जाहिरात

पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले जगातील लोकप्रिय नेते, जो बायडेन यांनाही टाकले मागे

मॉर्निंग कन्सल्टने 25 जागतिक नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान मोदी पहिल्या स्थानावर आहेत, तर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा शेवटच्या स्थानावर आहेत. त्यांची रेटिंग फक्त 16 टक्के आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बनले जगातील लोकप्रिय नेते, जो बायडेन यांनाही टाकले मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून समोर आले आहेत. मॉर्निंग कन्सल्टच्या क्रमवारीत नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटीश पंतप्रधान केयर स्टारर यांना मागे टाकले आहे. मॉर्निंग कन्सल्टच्या क्रमवारीत 69 टक्के अप्रुव्हल रेटिंगसह पंतप्रधान या यादीत नंबर वन ठरले आहेत.

जागतिक नेत्यांच्या प्रमुख निर्णयांवर लक्ष ठेवणारी जागतिक कंपनी मॉर्निंग कन्सल्टने हा ताजा डेटा जारी केला आहे. 8 जुलै ते 14 जुलै दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. गोळा केलेल्या माहितीच्या आधारे जगातील लोकप्रिय नेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे 63 टक्के रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहेत. मॉर्निंग कन्सल्टने आपल्या वेबसाइटवर म्हटले आहे की, रेटिंग प्रत्येक देशातील प्रौढांमध्ये केलेल्या सर्वेक्षणांवर आधारित आहे.

मॉर्निंग कन्सल्टने 25 जागतिक नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान मोदी पहिल्या स्थानावर आहेत, तर जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा शेवटच्या स्थानावर आहेत. त्यांची रेटिंग फक्त 16 टक्के आहे. यूकेचे नवनियुक्त पीएम कीर स्टारर यांची रेटिंग 45 टक्के आहे तर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचे रेटिंग 39 टक्के आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना 29 टक्के रेटिंग आहे. लोकप्रियतेच्या बाबतीत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे रेटिंग केवळ 20 टक्के आहे.

जगभरातील टॉप 10 नेते

  1. नरेंद्र मोदी (भारत) 
  2. आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर (मेक्सिको) 
  3. जेवियर मिले (अर्जेंटिना ) 
  4. व्हायोला आमहर्ड (स्वित्झर्लंड)
  5. सायमन हॅरिस (आयर्लंड)
  6. केयर स्टारमर (यूके)
  7. डोनाल्ड टस्क (पोलंड)
  8. अँथनी अल्बानीज (ऑस्ट्रेलिया)
  9. पेड्रो सांचेझ (स्पेन)
  10. जॉर्जिया मेलोनी (इटली)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com