जाहिरात

Petrol Price Hike: इंधन दरवाढीचा दुसरा झटका! प्रीमियम पेट्रोल 11 रुपयांनी महागलं

Petrol Price Hike: भारतीय तेल कंपन्यांनी प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. दिल्लीत 100 ऑक्टेन पेट्रोल आता 160 रुपये प्रति लिटर झाले असून, प्रीमियम डिझेलच्या दरातही वाढ करण्यात आली आहे.

Petrol Price Hike: इंधन दरवाढीचा दुसरा झटका! प्रीमियम पेट्रोल 11 रुपयांनी महागलं

इराण-अमेरिका आणि इस्रायल युद्धाचा फटका आता भारतीय वाहनधारकांना बसू लागला आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसह (IOCL) इतर प्रमुख तेल कंपन्यांनी प्रीमियम इंधनाच्या किमतीत लक्षणीय वाढ केली आहे. विशेषतः हाय-परफॉर्मन्स गाड्यांसाठी वापरले जाणारे XP100 पेट्रोल आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे.

नवीन दर आणि झालेली वाढ

तेल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि रुपयाचे मूल्य लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. दिल्लीत याची किंमत 149 रुपयांवरून थेट 160 रुपये प्रति लिटर झाली आहे. एक्स्ट्रा ग्रीन डिझेल (Premium Diesel) 91.49 रुपयांवरून वाढून आता 92.99 रुपये प्रति लिटर झाले आहे. बीपीसीएल (BPCL) आणि एचपीसीएल (HPCL) ने देखील आपल्या प्रीमियम इंधनाचे दर सुधारित केले आहेत.

(नक्की वाचा-  Chhatrapati Sambhajinagar News: अजिंठा लेणी पाहायला गेलेल्या पर्यटकांचा अचानक पळापळ, 11 पर्यटक जखमी)

इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळी धोक्यात आली आहे. 20 मार्च रोजी प्रीमियम पेट्रोलमध्ये 2.30 रुपयांची वाढ झाल्यानंतर, गेल्या 10 दिवसांतील ही दुसरी दरवाढ आहे. भारत आपल्या गरजेच्या सुमारे 90 टक्के कच्चे तेल आयात करत असल्याने, आखाती देशांतील युद्धाचा परिणाम थेट आपल्या देशातील पंपावर दिसून येत आहे.

काय आहे XP100 पेट्रोल?

हे इंडियन ऑईलचे अति-उच्च दर्जाचे (100 Octane) इंधन आहे. हे सामान्य गाड्यांसाठी नसून प्रामुख्याने लक्झरी कार आणि स्पोर्ट्स बाईकच्या इंजिनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी वापरले जाते. जरी सामान्य पेट्रोल-डिझेलचे दर सध्या स्थिर असले, तरी प्रीमियम इंधनातील ही वाढ आगामी काळात होणाऱ्या सार्वत्रिक दरवाढीचे संकेत मानले जात आहेत.

(नक्की वाचा-  Commercial LPG Cylinder: महागाईचा भडका! एलपीजी सिलेंडरच्या किमतीत पुन्हा मोठी वाढ)

लॉजिस्टिक आणि शेतीवर परिणाम

प्रीमियम डिझेलचा वापर प्रामुख्याने चांगल्या मायलेजसाठी ट्रॅव्हल्स, लॉजिस्टिक ट्रक्स आणि आधुनिक शेती यंत्रांमध्ये केला जातो. दरात झालेली ही वाढ वाहतूक खर्च वाढवू शकते, ज्याचा अप्रत्यक्ष परिणाम महागाईवर होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com