
Parliament Budget Session 2025 : संसदेच्या अर्थसंकल्पाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होणार आहे. ज्यामध्ये सरकार आणि विरोधी पक्षामध्ये ईपीआयसीच्या मुद्द्यावर वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांच्या मतदारांच्या यादीत कथित हेराफेरी, मणिपुरमधील हिंसा प्रकरण आणि ट्रम्प प्रशासनाकडे भारताची भूमिका यांसारखे मुद्दे उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून दुसरा टप्पा असून वक्फ दुरुस्ती विधेयक, मतदार यादी आणि विविध मुद्द्यांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मध्यंतरानंतर आज पुन्हा सुरू होत असून विरोधकांकडून वक्फ दुरुस्ती विधेयक आणि मतदान याद्यांमधील कथित घोळावरून केंद्र सरकारला घेरलं जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारकडून वित्त विधेयक व मणिपूरचा अर्थसंकल्प मंजूर करून घेण्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वार्धाप्रमाणे उर्वरित अधिवेशनामध्येही केंद्र सरकारच्या अमेरिका धोरणावरून मोदी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जाण्याचे संकेत ‘इंडिया' आघाडीने दिले आहेत.
नक्की वाचा - GST Rates : सर्वसामान्यांना येणार 'अच्छे दिन'; महागाई कमी होणार? कर्जाचे हफ्ते कमी होणार?
अर्थमंत्री निर्मला सीतारमण सोमवारी मणिपुरचा अर्थसंकल्प सादर करतील. एन. बीरेन सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर 13 फेब्रुवारीपासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन लागू आहे. मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) क्रमांकाच्या डुप्लिकेशनच्या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी करत असल्याचे विरोधकांनी सांगितले. तृणमूल काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित करण्यात पुढाकार घेतला आहे, त्यानंतर निवडणूक आयोगाने पुढील तीन महिन्यांत सुधारात्मक पावले उचलणार असल्याचं आश्वासन दिलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world