जाहिरात

PNG-CNG Price: नवीन वर्षात मिळणार गुड न्यूज! 1 जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार?

PNGRB चे सदस्य ए.के. तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळाने सध्याची टॅरिफ स्ट्रक्चर अधिक सोपी केली आहे. पूर्वी ही रचना तीन अंतरावर आधारित झोनमध्ये विभागलेली होती, ती आता दोन झोनमध्ये आणली आहे.

PNG-CNG Price: नवीन वर्षात मिळणार गुड न्यूज! 1 जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार?
New Delhi:

PNG-CNG Price: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय ग्राहकांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. देशातील CNG आणि घरगुती PNG वापरणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने (PNGRB) गॅस दरांचे सुसूत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवीन नियम 1 जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. यामुळे गॅसच्या किमतीत प्रति युनिट 2 ते 3 रुपयांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे.

PNGRB चे सदस्य ए.के. तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळाने सध्याची टॅरिफ स्ट्रक्चर अधिक सोपी केली आहे. पूर्वी ही रचना तीन अंतरावर आधारित झोनमध्ये विभागलेली होती, ती आता दोन झोनमध्ये आणली आहे.

(नक्की वाचा-  Navi Mumbai: नवी मुंबई पुन्हा हादरली! खारघर आणि कोपरखैरणेतून पुन्हा दोन मुली बेपत्ता; आकडा 458 वर)

जुनी रचना (2023 पासून)

  • झोन 1 (200 किमी पर्यंत) - 42 रुपये
  • झोन 2 (300-1,200 किमी)-  80 रुपये
  • झोन 3 (1,200 किमी पेक्षा जास्त) - 107 रुपये

नवीन रचना (1 जानेवारी 2026 पासून)

आता देशभरातील सीएनजी आणि पीएनजी ग्राहकांसाठी झोन 1 लागू केला जाईल. या झोन 1 चा दर आता Rs 54 निश्चित करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी आधी 80 आणि 107 रुपये दर आकारले जात होते, तिथे आता फक्त 54 आकारले जातील, ज्यामुळे किमती लक्षणीयरीत्या कमी होतील.

(नक्की वाचा-  Accident News: मीरा रोडमध्ये खड्ड्यामुळे तरुणाचा बळी, पोलिसांनी मृत तरुणावरच केला गुन्हा दाखल)

कोणाला होणार फायदा?

या निर्णयाचा फायदा भारतातील 312 भौगोलिक क्षेत्रांमध्ये पसरलेल्या ग्राहकांना होईल. यामध्ये 40 सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन कंपन्यांचा समावेश आहे. रिक्षा, टॅक्सी आणि वैयक्तिक कारमध्ये सीएनजी वापरणाऱ्या वाहनधारकांच्या इंधन खर्चात बचत होईल. स्वयंपाकघरात पीएनजी वापरणाऱ्या गृहिणींचे बजेट कमी होण्यास मदत होईल.

ए.के. तिवारी यांनी स्पष्ट केले की, या सुसूत्रीकरणामुळे होणारा फायदा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवणे कंपन्यांना बंधनकारक आहे. नियामक मंडळ या प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवणार आहे. "आमचे काम ग्राहक आणि व्यावसायिक ऑपरेटर यांच्यातील हिताचा समतोल राखणे आहे," असे त्यांनी नमूद केले.

(हेडलाइन वगळता या बातमीमध्ये एनडीटीव्ही टीमने काहीही बदल केलेले नाहीत. ही सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com