जाहिरात
3 hours ago

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी गारपिटीमुळे शेतीचं आणि घरांचं मोठं नुकसान झालं आहे. वीज कोसळल्याने बीड आणि संभाजीनगरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या कुरघोडी सुरू आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान काय पावलं उचलतात याकडे सर्वांचच लक्ष आहे. 

India Pakistan Clash Live : IPL टीमसाठी विशेष रेल्वे धावणार

पंजाब आणि दिल्लीच्या आयपीएल संघांना घेऊन जाण्यासाठी शुक्रवारी पठाणकोट-दिल्ली दरम्यान विशेष ट्रेन धावणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव वेळ आणि मार्ग जाहीर करण्यात आलेला नाही.

अफवांवर विश्वास ठेवू नका, पीआयबीने केलं स्पष्ट

भारतातील सर्व विमानतळांवर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. अशी अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवली जात आहे. भारतातील विमानतळावर प्रेवश बंदी करण्यात आलेली नाही. सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही, असं पीआयबीनं स्पष्ट केलं आहे. 

सीमा भागातल्या परिस्थितीचा अमित शाह यांनी घेतला आढावा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमा सुरक्षा दलांच्या महासंचालकांशी सीमा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी चर्चा केली आहे. त्यांनी विमानतळाच्या सुरक्षेबाबत सीआयएसएफच्या महासंचालकांशीही चर्चा केली.   

संरक्षण मंत्रालयाने दिली सर्वात मोठी अपडेट

आज जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांना पाकिस्तानी बनावटीच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले. Standard Operating Procedures नुसार या क्षेपणास्त्रांना निष्प्रभ करण्यात आले. कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही. भारताचे सार्वभौमत्व आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचे रक्षण करण्यासाठी भारत पूर्णपणे सज्ज आहे. असं ट्वीट संरक्षण मंत्रालयाकडून करण्यात आलं आहे. 

सर्व विमानतळांवर सुरक्ष वाढवण्याचे निर्देश

नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोने (BCAS) देशभरातील सर्व विमान कंपन्या आणि विमानतळांना सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व विमानतळांवरील सर्व प्रवाशांची Secondary Ladder Point Check केली जाईल. टर्मिनल इमारतींमध्ये अभ्यागतांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सूत्रांकडून ही  माहिती देण्यात आली आहे. 

श्रीनगरमध्ये संपूर्ण ब्लॅक आऊट

जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्येही संपूर्ण ब्लॅक आऊट करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला

अजित डोवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला रवाना.  सीमा भागात पाकिस्तानी हल्ल्याबाबत होतेय दोघांमध्ये चर्चा.

पाकिस्तानला सडेतोड उत्तर देणार - एस. जयशंकर

कोणत्याही हल्ल्याचं जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचं विदेश मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केलं आहे. जयशंकर यांनी युरोपियन युनियन सोबत चर्चा केली आहे. एकीकडे पाकिस्तानचे हल्ले भारत परतवून लावत आहे. तर दुसरीकडे  डिप्लोमॅटिक स्तरावरही भारत आघाडीवर आहे.  अमेरिका आणि युरोपियन युनियन सोबत चर्चा सुरू आहे. 

गुजरातमध्येही सीमा भागात ब्लॅक आऊट

राजस्थान, पंजाब पाठोपाठ गुजरातमध्येही संपूर्ण ब्लॅक आऊट करण्यात आलं आहे. सीमा भागात हे ब्लॅक आऊट करण्यात आलं आहे. 

पाकिस्तानची आठ क्षेपणास्त्रे भारताने पाडली

पाकिस्तानने साटवारी, सांबा, आर एस पुरा आणि अरनिया सेक्टरमध्ये सोडलेली 8 क्षेपणास्त्रे भारताने पाडली आहेत.  भारतीय हवाई सुरक्षा दलांनी सर्व क्षेपणास्त्रे नष्ट केली आहेत. अशी माहिती संरक्षण विभागातल्या सूत्रांनी दिली आहेत. 

भारताने पाकिस्तानचे F 16 विमान पाडले

भारताने पाकिस्तानचे F 16 विमान पाडले आहे.  राजस्थानमध्ये पाकचं हे विमान भारताने क्षेपणास्त्राच्या सहाय्याने  पाडलं आहे.  

राजस्थान पंजाबमध्ये काही शहरात संपूर्ण ब्लॅकआऊट

पंजाबच्या अमृतसरमध्ये संपूर्ण ब्लॅक आऊट करण्यात आले आहे. त्याच बरोबर राजस्थानच्या बिकानेरमध्येही संपूर्ण ब्लॅक आऊट करण्यात आले आहे. 

Live update : जम्मू आणि जैसलमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला, भारताकडून कारवाई निष्फळ

पाकिस्ताननं जम्मू काश्मीर तसंच राजस्थानमध्ये ड्रोन हल्ला केला आहे. जम्मू काश्मीरमधील जम्मू आणि कुपवाडा तसंच राजस्थानमधील जैसलमेरमध्ये पाकिस्ताननं ड्रोन हल्ला केला. पण, भारतीय सुरक्षा दलानं हा हल्ला निष्फळ ठरवला. या हल्ल्यानंतर जम्मू, कुपवाडा तसंच जैसलमेरमध्ये ब्लॅक आऊट करण्यात आले आहे.

नागपूरच्या आमदार निवासात आढळला मृतदेह

नागपूर शहरातील आमदार निवासात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.  सिव्हिल लाइन्स परिसरातील प्रतिष्ठेच्या आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या आमदार निवासात मृतदेह आढळल्याने पोलिस प्रशासनात आणि सार्वजनिक बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे.  व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी आणि मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिस तपास सुरू आहे. 

एसटीबस कंटेनर अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू

रायगड जिल्ह्यातील तळा मांदाट रस्त्यावर एस टी बस आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चार प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पंधरा जण जखमी झाले आहेत. एका अवघड वळणावरती भरधाव वेगातील कंटेनरने एस टी ला समोरून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की एस टी बस चा अर्धाभाग चक्काचूर झाला आहे.

अतिरेक्यांच्या दफनविधीला पाकचे लष्करी अधिकारी कसे, भारताचा सवाल

भारताच्या हल्ल्यात जर नागरीक मारले गेले तर अतिरेक्यांच्या दफनविधीला पाकचे लष्करी अधिकारी कसे, असा सवाल भारताने पाकिस्तानला केला आहे. 

पहलगाम हल्ल्याची पाकिस्तानची संयुक्त चौकशीची मागणी भारतानं फेटाळली

पहलगाम हल्ल्याची पाकिस्तानची संयुक्त चौकशीची मागणी भारतानं फेटाळली आहे.पाकिस्तान वेळकाढूपणा करत असल्याचा परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. 

भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका, आता पाक चित्रपट, गाणी आणि पॉडकास्टवर बंदी

 भारताचा पाकिस्तानला आणखी एक दणका दिला आहे.  आता पाकिस्तानच्या चित्रपट, गाणी आणि पॉडकास्टवर बंदी घालण्यात आली आहे. या गोष्टी यापुढे भारतात दाखवल्या जाणार नाहीत. त्यावर बंदी असेल.   

मुंबई मेट्रो 3 चा दुसरा टप्पा शनिवारपासून सुरू होणार

मुंबई मेट्रो 3 चा दुसरा टप्पा लवकरत सुरू होणार आहे. उद्या पासून मेट्रो 3 मधून मुख्यमंत्र्यां सोबत प्रेस राईड ठेवण्यात आली . ही मेट्रो बीकेसी ते आचार्य आत्रे चौक वरळी इथ पर्यंत असणार आहे. शनिवारपासून ती मुंबईकरांसाठी खुली करण्यात येईल. 

अमेरिकन नागरिकांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश

लाहोर आणि त्याच्या आसपास ड्रोन हल्ले झाले आहेत. त्यामुळे लाहोरमधील यूएस वाणिज्य दूतावासाने सर्व वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना घरातच सुरक्षित राहण्याचे निर्देश दिले आहेत. शिवाय अमेरिकन नागरिकांनी शक्य असल्यास तातडीने पाकिस्तान सोडावे. पाकिस्तान सोडणे शक्य नसेल तर त्यांनी घरातच सुरक्षित राहावे अशा सुचना अमेरिकेने केल्या आहेत. 

कंधार विमान अपहरणाचा मास्टरमाइंड जखमी

कंधार विमान अपहरणाचा मास्टरमाइंड आणि संसद हल्ल्यातील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणारा अब्दुल रौफ अझहर हवाई हल्ल्यात जखमी झाला आहे. पण अजून मारला गेला नाही.

Live Update : ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरूच, पाकिस्तानचं एअर सिस्टिम भारतीय सैन्याकडून उद्ध्वस्त

Live Update : ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरूच, पाकिस्तानचं एअर सिस्टिम भारतीय सैन्याकडून उद्ध्वस्त

Live Update : पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक

राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अलीकडील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केंद्र सरकारच्या विविध मंत्रालयांचे सचिव आणि विभागप्रमुखांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत देशाची तयारी आणि मंत्रालयांमधील समन्वयाचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधान मोदींनी मंत्रालये आणि संस्थांमध्ये अडथळाविरहित समन्वय आणि कार्यसातत्य टिकवून ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी चालू परिस्थितीला तोंड देण्यासाठी मंत्रालयांनी केलेल्या नियोजनाची व तयारीची सविस्तर माहिती घेतली.

Live Update : कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांची मुंबई पालिकेच्या नालेसफाईच्या कामावर नाराजी

कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांची मुंबई पालिकेच्या नालेसफाईच्या कामावर नाराजी 

३५ दिवसात केवळ १०% कामं झाली. उरलेलं ९०% काम पालिका कधी पूर्ण करणार? शेलारांचा पालिकेला सवाल.

आयुक्त म्हणत असतील की, काम बऱ्यापैकी झालीत तर मी ज्या नाल्यावर जातो त्या नाल्यावर आयुक्तांनी येऊन कामं पाहावी.

मंत्री आशिष शेलार यांच आयुक्तांना आव्हान

Live Update : तेलंगणात जवानांवर माओवाद्यांचा मोठा हल्ला; तीन जवान ठार, एक जखमी

तेलंगणा जवानांवर माओवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. माओवाद्यांनी केलेल्या आयइडीच्या स्फोटात तीन जवान ठार झाले आहेत. तर एक जवान जखमी झाला आहे. माओवाद्यांच्या विरोधात मोठी शोध मोहीम जवानांकडून तेलंगणा छत्तीसगड सीमेवर सुरू होती. अचानक माओवाद्यांनी स्फोट केला. या स्फोटात तीन जवानांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जवान गंभीर जखमी झाला आहे. त्याला हेलिकॉप्टरने हैदराबादला नेण्यात आलं आहे. या घटनेनंतर माओवाद्यांनी जवानांवर तुफान गोळीबार केला त्याला प्रतिउत्तर देण्यात आलं असून अजूनही या भागात तणावाची परिस्थिती आहे

Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांची बैठक संपली

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित डोवाल यांची बैठक संपली

50 मिनिटं सुरू होती बैठक

पाकिस्तानकडून केल्या जात असलेल्या कारवाईबद्दल झाली चर्चा

Live Update : पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू

पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबारात आतापर्यंत 13 लोकांचा मृत्यू

मृत सर्व 13 नागरिक पुंछमधील आहेत. यात आतापर्यंत 59 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. त्यातील 44 नागरिक पुंछमधील आहेत. अजूनही पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच आहे. 

शिवसेना शिंदे गटाचा आज अमरावतीत मेळावा., 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, संजय शिरसाठ, संजय राठोड, उपस्थिती लावणार...

विधानसभेतील यशानंतर शिंदे गटाचा अमरावतीत पहिल्यांदाच भव्य मेळावा...

Live Update : रत्नागिरी शहराला फटका, पुढील 2 दिवस अवकाळीचा इशारा

जवळपास 20 मिनिटं कोसळला पाऊस 

रत्नागिरीसह आजूबाजूच्या परिसरामध्ये मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

अरबी समुद्रात चक्रीय परिस्थिती त्यामुळे हवामान खात्याने वर्तवला होता अवकाळी पावसाचा अंदाज

पहाटे देखील जिल्ह्यात अनेक ठिकाणी तुरळक पाऊस 

पुढील दोन दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज

ऐन मे महिन्यात रत्नागिरी शहरात झाला धो धो पाऊस

उष्म्यामुळे हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना पावसामुळे थोडासा गारवा 

मात्र अवकाळी पावसामुळे अंतिम टप्प्यातील आंबा पीक अडचणीत

Live Update : आंध्र प्रदेश-ओडिसा सीमेवरील चकमकीत 20 लाखांचं बक्षीस असलेला कुख्यात नक्षली ठार

आंध्र प्रदेश-ओडिशा (एओबी) सीमेवरील अल्लुरी जिल्ह्यातील वाय रामवरम-गुडेम कोथावेधी तहसीलच्या सीमेवर पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक.

चकमकीत 20 लाखांचं बक्षीस असलेला कुख्यात नक्षली ठार 

चकमकीत दोन नक्षलवादी ठार, दोन एके ४७ बंदुका जप्त.

ठार झालेल्या माओवाद्यांपैकी एकाची ओळख एओबी स्पेशल झोनल एरिया कमिटी सदस्य काकुरी पंडन्ना उर्फ ​​जगन अशी झाली आहे आणि दुसऱ्या माओवाद्याची ओळख रमेश डीसीएम मलकानगिरी अशी झाली आहे.

Live Update : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानात रेड अलर्ट जारी

पाकिस्तानने पूर्ण देशात रेड अलर्ट घोषित केला आहे. यासह पाकिस्तानने सर्व शासकीय रुग्णालयांना आपत्कालीन स्थितीत तयार राहण्याचा आदेश दिला आहे. पाकिस्तानने आगामी 24 ते 36 तासांसाठी त्यांचा एअरस्पेस बंद केलेला आहे. पाकिस्तानने इस्लामाबाद आणि पंजाबच्या सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Live Update : केंद्र सरकारकडून आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन

केंद्र सरकारकडून आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. सर्व पक्षांच्या नेत्यांना ऑपरेशन सिंदूरची देणार माहिती, तर ठाकरे गट बैठकीला राहणार उपस्थिती 

Live Update : ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये चर्चा

भारताने 7 मे रोजी केलेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी चर्चा केली आहे, अशी माहिती पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी TRT World ला दिलेल्या खास मुलाखतीत दिली.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com