देशातील प्रसिद्ध व्यावसायिक रतन टाटा (Ratan Tata) यांचं नुकतच निधन झालं. 9 ऑक्टोबरला मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. व्यावसायिक रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांची 10 हजार कोटींची संपत्ती कोणाला मिळणार, याबद्दल सवाल उपस्थित केले आहे. रतन टाटा यांचं मृत्यूपत्र समोर आलं आहे. टाटा यांनी त्यांच्याशीसंबंधित जोडलेल्या अनेकांना संपत्तीची भागीदारी दिली आहे. टीओआयमधील वृत्तानुसार, रतन टाचा यांनी आपल्या संपत्ती भाऊ जिमी टाटा, सावत्र बहीण शिरीन आणि डिएना जीजीभॉय, हाऊस स्टाफशी संबंधित लोकांनाही भागिदारी दिली आहे. सोबतच आपल्या मृत्यूपत्रात त्यांनी आपल्या फाऊंडेशनचा उल्लेख केला आहे.
शंतनू नायडूला काय दिलं?
टाटा समूहचे माजी संस्थापक रतन टाटा यांनी त्यांच्यासोबत काम केलेल्या शंतनू नायडू यांनाही आपल्या मृत्यूपत्रात सामील केलं आहे. टाटा यांनी आरएनटी कार्यालयात महाप्रबंधक असलेले नायडू यांना वेंचर गुडफेलोमध्ये भागिदारी दिली आहे. सोबतच त्यांनी नायडू यांच्या शिक्षणासाठी लोन माफ केला आहे. 'गुडफेलो' ही 2022 मध्ये सुरू केलेली ज्येष्ठ नागरिकांसाठी सबस्क्रिप्शन-आधारित सहचर सेवा आहे.
कोण आहे शंतनू नायडू?
कॉर्नेल विश्वविद्यापीठातून एमबीए करणारे शंतनू नायडू हे रतन टाटा यांच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात. 2017 पासून शंतनू टाटा ट्रस्टशी जोडले गेले. टाटा समूहात काम करणाऱ्यात शंतनू नायडू पाचवी पिढी आहे. टाटा समूहमध्ये चॅरिटेबल ट्रस्ट शेअर सोडण्याची परंपरा कायम ठेवली आणि भागिदारीत रतन टाटा एंडोमेंट फाऊंडेशनला ट्रान्सफर करण्यात येईल.
Ratan Tata's Last Rites : एक होते टाटा ! देशाचे 'रतन' अनंतात विलीन
रतन टाटा यांच्याजवळ किती आहे संपत्ती?
- रतन टाटा यांच्या पश्चात 10 हजार कोटींची संपत्ती.
- टाटा यांच्या संपत्ती अलिबागमध्ये दोन हजार चौरस फुटाचा बंगला.
- मुंबईत दोन मजली बंगला
- 350 कोटींची एफडी
- टाटा ग्रुपच्या होल्डिंग कंपनीत टाटा सन्समध्ये 0.83 टक्के भागिदारी
- रतन टाटा यांच्याकडे तब्बल 20-30 गाड्या आहेत.
मृत्यूपत्रात टीटोचाही उल्लेख..
रतन टाटा यांनी त्यांचा जर्मन शेफर्ड टीटो याची जबाबदारी रसोइए राजन शॉ यांना दिली आहे. मृत्यूपत्रात त्यांनी टीटोची काळजी घेण्यासाठी मोठी रक्कम ठेवली आहे. टीटो याला रतन टाटा यांनी काही महिन्यांपूर्वी दत्तक घेतलं होतं. याशिवाय टाटांच्या मृत्यूपत्रात बटलर सुब्बैयासाठी काम रक्कम सोडली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world