जाहिरात

जन्मापासून पाकिस्तान खोटं बोलत आलाय! पुन्हा कुरापत काढली तर याद राखा, भारताची रोखठोक भूमिका

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं भारताच्या सैनिकी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. परराष्ट्र मंत्रालयाच्या गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची सर्व माहिती देण्यात आली.

जन्मापासून पाकिस्तान खोटं बोलत आलाय! पुन्हा कुरापत काढली तर याद राखा, भारताची रोखठोक भूमिका
मुंबई:

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं भारताच्या सैनिकी ठिकाणांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. परराष्ट्र मंत्रालयाच्या गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये याबाबतची सर्व माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेला कर्नल सौफिया कुरेशी, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री उपस्थित होते. त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की, भारतीय सैन्यांच्या ठिकाणांवर हल्ला 
करण्याचा प्रयत्न पाकिस्ताननं केला होता. भारतानं त्याचं उत्तर दिलं आहे. भारताने पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम नष्ट केली आहे. 

कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितलं की, आम्ही सैनिकी ठिकाणांना लक्ष्य केले नाही. आम्ही पाकिस्तानला यापूर्वीच इशारा दिला होता. आम्ही पाकिस्तानचा हल्ला निष्फळ केला. त्यानंतर पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टम नष्ट केली. 

'भारतानं घुसून मारलं', खासदार रडले, नागरिकांचा सैन्यावर संताप, पाकिस्तानमधील भीतीचे पाहा Video
 

 परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे

  1. पाकिस्तानने भारताच्या सैनिकी ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला निष्क्रीय करण्यात आला. हल्ल्याचा मलबा जमा करण्यात आला आहे. पाकिस्ताननं हल्ला केल्याचा हा पुरावा आहे. 
  2. भारतीय सशस्त्र दलाने पाकिस्तानातील अनेक ठिकाणी  हवाई सुरक्षा रडार प्रणालीला लक्ष्य केले. लाहोरमध्ये हवाई सुरक्षा रडार प्रणालीला निष्क्रीय करण्यात आले. पाकिस्तानने सीमेवर विनाकारण गोळीबार वाढवला आहे. 
  3. 22 एप्रिलचा पहलगाम हल्ला हा एस्कलेशन होता, तिथून हल्ला सुरू केला. त्याचे उत्तर बुधवारी भारताने दिले. रेझिस्टन्स फ्रंटचा या हल्ल्यात समावेश होता. लश्कर ए तोयबाशी हा गट निगडीत आहे. 
  4. संयुक्त राष्ट्र सुरक्षा समितीमध्ये पहलगाम हल्ल्यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध करण्याचं ठरवलं जात होतं त्यावेळी टीआरएफ या दहशतवादी संघटनेचा निवेदनात उल्लेख करण्यास पाकिस्तानने विरोध केला होता. टीआरएफने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती, त्यानंतरही पाकिस्तानने या संघटनेचे नाव निवेदनात घेण्यास विरोध केला होता. 
  5. पाकिस्तानी संरक्षण मंत्री आणि माजी परराष्ट्रमंत्री या दोघांनीही पाकिस्तानचे दहशतवादी संघटनांसोबत काय संबंध आहेत हे सांगितले आहे. अनेक देशांत झालेल्या दहशतवादाचे धागेदोरे पाकिस्तापर्यंत आलेले आहेत. अनेक दहशतवादी संघटना आणि त्यांचे म्होरके हे पाकिस्तानात आहेत. 
  6. भारताने विविध दहशतवादी हल्ल्यांचे पुरावे दिले आहेत आणि पाकिस्तानला कारवाई करण्यास सांगितली होती. मुंबई दहशतवादी हल्ल्यात एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आलं होतं. पठाणकोटमध्ये संयुक्त चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यामध्येही पाकिस्तानला बरीच माहिती, परावे दिले होते. मात्र पाकिस्तानने त्यावर काहीही केले नाही. 
  7. भूतकाळातील अनुभव लक्षात घेता आम्हाला कळाले आहे की पाकिस्तान काहीही करणार नाही आणि उगाच वेळकाढूपणा करत राहील. पाकिस्तान आपली कृत्ये लपवण्याचा आणि दहशतवाद्यांना पाठीशी घालण्याचे काम करत राहील. 
  8. हल्ल्यात सर्वसामान्य माणसे दगावली असतील दहशतवाद्यांच्या अंत्यविधीमध्ये लष्कराचे अधिकारी कसे ? हल्ल्यात मारले गेलेले हे दहशतवादीच होते.
  9.  भारताने फक्त धार्मिक स्थळेच लक्ष्य केल्याचा आरोप केला आहे, तो आरोप खोटा आहे. पाकिस्तान धार्मिक स्थळांचा माथी भडकावण्यासाठी प्रयत्न करत आहे. काल पाकिस्तानने जम्मू कश्मीरमधील शीख समुदायाच्या घरांवर आणि धार्मिक स्थळांवर हल्ला केला होता. 16 सामान्य नागरीक दगावले आहेत.  
  10. धैर्य आणि सहनशीलता 65 वर्ष आम्ही इतके प्रवृत्त केल्यानंतरही हा करार पाळत आलो आहोत. 
  11. पाकिस्तानचा जन्म होताच 'खोटं' बोलणं सुरू झालं. 75 वर्षांपासून ही यात्रा सुरू आहे. 
  12. उद्या IMF बोर्डाची बैठक आहे. त्या बैठकीत आपले कार्यकारी संचालक भारताची भूमिका मांडतील. बोर्ड जो  निर्णय घ्यायचा तो घेईल. गेल्या तीन दशकांत IMF ने कितीवेळा पाकिस्तानला बेलआऊट पॅकेज दिले आहे ते सगळ्यांना माहिती आहे.   मात्र या पैशातून किती कार्यक्रम यशस्वी झाले हे देखील सगळ्यांना माहिती आहे. 
  13. अनेक देशांच्या प्रमुखांनी पंतप्रधानांशी संवाद साधला आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com