ओम बिरला लोकसभा अध्यक्ष; राहुल गांधींकडून उपाध्यक्षपदाची मागणी
नवी दिल्ली:

18 व्या लोकसभेचं अध्यक्षपद कोणाला मिळणार, यावरून राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. यादरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अध्यक्षपदासाठी विरोधी पक्षांकडून कोणताही उमेदवार देणार नाही. मात्र विरोधी पक्षांनी  उपाध्यक्षपदाची मागणी केल आहे. जर सरकारने उपाध्यक्षपद दिलं नाही तर त्या जागेवर उमेदवार उभा केला जाईल, असं विरोधी पक्षांकडून सांगण्यात आलं आहे. 

दुसरीकडे लोकसभा अध्यक्षपदासाठी सत्ताधाऱ्यांकडून ओम बिरला यांचंही नाव पुढे करण्यात आल्याचं समजते. ओम बिरला यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.  दरम्यान राहुल गांधी म्हणाले की, संपूर्ण विरोधी पक्ष अध्यक्षाला पाठिंबा देतील. मात्र उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला मिळायला हवं. याशिवाय अखिलेश यादव यांनीही लोकसभा अध्यक्षपद भाजपचा असेल, मात्र उपाध्यक्ष आमचा व्हायला हवा. 

बातमी अपडेट होत आहे.