पंजाबमधील तरनतारन जिल्ह्यात संपूर्ण देशाला हादरवणारी घटना घडली आहे. एका विधी महाविद्यालयात (Law College) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीची तिच्याच वर्गमित्राने वर्गातच गोळ्या झाडून हत्या केली. संदीप कौर असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपी छात्र प्रिन्स राज याने स्वतःवरही गोळी झाडली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
नक्की वाचा: कर्ज काढून गुंतवणूक करणारा म्हाडाचा निवृत्त अधिकारी सेक्स्टॉर्शनच्या जाळ्यात अडकला; 4 कोटी गमावले
3 सेकंदात 2 जीव गेले
मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेजमध्ये काही वर्गात बसून गप्पा मारत असताना प्रिन्स राज अचानक तिथे आला. त्याने आपल्या बॅगेतून पिस्तुल काढले आणि संदीप कौरवर जवळून गोळी झाडली. वर्गात गोंधळ उडाला असतानाच, काही समजण्याच्या आत प्रिन्सने स्वतःच्या डोक्यातही गोळी झाडली. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तुल जप्त केले आहे.
नक्की वाचा: वॉर्डबॉय बनला बोगस 'डॉक्टर'! चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू; वाशीतील धक्कादायक प्रकार
वडिलांच्या पिस्तुलाचा वापर केला ?
मयत संदीपच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्स हा गेल्या काही दिवसांपासून संदीप कौर हिचा पाठलाग करत होता आणि तिला त्रास देत होता. संदीपचा साखरपुडा झाल्याची माहिती मिळाल्यापासून तो अधिकच संतापला होता. त्याने तिला "जर तू माझी होऊ शकत नाहीस, तर कोणाचीच होऊ देणार नाही" अशी धमकीही दिली होती. त्यामुळे ही हत्या एकतर्फी प्रेमातून झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. आरोपीचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत असून, त्याने वापरलेले शस्त्र त्यांचेच असावे असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, महाविद्यालयाच्या आवारात आणि थेट वर्गात विद्यार्थी हत्यार घेऊन कसा पोहोचला हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे.