जाहिरात

India Pak News : पाककडून आरोग्य केंद्र, शाळा परिसर टार्गेट करण्याचा प्रयत्न, 17 तासात काय घडलं? पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे

गेल्या 17 तासात भारत पाकिस्तान तणावात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. पाकिस्तानकडून सोशल मीडियावर अनेक फेक बातम्या पसरवल्या जात आहेत. आज पत्रकार परिषद घेत या सर्व गोष्टींचा खुलासा करण्यात आला.

India Pak News : पाककडून आरोग्य केंद्र, शाळा परिसर टार्गेट करण्याचा प्रयत्न, 17 तासात काय घडलं? पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
पाकिस्तानकडून वारंवार नागरी आणि भारतीय सैन्याच्या ठिकाणांवर टार्गेट केलं जात असून भारताकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जात असल्याची माहिती सशस्त्र दल आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी माहिती दिली. 

मुद्द्यांमध्ये समजून घेऊया गेल्या 17 तासात काय काय घडलं?

  1. जम्मू-काश्मीर, पंजाबमधील नागरी ठिकाणांवर पाकिस्तानकडून टार्गेट करण्याचा प्रयत्न
  2. फिरोजपूर, जलंदरसह अनेक ठिकाणी सर्वसामान्य नागरिक जखमी आणि घरांचं मोठं नुकसान
  3. श्रीनगर ते नलिया येथे 26 हून अधिक वेळा हवाई घुसखोरी करण्याचा प्रयत्न
  4. पाकिस्तानकडून चिथावणी देणारे कृत्य, त्यावर भारताकडून प्रत्युत्तर दिलं जात आहे. 
  5. हवाई सैन्याच्या स्टेशनवरील उपकरणांना हानी पोहोचवण्याचा प्रयत्न
  6. पहाटे 1.40 वाजता पाकिस्तानकडून हाय स्पीड मिसाईल पंजाबच्या एअर बेसवर दागण्याचा प्रयत्न
  7. पाककडून अव्यावसायिक कृत्य, वायू सेनेचा अड्डा  शाळा परिसर टार्गेट करण्याचा प्रयत्न
  8. भारताने प्रत्युत्तराच्या कारवाईत सहा जागी पाकिस्तानावर हल्ला केला, चार एअरबेस उद्ध्वस्त केली
  9. पाककडून लाहोरहून येणाऱ्या नागरी विमानांच्या आड हवाई मार्गाचा दुरुपयोग 
  10. अग्रीम क्षेत्रात पाक सैनिकांची संख्या वाढवण्यात आली आहे
  11. उधमपूर पठाणकोट भूज येथे नुकसान करण्याचा प्रयत्न
  12. पाककडून श्रीनगर अनंतापूर येथील एअर बेस आणि आरोग्य केंद्रावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला
  13. कुपवाडा राजौरी पूंछ येथे तोफांनी हल्ला केला. पण भारतानं पाकिस्तानी सैन्याला धडा शिकवला.
  14. जम्मू-काश्मीरमधील सरकारी अधिकारी राजकुमार थापा यांच्या घरावर हल्ला, यात थापा यांच्यासह पाच जणांचा मृत्यू
  15. पाकिस्तानकडून सोशल मीडियावर खोट्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न
  16. पसूर रडार साइट आणि सियालकोटचा एव्हिएशन बेस भारतीय सैन्याने टार्गेट केला. 
  17. भारताने अचूक हल्ले केले. रेडार साइट, शस्त्र भंडारवर निशाण्यावर. 
  18. रफीकी, मुरीद, चकलाला, रहमयारखान, शुकूर, चुनियामध्ये पाकच्या सैन्या ठिकाणांवर एअर लॉन्च आणि लडाऊ विमान जेटवर प्रहार केला

Listen to the latest songs, only on JioSaavn.com