4 वर्षांनंतर राम माधव पुन्हा मैदानात; 2014 ची जादू पुन्हा दाखवता येणार? पक्षाकडून मोठी जबाबदारी!

2014 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सरकार स्थापनेमागील क्रेडिट राम माधवांकडे जातं.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

आरएसएसचे राम माधव (RSS Ram Madhav) यांच्यावर भाजपकडून  महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पाच वर्षांनंतर भाजपला राम माधव यांची आठवण का आली असाही सवाल राजकीय तज्ज्ञांकडून केला जात आहे. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची लिस्ट जारी केली होती. मात्र त्याच प्रमुख नेत्यांची नावं नसल्याने ती लिस्ट मागे घेण्यात आली. या घटनेनं अनेक सवाल उपस्थित केले जात आहे. 

राम माधव यांना जम्मू-काश्मीरचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. भाजपने निवडणूक प्रभारीपदी त्यांची नियुक्ती केली. केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडेही जबाबदारी असणार आहे. राम माधव यापूर्वीही भाजप सरचिटणीस असताना जम्मू-काश्मीरचे प्रभारी होते. पीडीपी सरकार स्थापन करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सरकार स्थापन झाल्यानंतर मात्र ते पुन्हा संघात गेले होते. 

Advertisement

नक्की वाचा - शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटेंनी तेव्हाच व्यक्त केली होती भीती, पण तरीही दुर्लक्ष?

2014 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सरकार स्थापनेमागील क्रेडिट राम माधवांकडे जातं. जम्मू त्यानंतर पुढील पाच वर्षे ते पक्षात फार दिसले नाहीत. मात्र राम माधव यांना जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार आणण्यासाठी मैदानात उतरवण्यात आल्याचा राजकीय तज्ज्ञांचा अदमास आहे. भाजपला जम्मू-काश्मीरमध्ये 25 - 35 जागा जिंकण्याचं ध्येय आहे. राम माधव यांचं जम्मू-काश्मीरमध्ये स्थानिक पातळीवर चांगलं काम आहे. त्यांची वापसी पक्षाला फायदेशीर ठरू शकते. 

राम माधव इंडिया फाऊंडेशनचे अध्यक्ष आहेत. इंडिया फाऊंडेशनचे थिंक टँक आहेत. 2014-20 पर्यंत राम माधव यांनी भाजपचे राष्ट्रीय महासचिव म्हणून काम पाहीलं. जम्मू-काश्मीरशिवाय आसाम, उत्तर पूर्वेकडील राज्यात काम करण्याचा अनुभव आहे. 2014 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये भाजप युतीचं सरकार स्थापन करण्यापासून 2018  मध्ये त्रिपुरामध्ये भगवा झेंडा फडकवण्यात राम माधव यांची मोठी भूमिका राहिली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपी नेता मेहबुबा मुफ्तीसह सत्तेत युतीपासून जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्याच्या तयारीत राम माधव यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. 
 

Advertisement

Advertisement