जाहिरात

Ceasefire Violations : पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; सलग नवव्या दिवशी LOC वर गोळीबार

खोऱ्यात दहशतवाद्यांना घुसखोरी सुलभ करण्यासाठी, पाकिस्तानकडून त्यांना कव्हर फायर दिले जाते. भारतीय सैन्याचे लक्ष विचलित करण्यासाठी वेळोवेळी गोळीबारही केला जातो.

Ceasefire Violations : पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; सलग नवव्या दिवशी LOC वर गोळीबार

पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचे नाव घेत नाही. नियंत्रण रेषेवर आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं गेलं आहे. पाकिस्तानने काश्मीरमधील उरी, कुपवाडा आणि जम्मूमधील अखनूर सेक्टरमध्ये लहान शस्त्रांनी गोळीबार केला. भारतीय जवानांनीही ठाम प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानकडून सलग नवव्या दिवशी ही अशांतता सुरूच आहे.

जम्मू आणि काश्मीर सीमेवर चिथावणीखोर पद्धतीने गोळीबार करणे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. 2018 मध्ये पाकिस्तानने 2140 वेळा, 2019 मध्ये 3479 वेळा आणि 2020 मध्ये 5133 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान 9 दिवसांपासून युद्धबंदीचे उल्लंघन करत आहे. त्यांच्याकडून सतत गोळीबार सुरू आहे, ज्याला सैन्य योग्य उत्तर देत आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

Latest and Breaking News on NDTV

2025 मध्ये आतापर्यंत 15 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन

पाकिस्तानने 2025 मध्ये आतापर्यंत 15 वेळा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. याशिवाय घुसखोरीच्या तीन प्रयत्नांमध्ये सात दहशतवादीही मारले गेले आहेत. गेल्या आठ दिवसांत जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, नौशेरा आणि अखनूर भागातील आघाडीच्या चौक्यांवरून लहान शस्त्रांनी गोळीबार केला जात आहे. 740 किलोमीटर लांबीच्या नियंत्रण रेषेवर झालेल्या गोळीबाराला भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर दिले.

( नक्की वाचा : कोण आहेत PM मोदींचे 7 महारथी? जे लिहिणार पाकिस्तानच्या बरबादीची कहाणी )

Latest and Breaking News on NDTV

(नक्की वाचा-  Pehalgam Terror Attack: भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानची भंबेरी, लष्करी युद्ध सरावाला सुरुवात)

भारताची पाकिस्तानशी 3323 किलोमीटरची सीमा आहे. यापैकी 740 किमी एलओसी आणि 221 किमी आंतरराष्ट्रीय सीमा आहे. 26 नोव्हेंबर 2003 रोजी तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात पाकिस्तानसोबत युद्धविराम करार झाला. परंतु पाकिस्तानी सैन्य काश्मीरच्या सीमेवर या कराराचे सतत उल्लंघन करत आहे. खोऱ्यात दहशतवाद्यांना घुसखोरी सुलभ करण्यासाठी, पाकिस्तानकडून त्यांना कव्हर फायर दिले जाते. भारतीय सैन्याचे लक्ष विचलित करण्यासाठी वेळोवेळी गोळीबारही केला जातो.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: