गेल्या काही दिवसांपासून इराण-इस्रायल युद्धामुळे इंधन दरवाढीची जी टांगती तलवार होती, ती अखेर प्रीमियम इंधनावर पडली आहे. जागतिक बाजारपेठेत कच्चे तेल (Crude Oil) 108 ते 119 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्याने तेल कंपन्यांनी शुक्रवारी रात्री किमतीत सुधारणा केली आहे.
कुठे आणि किती वाढ झाली?
नव्या दरवाढीनुसार, देशातील प्रीमियम इंधन वापरणाऱ्यांना आणि मोठ्या उद्योगांना अधिक खिसा खाली करावा लागणार आहे. प्रीमियम पेट्रोलमध्ये प्रति लिटर २ रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत हा दर आता 101.89 रुपये झाला आहे. टेलिकॉम टॉवर्स आणि मोठ्या व्यावसायिक वापरासाठी लागणाऱ्या डिझेलमध्ये 20 ते 22 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. मुंबईत याचा दर आता 113.11 रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.
(नक्की वाचा- Pune Petrol Price Hike: पुण्यात पेट्रोलच्या दरात मोठी वाढ; इराण-इस्रायल युद्धाचा पुणेकरांना फटका)
सर्वसामान्यांना मोठा दिलासा
पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, सर्वसामान्य ग्राहक वापरत असलेल्या इंधनाचे दर सध्या वाढवण्याची कोणतीही योजना नाही. दिल्लीत पेट्रोल 94.77 रुपये आणि डिझेल 87.67 रुपयांवर कायम आहे. प्रीमियम पेट्रोलचा एकूण खप केवळ 2 ते 4 टक्के असल्याने, या दरवाढीचा थेट परिणाम मध्यमवर्गीय वाहनचालकांवर होणार नाही.
युद्धाचा पुरवठा साखळीवर परिणाम
भारताच्या 88 टक्के कच्च्या तेलाची गरज आयातीतून पूर्ण होते. होर्मुझ सामुद्रधुनीतील (Strait of Hormuz)वाढत्या धोक्यामुळे, जहाजांचे मार्ग बदलले असून त्यांचा प्रवास लांबला आहे. वाहतुकीचा विमा (Insurance) महागला आहे. पुरवठा साखळीवर प्रचंड ताण निर्माण झाला आहे.
(नक्की वाचा- Pune News: पुण्यात वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये मोठा बदल होणार; RTO ने घेतला महत्वाचा निर्णय )
तेल कंपन्यांचे धोरण
इंडियन ऑईल (IOCL) सारख्या कंपन्या सध्या कच्च्या तेलाच्या वाढीव किमतींचा भार स्वतः सोसत आहेत. जेव्हा जागतिक बाजारात किमती कमी होत्या, तेव्हा मिळवलेल्या नफ्यातून सध्या या नुकसानीची भरपाई केली जात आहे, जेणेकरून देशातील महागाई नियंत्रणात राहील.